Thursday, April 25, 2024
Home Blog Page 364

संतांची भूमी उजाड होतेय,,,

0

संतांची भूमी उजाड होतेय,,,

गारपीटीनं मराठवाड्याचं कंबरडं मोडलंय
तुफान वादळ,जोरदार पाऊस आणि गारांचा जीवघेणाम मारा होत असताना मी मराठवाड्यात होतो.गारांचा मारा मराठवाडयाला नवा नसला तरी गेल्या आठ-दहा वर्षात अशा गारांचा मारा झालेला नव्हता.जेव्हा या गारा पडायच्या तेव्हाही त्या फेब्रुवारी -मार्चमध्ये पडायच्या नाहीत.त्या एप्रिल- मे मध्ये पडायच्या.एप्रिलपर्यथ रब्बीची सुगी संपलेली असते त्यामुळे गारा पडल्या तरी त्याचा पिकांना त्रास व्हायचा नाही.यंदा रब्बीची सुगी ऐन झोकात असतानाच गारा,वारा,आणि पाऊस झाला.त्यानं मराठवाड्यातील सुगी होत्याची नव्हती झाली.ज्वारी,गगू,हरभरा याशिवाय फळ बागायतीचं अतोनात नुकसान झालं.माझ्या स्वतःच्या शेतातला चार एकर गहू झोपी गेला.आई सांगत होती,असा गहू यापूर्वी कधी आला नव्हता.तूरही भन्नाट आलेली होती.ती काढली होती पण तिचं खळॅं करायचं राहिलं होतं.शेतात पडलेल्या तुरीवर सतत चार -सहा दिवस पावसाचा मारा होत होत होता.ही स्थिती साऱ्याच शेतकऱ्यांची .मराठवाड्यातील एकही जिल्हा गारपिटीनं सोडला नाही.बीड पुरतंच सांगायचं तर जिल्हयातील सारेच तालुके चुन चुन के मारो अशा पध्दतीनं मारले गेले.म्हणजे आज धारूर,केज- उध्या वडवणी बीड,परवा,परळी-म ाजलगाव,आणखी एका दिवशी गेवराई म्हणजे निसर्गाच्या फटक्यातून कोणीच सुटलं नाही.गेवराईत आमचे एक पाव्हणे आहेत.पोरगा बीएससी ऍग्री झाला त्यानं आधुनिक शेती सुरू केली.सहा एकर पपई लावली.पावसामुळं त्यानं पपई काढली.व्यापारी येणार म्हणून पपई ताडून ठेवली.त्या दिवशी व्यापारी काही आला नाही.आल्या त्या गारा.एका एका पपईला गारांच्या फटक्यानं वीस वीस छिद्र पडली.
धारूरला तर 100 गॅ्रम वजनाच्या गारांपासून 500 ग्राम वजनाच्या गारा पडल्या.गोफणीचा गुंडा यावा अशा गारा येत.त्यानं झाडांना पानं उरली नाहीत.झाडावरील पक्षी राहिले नाही.अंगणात ठेवलेल्या अनेक गाड्यांची काचं फुटली काही गाड्याच्या टपाच्या चिंधड्या उडाल्या.माणसं मेली.माझ्याच गावापासून तीन किलो मीटर अंतरावर पिंपरखेड नावाचं गाव आहे.वीज पडून तिथं एक महिला जागीच ठार झाली.अन्य तिेघे अत्यवस्थ आहेत.हे शेतकरी कुटुंब आभाळ आलंय म्ङणून गाडीतून घरी येत असताना मध्येच त्यांच्या अंगावर वीज कोसळली.गावातले लोक सांगतात कानठळी बसविणारा आवाज झाला.वीज पडली म्हणजे काय होत याचा अनुभव गावकऱ्यानी घेतला.
जे घडलं ते सारं वर्णनापलिकडंचं आहे.मराठवाड्यावर अशी नैसर्गिक संकंटं वारंवार का येतात याचा आतातरी विचार होणार आहे की नाही हा खरा प्रश्न आहे.कधी भूकंप,कधी अतिवृष्टी,कधी गारपीट दुष्काळ तर मराठवाड्याच्या पाचवीलाच पुजलेला आङे.निसर्गाचा प्रकोप म्हणून या साऱ्या घटनांकडे बघता येणार नाही.कुठं तरी,काही तरी चुकतंय हे नक्की.नेमकं काय चुकतंय याचा अभ्यास तत्ज्ञांनी करण्याची गरज आहे.जे कधी कुणी पाहिलं नाही,जे कधी घडलं नाही अशा घटना घडत असतील तर मग निसर्गाचं चक्र कुठं तरी बिघडलंय हे वेगळं सांगण्याची गरज नाही.त्यावर गंभीरपणे विचार झाला नाही तर मराठवाड्याचा वाळवंट व्हायला वेळ लागला नाही.नुकसान भरपाईची मलमपट्टी हा तात्पुरता उपचार आहे.तो पुरेशाही नाही.माझ्यापुरतंच सांगायचं तर माझी जवळपास दोन लाखांची तूर वाया गेली.चार एकरातील छान आलेले गहू झोपला.त्याचं नुकसान किती झालं हे सांगता येत नाही.तलाठी आता पंचनामे वगैरे करायला गेलाय.पण माझं जवळपास पाच लाखांचं नुकसान झालं असेल तर सरकार दहा वीस हजार देऊन माझी बोळवण करणार.त्यानं काय होणार.माझ्यासारखंच अनेक शेतकऱ्यांचं वर्षाचं गणित आता कोलमडून पडणार आहे.आता निवडणुका असल्यानं आश्वासनं ,भेटी-गाठी वगैरे होतच राहणार आहे.मला वाटतं यापेक्षाही मराठवाडयातील बदलत चाललेल्या हवामानाच येथील भूगर्भाचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे.गार पिट झाली,ुदुष्काळ आला की,निसर्गाचा प्रकोप म्हणून शेतकऱ्यांना दैवाधिन कऱण्यासारखी परिस्थिती आज नाही.प्रकोप म्हणत शेतकऱ्यांच्या तोंडावर नुकसान भरपाईचे हजार-पाचशे रूपये मारल्यानेही आता काही होणार नाही.कारण त्यातून जे कारभारी आहेत त्याना फार तर आपण रयतेसाठी काही करतो आहोत याचं तात्कालिक समाधान घेता येईल पण त्यातून उजाड होत चाललेला मराठवाडा वाचणार नाही.मराठवाडा ही संतांची भूमी आहे.कष्टकऱ्यांची भूमी आहे,ती उजाड होत असेल तर ती वाचविण्याचं उत्तरदायित्व सरकारचं आहे.सरकार त्याकडं दुर्लक्ष करीत चाललंय.त्यानं मराठवाड्यतील माणून न माणून हवालदिल आहे.चार दिवस मी माझ्या देवडी गावात होतो.गारपिटीचीच चर्चा.तुझं किती नुकसानं झालं,माझं किती नुकसानं झालं हे प्रश्न परस्पराना विचारणे एवढंाच विषय आहे.निडवणुकांचे ढोल सध्या वाजताहेत त्याची कोणी चर्चा करीत नाही.राजकाऱण साऱ्यांचाच आवडता विषय असला तरी आज सारंच होत्याचं नव्हतं झाल्यानं राजकारणावर चर्चा कऱण्याचं बळ आता कोणालाच नाही.प्रत्येकाला आजचीच काळजी आहे.सरकारनं या साऱ्या प्रदेशाकडं थोडं सहानुभूतीनं पाहिलं नाही तर यापुढं मराठवाडयातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याशिवाय राहणार नाही.

माहिती आणि जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या

0

वर्षा शेडगे यांची बदली पुण्याहून कोल्हापूरला

माहिती आणि जनसंपर्क विभागातील काही अधिकाऱ्यांच्या आज रात्री बदल्या करण्यात आल्या आहेत.ज्या अधिकाऱ्यंाना तीन वर्षांंपेक्षा जास्त कालावधी झाला आहे अशा अधिकाऱ्यांच्या अन्यत्र बदल्या करण्यात आल्या आहेत.
पुण्याच्या माहिती उपसंचालक वर्षा शेडगे यांची बदली कोल्हापूर येथे कऱण्या त आली आहे.
परभणीचे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांना नगरला पाठविले आहे.रत्नागिरीचे किरण मोघे यांना प्रतिनियुक्तीने मुख्यमंत्री सचिवालयात पाठविण्यात आले आहे.नांदेडचे जिमा अधिकारी अ.ला.आलूरकर याना बीडला पाठविले गेले आहे.आौरंगाबादचे माहिती अधिकारी केशव करंदीकर परभणीला गेले आहेत.वर्षा पाटोळे यांची कोल्हापूरहून मुंबईला बदली झाली आहे.मगेश वरकड ायंची बदली अमरावतीहून चंद्रपूरला ,शैला दांदळे-वाघ यांची बदली नागपूरहून अमरावतीला,संप्रदा बीडकर यांची बदली डहाणूहून कोल्हापूरला,निशिकांत तोडकर यांची लातूरहून नांदेडला,शा.मो.कारदेकर यांची अमरावतीहून अकोल्याला,दि.सी.गवळी यांची नगरहून नाशिकला,आणि स.रा.माने यांची बदली कोल्हापूरहून माहिती अधिकारी म्हणून रायगडला करण्यात आली आहे.

0

लोकसभा निवडणूकः रायगडबद्दल थोडंसं

0
रायगड जिल्हा दोन लोकसभा मतदार संघात विभागला गेला आहे.रायगड लोकसभा मतदार संघात पेण,अलिबाग,श्रीवर्धन ,महाड हे रायगडमधील चार विधानसभा मतदार संघ आणि दापोली आणि गुहागर हे रत्नागिरी मधील दोन विधानसभा मतदार संघ समाविष्ट झाले आहेत.मावळ लोकसभा मतदार संघात रायगडमधील पनवेल,कर्जत,उरण हे तीन विधानसभा मतदार संघ आणि पुणे जिल्हयातील पिंपरी-चिंचवड,मावळ हे मतदार संघ समाविष्ट केले गेलेले आहेत.
रायगड जिल्हयात 18 लाख 70  हजार 637  मतदार आहेत.2009च्या तुलनेत 1लाख59हजार627 नव्या मतदारांची भर पडलेली आहे.. यातील 10 लाख 38 हजार 346 मतदार रायगडचा खासदार निवडतील तर 8लाख 32 हजार 291 मतदार मावळचय खासदारासाठी मतदान करतील.  रायगड जिल्हयात एकूम 2366 मतदान केंद्रे असतील
रायगड लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे अऩंत गीते हे 2009मध्ये विजयी झाले होते.त्यांनी कॉग्रेसचे बॅरिस्टर अ.र.अंतुले यांचा 1लाख 46 हजार 521 मतांनी पराभव केला होता.मावळ मतदार संघही शिवसेनेच्याच ताब्यात आहे.तेथे गजानन बाबर यांनी गेल्या वेळेस राष्ट्रवादीचे आझम पानसरे यांचा 80616 मतांनी पराभव केला होता.यावेळी देखील दोन्ही मतदार संघात शिवसेना विरूध्द राष्ट्रवादी अशी लढत होईल अशी शक्यता आहे.रायगड मतदार संघासाठी शिवसेनेने अनंत गीते यांची उमेदवारी जाहीर केली असली तरी हा मतदार संघ कॉग्रेसने लढवायचाय की,राष्ट्रवादीने हे अजून ठरलेले नाही.मतदार संघ राष्ट्रवादीकडे आल्यास तेथून सुनील तटकरे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.मावळमध्ये अजून शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपले पत्ते उघड केलेले नाहीत.गेल्या वेळेस युती बरोबर असलेला शेतकरी कामगार पक्ष यावेळेस कोणाबरोबर असेल हे ही अजून स्पष्ट झालेले नाही.शेकाप आम आदमी पार्टीच्या उमेदवाराला मदत करतो की,आपची मदत घेऊन स्वतःचा उमेदवार उभा करतो हे ही अजून स्पष्ट व्हायचे आहे.
रायगड  आणि मावळ लोकसभेची निवडणूक प्राधान्याने प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर लढविली जाणार आहे.रायगडात नवी मुंबई विमानतळामुळे होणाऱ्या विस्थापनाचा प्रश्न उग्र आहे.माणगाव,तळा,रोहा तालुक्यात दिल्ली मुंबई इंन्डस्ट्रीयल कॉरिडोरचा मुद्दाही मतदानाचा महत्वाचा मुद्दा ठऱणार आहे.तसेच कोकणातून रेल्वे जाते पण रायगडला त्याचा फायदाच होत नाही याविरोधात बुधवारी माणगावमध्ये रेल्वे रोको आहे,तो प्रश्नही महत्वाचा आहे.मुंबई-गोवा महामार्गाचे रूंदीकरण पहिल्या टप्प्यात इंदापूरपर्यतच होत आहे.रूंदीकऱणापासून महाड खेड आणि रत्नागिरी जिल्हा वंचित आङे.तो ही प्रचाराचा महत्वाचा मुद्दा ठरणार आहे.याचबरोबर दरवर्षी जाणवणारी पाणी टंचाई आणि दोन्ही कडच्या विद्यमान खासदारांच्या लोकसभेतील कामगिरीचे मुद्देही अग्रक्रमाने प्रचाराचे मुद्दे केले जाण्याची शक्यता आहे.

पत्रकारांवर पोलिसांचा हल्ला

0

बातमी संकलनाचे काम करणाऱ्या पत्रकारांवर पोलिसांनी केलेल्या निर्मम हल्लयाच्या विरोधात कानपूरमधील पत्रकारांनी शनिवारी भव्य मोर्चा काढला.अखिलेश यादव यांच्या नावे पोलिसांना दिलेल्या निवेदनात दोषींवर कारवाई कऱण्याची मागणी करण्यात आली आहे.जखमी पत्रकार आणि छायाचित्रकारांना योग्य तो मोबदला देण्याचीही मागणी केली गेली आहे.पत्रकारांनी यावेळी पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी केली.

माथेरान -नेरळ मिनिट्रेनच्या फेऱ्या रद्द

0

माथेरान ते नेरळ दरम्यान धावणाऱ्या मिनिट्रेनच्या फेऱ्या 27 फेब्रुवारीपासून बंद करण्यात आल्याने पर्यटकांना झुकझुक गाडीचा आनंद घेता येत नाही अशी खंत पर्यटक व्यक्त करताना दिसतात.10 मार्च पर्यत या फेऱ्या बंद राहणार आहेत.मात्र अमन लॉज ते माथेरान दरम्यानची शटल सेवा सुरूच आहे.
नादुरूस्त इंडिनमुळे अनेकदा माथेरान रेल्वे मध्येच बंद पडून वेळापत्रक कोलमडते.त्यामुळे इंजिनची पूर्ण दुरूस्ती होईपर्यत नेरळ ते अमनलॉज दरम्यानची सेवा बंद ठेवण्यात आली आहे.रेल्वेकडे दोनच चांगली इंजिन्स असल्याने अमन लॉझ ते माथेरान ही शटल सेवा सुरू ठेवण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने सागितले.

आगरी साहित्याचा गोडवा नव्या पिढीला कळला पाहिजे अलिबागेत आगरी साहित्य संमेलन

0

आगरी साहित्य हे अन्य साहित्यापेक्षा वेगळे आणि वैशिष्टयपूर्ण आहे,या साहित्यातील गोडवा नवीन पिढीला समजावा यासाठी प्रय़त्न व्हायला हवेत अशी अपेक्षा आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

आगरी साहित्य विकास मंडळाच्यावतीनं अलिबाग नजिक चेंढरे येथे 12 व्या राज्यस्तरीय आगरी साहित्य संमेलनाचे उद्घाघाटन रविवारी जयंत पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी जयंत पाटील बोलत होते.संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कैलास पिंगळे आहेत.
आगरी समाजात प्रतिभावंत शिक्षक निर्माण झाल्याने त्यांनी आगरी साहित्याची निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली परंतू आगरी साहित्याचा दर्जा वाढला पाहिजे असे मतही जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी आगरी समाजातील विविध क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांच्या जयंत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पत्रकाराच्या हत्त्ये प्रकरणी एकास फाशी,अन्य 5 जणांना जन्मठेप

0

पाकिस्तानातील एका दहशतावाद विरोधी न्याायाल्याने पत्रकाराच्या हत्त्ये प्रकरणी एका आरोपीला मृत्यूंदंड आणि अन्य चार आरोपीना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.जियो न्यूजचे पत्रकार वली खान बाबर यांच्या कार्यालयाून जाताना गोळी मारून हत्त्या करण्यात आली होती 2011 ची ही घटना आहे.शिक्षा झालेल्या आरोपींची कामरान उर्फ जीशन और फैजल मोटा अशी नावे आहेत.

सर्पमित्र राजेंद्र कोतवाल यांचे सर्पदंशाने निधन

0

मुरुड तालुक्यातील नांदगावमधील सर्पमित्र राजेंद्र अनंत कोतवाल (४८) यांचा सर्पदंशानेच शनिवारी रात्री  मृत्यू झाला.
नांदगावमधील एका बागायतीमध्ये साप दिसल्यामुळे त्यास पकडण्यासाठी राजू कोतवाल यांना पाचारण करण्यात आले होते. अत्यंत विषारी असलेल्या या नागाला त्यांनी लीलया पकडले आणि पोत्यात भरुन त्यास जंगलात सोडण्यास नेण्याच्या तयारीत असतानाच नागाने त्यांच्या हाताला दंश केला. त्यांच्यावर मुरुडमध्ये प्राथमिक उपचार करण्यात येऊन पुढील उपचारासाठी अलिबाग येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. उपचारास विलंब झाल्याने विष अंगात पसरले आणि त्यांचे वाटेतच निधन झाले.
कोतवाल यांनी मुरुड तालुक्यातील अनेक गावांतून शेकडो सापांना पकडून त्यांना सुरक्षितपणे फणसाड अभयारण्यात सोडले होते. सापांबद्दल माहिती देणारे अनेक कार्यक्रम त्यांनी शाळा, महाविद्यालये व अन्य ठिकाणी केले होते.

श्याम म्हात्रे याना 6 मार्चपर्यत पोलिस कोठडी

0

धरमतर खाडी मच्छिमार व प्रकल्पग्रस्त समितीचे नेते श्याम म्हात्रे यांना काल अलिबाग न्यायालयाने 6 मार्चपर्यत पोलिस क ोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.त्यांच्या सोबतच्या 8 पुरूष आंदोलकांनाही 6 मार्चपर्यत तर 9 महिला आंदोलकांना 3 मार्चपर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी शैलेश तांबे यांनी दिले आहेत.

सलग 18 दिवस अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन कऱणाऱ्या आंदोलकांची सरकार दखल घेत नाही यामुळे चिडलेल्या मच्छिमार आंदोलकांनी शुक्रवारी दुपारी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केली होती.त्यात पाच पोलिस अधिकारी तसेच 9 पोलिस कर्मचारी जखमी झाले होते.या प्रकऱणी पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच 345 आंदोलकांना अटक केली होती.शनिवारी दुपारी या सर्वांना अलिबागच्या न्यायालयात हजर करण्यात आले.त्यापैकी न्यायालयाने 336 आंदोलकांची मुक्तता केली.उर्वरित आंंंदोलकांना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.एकाच वेळी 345 आरोपींना न्यायालयात हजर करण्याची अलिबागच्या इतिहासातील ही पहिलीच घटना

POPULAR POSTS

error: Content is protected !!