रायगडातील औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

0
935

अलिबागनजिक असलेल्या भायखळा येथील फटाका निर्मिती कारखान्यास आग लागून अनेकांना आपले प्राण गमवावे लागल्याने रायगड जिल्हयातील औद्योगित सुरक्षिततेचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

जिल्हयात साठ वर्षांपूर्वी हिंदुस्थान ऑरगेनिक केमिकल्स हा कारखाना सुरू झाला.त्यानंतर जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून घोषित झाला.त्यामुळं कारखानदारीला प्रोत्साहन दिले गेले.त्यातून मोठी कारखानदारी जिल्हयात उभी राहिली.आज मित्तीला जिल्हयात वीस पेक्षा जास्त कामगार असलेले1539 कारखाने आहेत.यातील पन्नास टक्के पेक्षा जास्त कारखान्यात धोकादायक किंवा अतिधोकादायक श्रेणीतील रसायने वापरली जातात.काही ठिकाणी धोकादायक रसायने आणि वायूचा साठा करून ठेवावा लागतो.मात्र अशा धोकादायक श्रेणीतील कारखान्यात वर्षातून एकदा मॉकड्रील करणे आणि सेफ्टी ऑडीट कऱणे बंधनकारक असताना एखादं- दुसरा अपवाद वगळता असे होताना दिसत नाही.जिल्हयातील आऱसीएफ सारख्या काही सरकारी कंपन्या तसेच काही खासगी कंपन्या सेफ्टी ऑडीट करतात पण त्यांचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे येत नसल्याचे जिल्हा आपत्ती नियंत्रण अधिकारी सागर पाठक यांनी सांगितले.

भायखळा येथे ज्या क्रांती फायर वर्क्समध्ये स्फोट झाला तेथेही धोकादायक रसायने वापरली जात होती ,शेजारछ्‌या नदीत धोकादायक रसायने टाकली जातात याबद्दलच्या लेखी तक्रार पोलिसात देऊनही त्याबाबत कोणतीच कारवाई झाली नाही.अशाच प्रकार अन्यत्र सुरू असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने कुठे काही अगतिक घडले तर होणारी हानी भायखळाच्या घटनेपेक्षा किती तरी मोठी असेल.त्यामुळे भायखळा येथील घटनेची पुनरावत्ती जिल्हयात कोठेही होणार नाही याची खबरदारी घेण्याची गरज आता जिल्हयातील नागरिकांकडून व्यक्त होताना दिसते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here