Sunday, May 5, 2024
Home Blog Page 363

पहिल्या यादीत महाराष्ट्राचे “तेरा”

0

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, सुशीलकुमार शिंदे, माणिकराव गावितांसह अनेक विद्यमान खासदारांचा समावेश, पुणे आणि नांदेडबाबत अद्याप निर्णय नाही. त्यामुळं  अशोक चव्हाण आणि  कलमाडी यांचा निर्णय काँग्रेसनं राखून ठेवल्याचं चित्र आहे.

कोणाली कोणत्या मतदार संघातून उमेदवारी?

1) सुशीलकुमार शिंदे- सोलापूर

2) माणिकराव गावित – नंदुरबार

3) मुकुल वासनिक – रामटेक

4)  प्रिया दत्त – उत्तर मध्य मुंबई

5) संजय निरुपम – उत्तर मुंबई

6) मिलिंद देवरा – दक्षिण मुंबई

7) गुरुदास कामत – वायव्य मुंबई

8) एकनाथ गायकवाड – दक्षिण मध्य मुंबई

9) विलास मुत्तेमवार – नागपूर

10) अमरिश पटेल – धुळे

11) भाऊसाहेब वाकचौरे – शिर्डी

12) प्रतिक पाटील – सांगली

13) निलेश राणे – रत्नागिरी-सिंधुदुर्ग

 

 

यडियुरप्पांना भाजपचे तिकीट

0

 बी. एस. येडियुरप्पा सह एकूण ५२ जणांची दुसरी यादी आज भाजपने जाहीर केली.
यात कर्नाटकातील दक्षिण बेंगळुरूमधून सरचिटणीस अनंत कुमार यांना तर शिमोगा मतदारसंघातून येडुयुरप्पा यांना तिकीट देण्यात आले आहे. पश्चिम बंगालमधील हुगळी मतदारसंघातून पत्रकार चंदन मित्र यांना तर आसनसोल मतदासंघातून गायक बाबुल सुप्रियो यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
आज जाहीर केलेल्या ५२ जणांच्या यादीत आसाममधील ५, कर्नाटकातील २०, केरळमधील ३, ओडिशामधील ५, त्रिपुरातील २, पश्चिम बंगालमधील १७ जागांवरील उमेदवारी जाहीर करण्यात आली.
भाजपने यापूर्वी गेल्या आठवड्यात उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. १३ मार्चला पक्षाची बैठक होणार असून, तेव्हा पुढील यादी जाहीर होईल, असे सांगण्यात येते. यात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आदींच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

तीन दिवस आंध्रच्या दौऱ्यावर

0

मी आणि राजू वाघमारे आणि अन्य काही पत्रकार मित्र तीन दिवस अंाध्रच्या दौऱ्यावर आहोत .हैदराबादेत काही पत्रकारांची भेट होणार आहे.आंध्र सरकारने पत्रकारांसाठी कोणत्या योजना लागू केलेल्या आहेत याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करणार आह.
आंध्रच्या विभाजनानंतर तेथील राजकीय स्थितीचा आढावा घेण्याचाही आमचा प्रयत्न असणार आहे.हैदराबादहून तिरूपतीलाही जाण्याची योजना आहे.

पत्रकारांच्या एकजुटीपुढे पोलिस झुकले

0

पत्रकारांची एकजूट व्यवस्थेला कशी वाकायला लावते याचे उत्तम उदाहरण म्हणून कानपूरच्या एका घटनेकडे पहाता येईल.काही दिवसांपूर्वी पोलिसांनी एका कार्यक्रमात पत्रकारांवर लाठ्या चालविल्या होत्या.त्यात वैभव शुक्ला जखमी झाले होते.याविरोधात पत्रकारांनी आवाज उठविल्यानंतर झालेल्या प्रकाराबद्दल एसपी यशस्वी यादव यांनी पत्रकारांची दिलगीरी व्यक्त करीत चार पोलिसांंना सस्पेंन्ड केले होते.आता वैभव शुक्ल यांच्या उपचाराचा खर्च पोलिस करील अशी घोषणा एसपीनीं केली आहे.पत्रकारांच्या एकजुटीचा हा परिणाम आहे.आपण महाराष्ट्रातील पत्रकार या घटनेपासून काही शिकणार आहोत की नाही हा प्रश्न आहे.

दिल्लीत पत्रकार पोलिसांचे टार्गेट

0

दिल्लीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यात पूर्णतः अपयशी ठरलेल्या दिल्ली पोलिसांनी सध्या दिल्लीतील पत्रकारांना आपले टार्गेट केले आहे.आपले काम करणाऱ्या पत्रकारांची मानगुट पकडणे पोलिसांनी पुरूषार्थ वाटायला लागला आहे.वरील छायाचित्रात पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करणाऱ्या एका पत्रकार – छायाचित्रकाराची मानगुट पोलिसांनी पकडली.तेव्हाचे छायाचित्र

पत्रकार पिंजऱ्यात

0

मिस्त्र चे पदच्यूत राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोर्सीचे समर्थन करणारे अल जजिराचे पत्रकार फादेल फहमी आणि ऑस्ट्रेलियन रिपोर्टर पीटर ग्रेस्टी याच्यासह वीस जणांंंंंंना यांना आरोपी करण्यात आले असून याच्या विरोधात बंदी असलेल्या ब्रदरहुड या संघटनेला पाठिंबा दिल्याचा तसेच चुकीचे रिपोर्टिंग केल्याचा आरोप आहे.या सर्वांना शुक्रवारी बंद पिंजऱ्यातून न्यायालयात हजर करण्यात आले.
अल जजिराचे पत्रकार फहमी यांनी न्यायालयात सांगितले आपल्यावर अत्याचार केले जात आहेत.आरोग्य विषयक सवलती दिल्या जात नाहीत.सरकारी पक्षाने फहिम ज्या चॅलनसाठी काम करतात ते चॅनल चुकीच्या बातम्या दाखवत असल्याचा आरोप केला आहे.खटल्याची पुढील सुनावणी 24 मार्च रोजी होत आहे.

रायगड लोकसभा मतदार संघ, एका दृष्टीक्षेपात

0

2014च्या निवडणुकीसाठी शिवसेनेने पुन्हा अनंत गीते यांना उमेदवारी दिली आहे.

आघाडीच्या राजकारणात गेल्या वेळेस रायगड कॉग्रेसकडे होता तर मावळ राष्ट्रवादीकडे होता.यंदा राष्ट्रवादीला रायगड हवा आहे.तेथून सुनील तटकरे याना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.मावळ जर कॉग्रेसला सुटला तर राम ठाकूर ायांनी संधी मिळू शकते.मात्र त्याबाबत अजून नक्की काही ठरलेले नाही.
यावेळेस शेकाप शिवसेनेबरोबर नाही हा महत्वाचा मुद्दा आहे.शेकापने अगोदर आप बरोबर चाचपणी केली होती .शेकापचे जयंत पाटील अरविद केजरीवाल यांना दिल्लीत जाऊऩ भेटले होते मात्र त्यांच्याकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही.त्यामुळे शेकापने आता राज ठाकरे यांच्याशी संधान बांधले आहे.राज ठाकरे तिसरी आघाडी तयार करतील आणि त्यात शेकाप हा महत्वाचा घटक असेल असे दिसते.रायगडमध्ये मनसेचे फारशे स्थान नाही.त्यामुळे शेकापला मनसेचा फारसा फायदा होणार नाही.शेकापचा उमेदवार रायगड किंवा मावळमधून निवडणून येण्याचीही अजिबात शक्यता नाही पण त्याचे उमेदवार उभे राहिले तर त्याचा फटका शिवसेनेला बसणार आहे.राज ठाकरेंचे हेच गणित असेल तर ते शेकापला बरोबर घेतल्याने यशस्वी होऊ शकते.मात्र ही आघाडी राज्यात मान्य होणारी नाही हे तेवढेच खरे.शिवाय़ याचा रायगड जिल्हा परिषदेत सत्तेवर असलेल्या शेकाप-शिवसेना युतीला देखील फटका बसणार आहे.
राजकीय स्थिती
———–
रायगड जिल्हयात शेकाप आणि कॉग्रेस यांच्यात अगदी 1952 पासून तुल्यबळ लढती झालेल्या आहेत.रायगडच्या मतदारांनी आलटून-पालटून कधी शेकापला तर कधी का्रग्रेसला लोकसभेत जाण्याची संधी दिली.मात्र 1989,1991,1996 अशी तीन वेळा अं.र.अंतुले यांनी निवडणूक जिंकून ही परंपरा खंडित केली.मात्र या तिन्ही वेळेस अंतुलेंचे मताधिक्य क्रमशः कमी होत गेले आणि ते 1998 मध्ये शेकापच्या नवख्या राम ठाकूर यांनी अंतुलेचा 9126 मतांनी पराभव केला.मात्र 1998 ची लोकसभा अत्पजिवी ठरली.वाजपेयी सरकार कोसळल्यावर पुन्हा 1999 मध्ये निवडणुका झाल्या मात्र यावेळेस अंतुलेंनी आपला परंपरागत मतदार संघ सोडून थेट औरंगाबाद गाठले.तेथेही त्यांचा पराभव झाला.अंतुले नसल्याने 99 चा सामना शेकाप विरूध्द शिवसेना असा झाला.शेकापतून शिवसेनेत गेलेले दि.बा.पाटील असा झाला त्यात दि.बा.पाटील यांचा पराभव झाला.
2004 मध्ये अंतुले पुन्हा रायगडात आले.यावेळी राम ठाकूर यांनी लोकसभा लढविण्यास नकार दिल्याने शेकापने विवेक पाटील यांना उभे केले.या लढाईत शेकापचा पराभव झाला.अ.र.अंतुले विजयी झाले.अंतुले 2009 मध्ये पुन्हा मैदानात उभे राहिले.यावेळेस मतदार संघाची पुनर्रचना झाली होती.रायगड दोन मतदार संघात विभागला गेला होता.अंतुलेंच्या पाठिशी असणारे पनवेल,उरण,हे मतदार संघ मावळला जोडले गेले होते.रत्नागिरीतले दापोली आणि गुहागर हे दोन विधानसभा मतदार संघ रायगडा जोडले गेले होते.रत्नागिरीत अंतुलेंचा फारसा करिष्मा नव्हता.त्याचा फटका त्यांना बसला ते मोठ्या फरकाने पराभूत झाले.शिवसेनेचे अनंत गीते विजयी झाले.शिवसेना प्रथमच रायगडमध्ये जिंकली होती.शिवसेनेने केवळ रायगडच नव्हे तर मावळवरही भगवा झेंडा फडकविला होता.तेथे गजानन बाबर हे शिवसेना नेते विजयी झाले होते.2009 मध्ये शेकापने शिवसेनेला पाठिंबा दिला होता.जिल्हयात शेकापचे जवळपास अडिच लाख निर्णाय़क मते आहेत.ही मतं कोणाच्या पारड्यात पडतात याला जिल्हयाच्या राजकारण फार महत्व आह.
——————————————
रायगड लोकसभा मतदार संघ पूर्वीचे नाव — कुलाबा
रायगडचे आजपर्यतचे खासदार
1952 – सी.डी.देशमुख ( कॉग्रेस विजयी ) राजाराम राऊत ( पराभूत -शेकाप)
1957 – राजाराम राऊत ( शेकाप विजयी) दत्तात्रय कुंटे ( पराभूत – कॉग्रेस )
1962 – भास्कर दिघे ( कॉग्रेस विजयी ) राजाराम राऊत ( पराभूत -शेकाप)
1967 – दत्तात्रय कुंटे (शेकाप विजयी ) वसंत शिंदे ( पराभूत – शेकाप)
1971 – शंकर सावंत ( कॉग्रेस विजयी ) दत्ता पाटील ( पराभूत ः शेकाप )
1977 – दि.बा.पाटील ( शेकाप विजयी ) शंकर सावंत ( पराभूत कॉग्रेस )
1980 – ए.टी पाटील ( कॉग्रेस विजयी) दि.बा.पाटील ( पराभूत- शेकाप )
1984 – दि.बा.पाटील ( शेकाप विजयी) अ.र.अंतुले ( पराभूत कॉग्रेस )
1989 – अ.र.अंतुले (कॉग्रेस विजयी) दि.बा..पाटील ( पराभूत शेकाप )
1991 – अ.र.अंतुले ( कॉग्रेस विजयी ) दत्ता पाटील ( पराभूत शेकाप )
1996 – अ.र.अंतुले ( कॉग्रेस विजयी) अनंत तरे ( पराभूत शिवसेना
1998 – राम ठाकूर ( शेकाप -विजयी) अ.र.अंतुले ( पराभूत कॉग्रेस)
1999- राम ठाकूर ( शेकाप -विजयी) दि.बा.पाटील ( पराभूत सेना)
2004 -अ.र.अंतुले ( कॉग्रेस विजयी) विवेक पाटील ( पराभूत शेकाप)
2009 -अनंत गीते ( शिवसेना विजयी) अ.र.अंतुले ( पराभूत-कॉग्रेस
——————————
2009च्या निवडणुकीत शिवसेनेचे अनंत गीते यांना 4 लाख 31 हजार 546 म्हणजे 53.89 टक्के मते मिळाली आणि ते विजयी झाले.
कॉग्रेसचे अ.र.अंतुले यांना 2 लाख 67 हजार 25 म्हणजे 34.80 टक्के मते मिळाली आणि ते 1 लाख 46 हजार 521 मतांनी पराभूत झाले.अंतुले यांनी सर्वाधिक वेळा म्हणजे चार वेळा रायगडचे राजधानीत प्रतिनिधीत्व केले.
2009 मध्ये पूर्वीच्या कुलाबा लोकसभा मतदार संघाचे नामांतर झाले.रायगड हा नवा मतदार संघ अस्तित्वात आला.हा नवा मतदार संघ अस्तित्वात येत असतानाच जिल्हा दोन लोकसभा मतदार संघात विभागला गेला.
1 ) रायगड
2) मावळ
रायगड लोकसभा मतदार संघात रायगड जिल्हयातील पेण,अलिबाग,श्रीवर्धन ,महाड हे चार विधानसभा मतदार संघ आणि रत्नागिरी जिल्हयातील दापोली आणि गुहागर हे दोन विधानसभा मतदार संघ जोडण्यात आले.
मावळ लोकसभा मतदार संघात – रायगड जिल्हयातील पनवेल,उरण आणि कर्जत हे तीन विधानसभा मतदार संघ तसेच पुणे जिल्हयातील मावळ आणि पिंपरी-चिंचवड हे विधानसभा मतदार संघ जोडले गेले.2009च्या निवडणुका नव्या मतदार संघानुसारच झाल्या.
—————————————————
विधानसभा मतदार संघनिहाय रायगड जिल्हयातील 2014च्या निवडणुकांसाठी
मतदार यादी 30 जानेवारी राजी प्रसिध्द केली गेली.त्यानुसार जिल्हयात एकूण 18 लाख 70 हजार 637 मतदार आहेत.2009च्या तुलनेत ही संख्या जवळपास दीड लाखांनी जास्त आहे.
विधानसभा मतदार संघ निहाय लोकसंख्या
188 – पनवेल – 3,53,988
189 – कर्जत – 233,950
190- उरण – 2,44,353
191- पेण – 2,76,703
192 – अलिबाग – 2,70,023,
193 -श्रीवर्धन – 2,33,412
194 – महाड – 2,58,208
——————
18,70,637
——————–
———————————————————

अन् पिंपरीच्या महापौर पत्रकारवर घसरल्या……

0

काल पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समिति चेअरमन पदाची निवडणूक पालिकेच्या कै.पवळे सभागृहात पार पडली.नूतन चेअरमन महेश लांडगे यांच्या सत्कारपर अनेकांची भाषणे झाली.यावेळी पिंपरीच्या महापौर मोहिनी लांडे बोलताना सत्कार सोडून पत्रकार मंडळीवर सुरुवतीसच घसरल्या.महेश हे आमचे भाचे जावई आहेत,त्यांच्यात आणि आमच्यामध्ये कसलेही भांडणे नाहीत पत्रकारच आमच्यात गैरसमज पसरवितात.महेश लांडगे हे त्यांच्या भाषणात आपल्या विरोधी काहीतरी बोलणार याची जाणीव झाल्याने महापौर लांडे यांनी महेश लांडगे यांच्यासी भाषानाद्वारे सख्य असल्याचा केविलवाणा प्रयत्न केला व त्यासाठी त्यांनी पत्रकाराचा आधार घेतला.मात्र काही मिनिटातच त्या एकाकी पडल्या.त्याच ठिकाणी महेश लांडगे यांनी सत्काराला उत्तर देताना माझ्यावर 10वर्ष अन्याय झालय, पुतण्या मावशीचे प्रेम माझ्या एकट्याच्या वाट्याला आल्याचे सांगीतले.पत्रकार हे समाजाचे आरसे असल्याचे अनेकदा सिद्ध झाले असताना पत्रकारांना बदनाम करण्याची फँशनच झाली आहे.नगरसेविका सीमा सावळे यांनी मागील महिन्यात केलेले बेताल वक्तव्य हेही त्यापैकीचेच एक उदाहरण आहे.
दररोज पत्रकार मंडळीबरोबर गप्पा मारायच्या आपल्या सोयीच्या बातम्या छापून आणायच्या आणि वेळ आली की पत्रकार मंडळीस बदनाम करायचे हे थांबले पाहिजे.मात्र त्याच बरोबर पत्रकारांनी ही अश्या संधी साधू राज्यकर्ते मंडळीपासून जरा सावधच राहिलेले बरे.

(बापूसाहेब गोरे याच्या वॉलवरून साभार )

माथेरान मिनिबसचे रडगाणे थांबता थांबेना

0

नेरळ-माथेरान दरम्यान धावणाऱ्या मिनिबसच्या अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागल्याने ऐन परिक्षेच्या हंगामात विध्यार्थी आणि पालकांना जादा पैसे देऊन खासगी टॅक्शाचा वापर करावा लागत असल्याची तक्रार माथेरानकर नागरिक करीत आहेत.

अनेक अडथळ्यांवर मात करून नेरळ माथेरान मिनिबस पाच वर्षांपूर्वी सुरू झाली पण या मार्गासाठी दोनच गाड्या आणल्या गेल्या.त्यापैकी एक गाडी सतत नादुरूस्त असते.त्यामुळे परिवहन मंडळाची वाहतूक अनेकदा बंदच असते.आताही गेली आठ दिवस ही वाहतूक कोलमडली असून ती नियमित करावी अशा माथेरानकरांची मागणी आहे.

रायगडातील औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

0

अलिबागनजिक असलेल्या भायखळा येथील फटाका निर्मिती कारखान्यास आग लागून अनेकांना आपले प्राण गमवावे लागल्याने रायगड जिल्हयातील औद्योगित सुरक्षिततेचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

जिल्हयात साठ वर्षांपूर्वी हिंदुस्थान ऑरगेनिक केमिकल्स हा कारखाना सुरू झाला.त्यानंतर जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून घोषित झाला.त्यामुळं कारखानदारीला प्रोत्साहन दिले गेले.त्यातून मोठी कारखानदारी जिल्हयात उभी राहिली.आज मित्तीला जिल्हयात वीस पेक्षा जास्त कामगार असलेले1539 कारखाने आहेत.यातील पन्नास टक्के पेक्षा जास्त कारखान्यात धोकादायक किंवा अतिधोकादायक श्रेणीतील रसायने वापरली जातात.काही ठिकाणी धोकादायक रसायने आणि वायूचा साठा करून ठेवावा लागतो.मात्र अशा धोकादायक श्रेणीतील कारखान्यात वर्षातून एकदा मॉकड्रील करणे आणि सेफ्टी ऑडीट कऱणे बंधनकारक असताना एखादं- दुसरा अपवाद वगळता असे होताना दिसत नाही.जिल्हयातील आऱसीएफ सारख्या काही सरकारी कंपन्या तसेच काही खासगी कंपन्या सेफ्टी ऑडीट करतात पण त्यांचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे येत नसल्याचे जिल्हा आपत्ती नियंत्रण अधिकारी सागर पाठक यांनी सांगितले.

भायखळा येथे ज्या क्रांती फायर वर्क्समध्ये स्फोट झाला तेथेही धोकादायक रसायने वापरली जात होती ,शेजारछ्‌या नदीत धोकादायक रसायने टाकली जातात याबद्दलच्या लेखी तक्रार पोलिसात देऊनही त्याबाबत कोणतीच कारवाई झाली नाही.अशाच प्रकार अन्यत्र सुरू असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने कुठे काही अगतिक घडले तर होणारी हानी भायखळाच्या घटनेपेक्षा किती तरी मोठी असेल.त्यामुळे भायखळा येथील घटनेची पुनरावत्ती जिल्हयात कोठेही होणार नाही याची खबरदारी घेण्याची गरज आता जिल्हयातील नागरिकांकडून व्यक्त होताना दिसते आहे.

POPULAR POSTS

error: Content is protected !!