रायगड लोकसभा मतदार संघ, एका दृष्टीक्षेपात

0
1247

2014च्या निवडणुकीसाठी शिवसेनेने पुन्हा अनंत गीते यांना उमेदवारी दिली आहे.

आघाडीच्या राजकारणात गेल्या वेळेस रायगड कॉग्रेसकडे होता तर मावळ राष्ट्रवादीकडे होता.यंदा राष्ट्रवादीला रायगड हवा आहे.तेथून सुनील तटकरे याना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.मावळ जर कॉग्रेसला सुटला तर राम ठाकूर ायांनी संधी मिळू शकते.मात्र त्याबाबत अजून नक्की काही ठरलेले नाही.
यावेळेस शेकाप शिवसेनेबरोबर नाही हा महत्वाचा मुद्दा आहे.शेकापने अगोदर आप बरोबर चाचपणी केली होती .शेकापचे जयंत पाटील अरविद केजरीवाल यांना दिल्लीत जाऊऩ भेटले होते मात्र त्यांच्याकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही.त्यामुळे शेकापने आता राज ठाकरे यांच्याशी संधान बांधले आहे.राज ठाकरे तिसरी आघाडी तयार करतील आणि त्यात शेकाप हा महत्वाचा घटक असेल असे दिसते.रायगडमध्ये मनसेचे फारशे स्थान नाही.त्यामुळे शेकापला मनसेचा फारसा फायदा होणार नाही.शेकापचा उमेदवार रायगड किंवा मावळमधून निवडणून येण्याचीही अजिबात शक्यता नाही पण त्याचे उमेदवार उभे राहिले तर त्याचा फटका शिवसेनेला बसणार आहे.राज ठाकरेंचे हेच गणित असेल तर ते शेकापला बरोबर घेतल्याने यशस्वी होऊ शकते.मात्र ही आघाडी राज्यात मान्य होणारी नाही हे तेवढेच खरे.शिवाय़ याचा रायगड जिल्हा परिषदेत सत्तेवर असलेल्या शेकाप-शिवसेना युतीला देखील फटका बसणार आहे.
राजकीय स्थिती
———–
रायगड जिल्हयात शेकाप आणि कॉग्रेस यांच्यात अगदी 1952 पासून तुल्यबळ लढती झालेल्या आहेत.रायगडच्या मतदारांनी आलटून-पालटून कधी शेकापला तर कधी का्रग्रेसला लोकसभेत जाण्याची संधी दिली.मात्र 1989,1991,1996 अशी तीन वेळा अं.र.अंतुले यांनी निवडणूक जिंकून ही परंपरा खंडित केली.मात्र या तिन्ही वेळेस अंतुलेंचे मताधिक्य क्रमशः कमी होत गेले आणि ते 1998 मध्ये शेकापच्या नवख्या राम ठाकूर यांनी अंतुलेचा 9126 मतांनी पराभव केला.मात्र 1998 ची लोकसभा अत्पजिवी ठरली.वाजपेयी सरकार कोसळल्यावर पुन्हा 1999 मध्ये निवडणुका झाल्या मात्र यावेळेस अंतुलेंनी आपला परंपरागत मतदार संघ सोडून थेट औरंगाबाद गाठले.तेथेही त्यांचा पराभव झाला.अंतुले नसल्याने 99 चा सामना शेकाप विरूध्द शिवसेना असा झाला.शेकापतून शिवसेनेत गेलेले दि.बा.पाटील असा झाला त्यात दि.बा.पाटील यांचा पराभव झाला.
2004 मध्ये अंतुले पुन्हा रायगडात आले.यावेळी राम ठाकूर यांनी लोकसभा लढविण्यास नकार दिल्याने शेकापने विवेक पाटील यांना उभे केले.या लढाईत शेकापचा पराभव झाला.अ.र.अंतुले विजयी झाले.अंतुले 2009 मध्ये पुन्हा मैदानात उभे राहिले.यावेळेस मतदार संघाची पुनर्रचना झाली होती.रायगड दोन मतदार संघात विभागला गेला होता.अंतुलेंच्या पाठिशी असणारे पनवेल,उरण,हे मतदार संघ मावळला जोडले गेले होते.रत्नागिरीतले दापोली आणि गुहागर हे दोन विधानसभा मतदार संघ रायगडा जोडले गेले होते.रत्नागिरीत अंतुलेंचा फारसा करिष्मा नव्हता.त्याचा फटका त्यांना बसला ते मोठ्या फरकाने पराभूत झाले.शिवसेनेचे अनंत गीते विजयी झाले.शिवसेना प्रथमच रायगडमध्ये जिंकली होती.शिवसेनेने केवळ रायगडच नव्हे तर मावळवरही भगवा झेंडा फडकविला होता.तेथे गजानन बाबर हे शिवसेना नेते विजयी झाले होते.2009 मध्ये शेकापने शिवसेनेला पाठिंबा दिला होता.जिल्हयात शेकापचे जवळपास अडिच लाख निर्णाय़क मते आहेत.ही मतं कोणाच्या पारड्यात पडतात याला जिल्हयाच्या राजकारण फार महत्व आह.
——————————————
रायगड लोकसभा मतदार संघ पूर्वीचे नाव — कुलाबा
रायगडचे आजपर्यतचे खासदार
1952 – सी.डी.देशमुख ( कॉग्रेस विजयी ) राजाराम राऊत ( पराभूत -शेकाप)
1957 – राजाराम राऊत ( शेकाप विजयी) दत्तात्रय कुंटे ( पराभूत – कॉग्रेस )
1962 – भास्कर दिघे ( कॉग्रेस विजयी ) राजाराम राऊत ( पराभूत -शेकाप)
1967 – दत्तात्रय कुंटे (शेकाप विजयी ) वसंत शिंदे ( पराभूत – शेकाप)
1971 – शंकर सावंत ( कॉग्रेस विजयी ) दत्ता पाटील ( पराभूत ः शेकाप )
1977 – दि.बा.पाटील ( शेकाप विजयी ) शंकर सावंत ( पराभूत कॉग्रेस )
1980 – ए.टी पाटील ( कॉग्रेस विजयी) दि.बा.पाटील ( पराभूत- शेकाप )
1984 – दि.बा.पाटील ( शेकाप विजयी) अ.र.अंतुले ( पराभूत कॉग्रेस )
1989 – अ.र.अंतुले (कॉग्रेस विजयी) दि.बा..पाटील ( पराभूत शेकाप )
1991 – अ.र.अंतुले ( कॉग्रेस विजयी ) दत्ता पाटील ( पराभूत शेकाप )
1996 – अ.र.अंतुले ( कॉग्रेस विजयी) अनंत तरे ( पराभूत शिवसेना
1998 – राम ठाकूर ( शेकाप -विजयी) अ.र.अंतुले ( पराभूत कॉग्रेस)
1999- राम ठाकूर ( शेकाप -विजयी) दि.बा.पाटील ( पराभूत सेना)
2004 -अ.र.अंतुले ( कॉग्रेस विजयी) विवेक पाटील ( पराभूत शेकाप)
2009 -अनंत गीते ( शिवसेना विजयी) अ.र.अंतुले ( पराभूत-कॉग्रेस
——————————
2009च्या निवडणुकीत शिवसेनेचे अनंत गीते यांना 4 लाख 31 हजार 546 म्हणजे 53.89 टक्के मते मिळाली आणि ते विजयी झाले.
कॉग्रेसचे अ.र.अंतुले यांना 2 लाख 67 हजार 25 म्हणजे 34.80 टक्के मते मिळाली आणि ते 1 लाख 46 हजार 521 मतांनी पराभूत झाले.अंतुले यांनी सर्वाधिक वेळा म्हणजे चार वेळा रायगडचे राजधानीत प्रतिनिधीत्व केले.
2009 मध्ये पूर्वीच्या कुलाबा लोकसभा मतदार संघाचे नामांतर झाले.रायगड हा नवा मतदार संघ अस्तित्वात आला.हा नवा मतदार संघ अस्तित्वात येत असतानाच जिल्हा दोन लोकसभा मतदार संघात विभागला गेला.
1 ) रायगड
2) मावळ
रायगड लोकसभा मतदार संघात रायगड जिल्हयातील पेण,अलिबाग,श्रीवर्धन ,महाड हे चार विधानसभा मतदार संघ आणि रत्नागिरी जिल्हयातील दापोली आणि गुहागर हे दोन विधानसभा मतदार संघ जोडण्यात आले.
मावळ लोकसभा मतदार संघात – रायगड जिल्हयातील पनवेल,उरण आणि कर्जत हे तीन विधानसभा मतदार संघ तसेच पुणे जिल्हयातील मावळ आणि पिंपरी-चिंचवड हे विधानसभा मतदार संघ जोडले गेले.2009च्या निवडणुका नव्या मतदार संघानुसारच झाल्या.
—————————————————
विधानसभा मतदार संघनिहाय रायगड जिल्हयातील 2014च्या निवडणुकांसाठी
मतदार यादी 30 जानेवारी राजी प्रसिध्द केली गेली.त्यानुसार जिल्हयात एकूण 18 लाख 70 हजार 637 मतदार आहेत.2009च्या तुलनेत ही संख्या जवळपास दीड लाखांनी जास्त आहे.
विधानसभा मतदार संघ निहाय लोकसंख्या
188 – पनवेल – 3,53,988
189 – कर्जत – 233,950
190- उरण – 2,44,353
191- पेण – 2,76,703
192 – अलिबाग – 2,70,023,
193 -श्रीवर्धन – 2,33,412
194 – महाड – 2,58,208
——————
18,70,637
——————–
———————————————————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here