Saturday, May 18, 2024
Home Blog Page 362

आपची दमबाजी थांबली नाही तर राज्यातील आपच्या कार्यालयासमोर पत्रकार निदर्शने कऱणार

0

आपल्या वागण्या-बोलण्यातील दुटप्पीपणा चव्हाट्यावर येत असल्याचे पाहून पिसाळलेल्या आपच्या नेत्यांनी राजकीय विरोधक सोडून माध्यमांनाच आपले विरोधक समजत माध्यमांवर शाब्दिक  हल्ले सुरू केले आहेत.देशातील माध्यमं विकली गेली आहेत,माध्यमांची निवडणूक आयोगाकडं तक्रार केली जाईल इथ पासून सत्ता आल्यास माध्यमवाल्यांना तुरूंगात डांबण्यापर्यतची भाषा आपचे नेते वापरू लागले आहेत.पायाखालची वाळू सरकू लागल्याने आपच्या नेत्यांचा तोल सुटला असल्यानेच ते माध्यमांवर खापर फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्या वक्तव्याचा आणि माध्यमांना दिल्या जात असलेल्या धमक्यांचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी आज निषेध केला आहे.

आपच्या नेत्यांची ही दम बाजी थांबली नाही तर त्यांच्याच पध्दतीने राज्यातील पत्रकार आपच्या  ठिकठिकाणच्या कार्यालयांसमोर निदर्शने कऱतील असा इशाराही पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने दिला आहे.

अरविंद केजरीवाल यांनी  सत्ता आल्यास माध्यमांना तुरूंगात टाकण्याची भाषा काल नागपूरमध्ये शाही खाण्याच्या वेळी केली आहे.त्यांच्या या वक्तव्याचे आज आशुतोष,संजय सिंह आणि अन्य नेत्यांनी दिल्लीत समर्थन केले एवढेच नव्हे तर माध्यमांची निवडणूक आयोगाकडे तक्रार कऱण्याची धमकीही त्यांनी दिली.आपच्या नेत्यांचे हे वर्तन माध्यमांची मुस्कटदाबी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग असून भारतातील माध्यमं त्यांचा हा प्रय़त्न कदापिही यशस्वी होऊ देणार नाहीत.माध्यम स्वातंत्र्याचे समर्थन करीत लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार झालेले केजरीवाल आज माध्यमांमुळेच आपला दुप्पटीपणा उजेडात येत असल्याने माध्यमांना दम देत सुटले आहेत.त्यांच्या या दमबाजीला देशातील माध्यमं भीक घालणार नाहीत असेही देशमुख यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

आपच्या धमक्यांचा धिक्कार

0

आपचे नेते मिडियावर पुन्हा घसरले,

केजरीवाल म्हणाले,सत्ता आली तर

मिडियावाल्यांना तुरूंगात टाकू

देशात क्रांती करण्यास आणि व्यवस्था परिवर्तनाची भाषा बोलणा़ऱ्या आम आदमी पक्षाचा दुटप्पीपणा जनतेसमोर मांड़ण्याचे आपले काम चोखपणे बजावणाऱ्या माध्यमांना आज अरविंद केजरीवाल,आणि आशूतोष यांनी धमक्या देत आपला मिडिया विरोध प्रकट केला.नव्हे ते मिडियावर अक्षरशः खवळले आहेत.त्यातूनच त्यांनी देशातील मिडिया विकला गेला असल्याचा आरोप केला आहे.
अरविद केजरीवाल आज नागपूर येथे होते.साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आणि प्रामाणिकपणाचा दावा करणाऱ्या केजरीवाल यांच्या पक्षाने निवडणूक निधी जणविण्यासाठी गुरूवारी नागपूर येथील एका फाईव्हस्टार हॉटेलमध्ये डिनर पार्टी आयोजित करण्यात आली होती.दहा हजार रूपये देणाऱ्या आम आदमीला या पार्टीत सहभागी करून घेण्यात आले होते.या आम आदमीपुढे बोलताना केजरीवाल यांनी मोदीबरोबरच मिडियालाही टार्गेट केले.
केजरीवाल यांनी घुमजाव केलेले असतानाच आज दिल्लीत आपच्या नेत्यांनी केजरीवाल यांच्या वक्तव्याचे समर्थन केले.आपच्या नेत्यांनी मिडियाच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे जाण्याची धमकीच माध्यमांना दिली.आपचे नेते संजय सिंह,आशुतोष,आशिष खेतान आणि दिलीप पांडे म्हणाले,मिडियावर संशय घेणे चुकीचे नाहीगेल्या काही दिवसात इंडिया टीव्ही,इंडिया न्यूज,झी न्यूज ,टाइम्स ऩाऊ यांनी केजरीवाल आणि आपच्या विरोधात मोहिमच उघडली आहे.या चॅनल्सच्या बातम्याचे फुटेज आमच्याकडे असून त्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे संजय सिंह यांनी सांगितले.
केजरीवाल म्हणाले,आमची सत्ता आल्यावर मिडियावाल्यांची चौकशी करून सगळ्यांना तुरूंगात टाकू.
आपल्या विधानाचे गांभीर्य़ केजरीवाल यांच्या तेव्हा लक्षात आले जेव्हा याची लाईव्ह बातमी वाहिन्यांवरून दिसायला लागली.त्यानंंंंंंतर नेहमीप्रमाणे केजरीवाल यांनी आपल्या वक्तव्याचा इन्कार करीत मी असे बोललोच नाहीची टेप वाजवायला सुरूवात केली.
माध्यमामुळेच आपची निर्मिती झाली आहे.जो पर्यत माध्यमं केजरीवाल यांचं कौतूक करीत होते तोपर्यत मिडिया स्वतंत्र होता,चांगला होता.आता आपच्या नेत्यांच्या वागण्या-बोलण्यातला विरोधाभास मिडिया लोकांसमारो आणू लागल्याने आपचे पितळ उघडे पडायला लागले आहे त्यामुळे विरोधक सोडून माध्यमंच आपले विरोधक असल्यासारखे केजरीवाल आणि त्यांची टोळी माध्यमांवर आरोप करायला लागली आहे.माध्यमांना तुरूंगात टाकण्याची केजरीवाल यांची भाषा त्यांच्या फॅसिस्ट मनोवृत्तीची द्योतक आहे.त्याचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करीत आहोत असे मत पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम,देशमुख यांनी व्यक्त केले आहे.माध्यमांना धमक्या देणाऱ्या आपच्या नेत्यांचा समितीने तीव्र शब्दात धिक्कार केला आहे.

रायगडमधूून शेकापतर्फे रमेश कदम

0

शेतकरी कामगार पक्षाने रायगड आणि मावळ मतदार संघासाठी आपले उमेदवार जाहीर केले असून रायगडमधून चिपळूण येथील रमेश कदम आणि मावळमधून लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली आहे.पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी आज ही घोषणा केली.विशेष म्हणजे रमेश कदम आणि लक्ष्मण जगताप हे दोन्ही उमेदवार राष्ट्रवादीची पार्श्वभूमी असलेले आहेत.2009च्या निवडणुकीत शेकापने मावळ आणि रायगडमध्ये शिवसेनेला पाठिंबा दिला होता आणि दोन्ही ठिकाणी सेनेचे उमेदवार विजयी झाले होते.

शेतकरी कामगार पक्षाची जाहीर सभा सध्या रायगड जिल्हयातील पेण येथे सुरू आहे.या सभेत जयंत पाटील यांनी वरील दोनही उमेदवारांची घोषणा करताना शिवसेनेबरोबरच्या पाच वर्षांच्या जुन्या युतीलाही पूर्ण विरााम दिला आहे.रायगड जिल्हा परिषदेत शेकाप आणि शिवसेनेची युती सत्तेत असून तेथील युतीही आता संपुष्टात येईल अशी शक्यता आहे.जिल्हा परिषदेतील युती तुटल्यानंतर तेथेही नवी समीकरणे जन्मास येण्याची चर्चा व्यक्त केली जात आहे.शेकापच्या या भूमिकेमुळे रायगडात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे,शिवसेनेचे अनंत गीते आणि शेकापचे रमेश कदम यांच्यात लढत होत असून मावळमध्ये शेकाप विरूध्द शिवसना अशीच लढत होईल

सुनील तटकरे बिनधास्त

0

रायगड हा कॉग्रेसचा परंपरागत मत दार संघ.इ थं नेहमीच कॉग्रेस विरूध्द शेकाप अशी लढत झालेली आहे.इतिहासात डोकावले असता आपणास दिसेल की, रायगडच्या मत दारांनी19 52 ते1984 या काळात झालेल्या प्रत्येक निवडणुकीत एकदा कॉग्रेसला आणि एकदा शेकापला संधी दिलेली आहे.1989मध्ये अ.र.अंतुले यांनी ही परंपरा खंडित करीत सलग तीन निवडणुकीत म्हणेज 89,91 आ़िण 1996 मध्ये रायगडवर वर्चस्व प्रस्थापित केले.1998आणि 1999मध्ये पुन्हा शेकापच्या रामशेठ ठाकूर यांनी रायगडमधून विजय संपादन केला.त्यानंतर 2004मध्ये कॉंग्रेसचे अंतुले पुन्हा विजयी झाले.2009मध्ये मात्र शिवसेनेच्या अनंत गीते यांनी अंतुलेंचा पराभव करीत रायगडावर भगवा फडकविला.हा सारा इतिहास पाहता बदल हा रायगडच्या मत दारांचा स्थायीभाव आहे हे आपणास दिसेल.हा निकष लावला तर यंदाही बदल अपेक्षित आहे.केवळ इतिहासाचाच दाखला देण्यात अ र्थ नाही तर बदलाची इ तरही काही कारणं आहेत.गेल्या वेळेस अनंत गीतेंच्या विजयाला शेकापच्या सहकार्याची मोठी किनार होती.रायगड लोकसभा मत दार संघात जिल्हयातील जे चार विधानसभा मत दार संघ आहेत त्यातील पेण आणि अलिबाग हे विधानसभा मत दार संघ आज शेकापकडे आहेत.श्रीवर्धन राष्ट्रवादीकडे तर महाड शिवसेनेकडे आहे.रत्नागिरीमधील गुहागर राष्ट्रवादीकडे आणि दापोली शिवसेनेकडे आहे.म्हणजे शेकाप,सेना आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षाकडे रायगड लोकसभा मत दार संघातील प्रत्येकी दोन विधानसभा मत दार संघ आहेत.2009मध्ये शेकाप आणि शिवसेना मिळून चार विधानसभा मत दार संघ होते.याचा फटका कॉग्रेसला बसला.अनंत गीत ेयांनी 53.89 टक्के म्हणजे 1 लाख 46 हजार 521 मतांनी अंतुलेंवर मात केली होती.2009मघ्ये शेकापचा उमेदवार नव्हता.पण त्याअगोदर 2004मध्ये जी लोकसभा निवडणूक झाली होती त्यात शेकापला अडिच लाखांच्यावर मते मिळाली होती.तेव्हा गुहागर आणि दापोली रायगडला जोडला गेलेला नव्हता आणि पनवेल -उरणही रायगडात होता त्यामुळं शेकापला जास्त मतं पडली असा त र्क लढवला गेली तरी पेण आणि पनवेलमध्ये शेकापची हक्काची पन्नास साठ हजार मतं आहेत.श्रीवर्धनमध्ये पंधरा ते वीस हजार मतं आणि महाडमध्ये दहा बारा हजारमतं धरली तरी ही सारी मतं दीड लाखांच्या घरात जातात.यावेळेस म्हणजे 2014मध्ये शेकापचा युतीला पाठिंबा नसल्याने ही सारी विजयी मतं अनंत गीते यांना मिळणार नाहीत.म्हणजे अनंत गीते यांचं तेवढं मताधिक्य कमी होणार आहे.अनंत गीते यांची दीड लाख मतं जर कमी झाली तर ते धोक्यात आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही.शिवसेनेतील अंतर्गत वादाचा फटकाही अनंत गीते यांना बसणार आहे.

– शेकाप यावेळेस युतीबरोबर जात नाही हे लक्षात आल्यानंतर सुनील तटकरे यांनी निवडणूक लढविण्याची तयारी दाखविली हे स्पष्ट आहे.वस्तुतःप्रारंभी सुनील तटकरे निवडणूक लढवायला फारशे उत्सुक नव्हते पण मत दार संघातील बदलती राजकीय समीकरणं पाहून त्यांनी निवडणूक लढविण्यास होकार दिला. – शिवसेना आणि शेकाप एकत्र नसतील तर मत विभाजनात फायदा आपलाच आहे हे तटकरे ओळखून आहेत.त्यामुळं त्यांनी हे धाडस केलं आहे.ते करताना त्यांनी कॉग्रेसच्या स्थानिक नेत्यांशीही जुळवून घेतलेलं दिसतंय.माणिक जगताप आणि सुनील तटकरे यांचा छत्तीसचा आकडा आहे.महाडमध्ये झालेल्या पराभवात तटकरे यांचा मोठा वाटा असल्याचा आरोप माणिकराव करीत असतात.परंतू यावेळेस परिस्थितीच अशी आहे की,माणिकराव प्रामाणिकपणे सुनील तटकरे यांना मदत करतील असे म्हणायला वाव आहे.कारण तटकरे यांच्यावरील प्रेमापेक्षा त्यात त्यांना आपला स्वार्थ दिसतो आहे.सुनील तटकरे जर दिल्लीत गेले तर आपला जिल्हयातील एक प्रबळ प्रतिस्पर्धी दूर होईल आणि पाच वर्षांचा बॅकलॉग भरून काढणे शक्य होईल असे माणिकरावांना वाटते.विधानसभेत सुनील तटकरे यांनी माणिक जगताप यांना मदत करावी असेही ठरलेले असू शकते.तिकडे अलिबाग आणि पेणमध्येही अनुक्रमे मधु ठाकूर आणि रवी पाटील यांनाही असाच शब्द दिलेला असू शकतो.त्यामुळे ही कॉग्रेसची नेते मंडळी सुनील तटकरे यांना मदत करील असेच आजचे चित्र आहे.कॉग्रेसला तिकीट न मिळाल्याने जे तथाकथित नाराज आहेत त्यांना राजी कसं करायचं हे तटकरे यांन ा बरोबर माहिती असल्याने त्याबाबत तटकरे बिनधास्त आहेत.सुनील तटकरे यांच्यासाठी आणखी एक जमेची बाजू अशी आहे की, कॉग्रेसचे वरील तीन नेते असोत की,शेकापचे जयंत पाटील यांना सुनील तटकरे दिल्लीत गेलेलेच हवे आहेत.कारण गेली जवळपास एक तप राज्यात सत्तेवर असलेल्या सुनील तटकरेंची जिल्हयात घट्ट पकड आहे.कॉग्रेस असेल किंवा शेकाप यांना तटकरे यांनी कोठेही डोकेवर काढू दिलेले नाही.सुनील तटकरेंच्या जिल्हयावरील या एकछत्री अंमलामुळे कॉग्रेस आणि शेकापची अनेक राजकीय गणितं सतत कोलमडून पडत असतात. िएवाय या साऱ्यांचीच तटकरेंशी सामना करताना दमछाक होते हे अनेक प्रसंगात दिसून आले आहे.अशा स्थितीत पालकमंत्रीपदावरून तटकरे दूर झाले आणि ते दिल्लीत गेले तर त्यांची जिल्हयावरील पकड अपोआप ढिली होईल आणि आपली राजकीय स्वप्नं पूर्ण करायला संधी मिळेल हे मनसुबे शेकाप आणि कॉग्रेसच्या तसेच राष्ट्रवादीच्याही नेत्यांचे आहेत.रायगडात तर च र्चा अशीही आहे की,आपला स्वतंत्र उमेदवार उभा
– करण्यामागं सुनील तटकरेंची पिडा दिल्लीला जावी अशीच जयंत पाटील यांची रणनीती असल्याचे सांगितले जाते.अन्यथा शिवसेनेला शेकापनं सोडचिठ्ठी देण्याचं कोणतंच कारण दिसत नाही.शेकाप आणि शिवसेना यांची जिल्हा परिषदेत आजही संयुक्त सत्ता आहे.या सत्तेवर पाणी सोडायला ज्या अ र्थी जयंत पाटील तयार झालेत त्या अ र्थी सुनील तटकरे दिल्लीत जावेत ही त्यांची सुप्त इच्छा आहे हे नक्की दिसते.राज ठाकरे यांच्याशी सलगी कऱण्याचा जयंत पाटील यांचा प्रयत्नही त्याचाच एक भाग होता. वस्तुतः – राज ठाकरे यांच्या मनसेचा रायगडात फारसा प्रभाव नाही हे जयंत पाटील यांना माहित होते म्हणजे राज ठाकरेंना बरोबर घेतल्याने रायगडात जयंत पाटलांचा पक्ष जिकणार होता असे नाही.राज ठाकरें यांनाही जयंत पाटलांची ताकद माहिती आहे.पण जयंत पाटलांना शिवसेनेपासून बाजुला करायचे होते म्हणून राज ठाकरे यांनी जयंतरावांना कुरवाळण्याचा प्रयत्न केला.अन्यथा ज्या शेकापला 2009च्या निवडणुकीत 1.11 टक्केच मतं मिळाली त्यांच्याबरोबर फरफट करून घेण्याएवढे राज ठाकरे अपरिपक्व राजकारणी नक्कीच नाहीत.घडलेही राज ठाकरेंना हवे असलेलेच.जयंत पाटील सेनेपासून दूर गेले.हे दूर जाणे राष्ट्रवादीच्या पथ्थ्यावर पडले.नव्हे तेवढ्यासाठीच केला होता अट्टाहास असे म्हणण्यासारखी स्थिती आहे.रायगडात सवतासुभा उभा कऱणे आणि मावळमध्ये लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा देणे याचे कारण राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष मदत करणे हेच आहे.कारण लक्ष्मण जगताप जरी अपक्ष असले तरी ते अजित पवारांचे उमेदवार आहेत हे लपून राहिलेले नाही.चर्चा अशीही आहे की,अजित पवारांच्या सूचनेवरूनच जयंत पाटील यांनी लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा जाहीर केला आहे.अन्यथा शेकापचा लक्ष्मण पाटलांशी काय संबंध?म्ङणजे मावळ असो किंवा रायगड असो या ना त्या कारणांनी शेकापची मदत राष्ट्रवादीलाच मिळणार आहे. .या सगळ्या राजकारणात जयंत पाटील यांचा कोणता राजकीय लाभ झाला याचं उत्तर त्यांच्याशिवाय अन्य कोणी देऊ शकणार नाही.विवेक पाटीलही नाही.याचं कारण निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी पनवेल,उरणमध्ये वाढणार आहे आणि रायगडात रत्नागिरीचा उमेदवार दिला जाणार असल्याने पक्षाला जिल्हयात त्याचा फार फायदा होणार नाही.रत्नागिरीचा उमेदवार दिल्याने रत्नागिरीत पक्ष वाढेल असे कोणालाच वाटत नाही.कारण तिकडे शेकापला कोणी विचारत नाही. या दोन्ही भूमिकांमुळे शेकापची मतं वाया जाण्याशिवाय काहीच घडणार नाही. जयंत पाटील यांची अशीच इच्छा असेल तर त्यात ते यशस्वी झाले असे म्हणावे लागेल.
– रायगडात आपनेही आपला उमेदवार उभा केला आहे.डॉ.संजय अपरांती यांना आपने शोधून काढले आहे.खाकी वर्दीतला माणूस कितीही सोशल असला तरी त्याच्याबद्दलची भिती कायम सामांन्य माणसाच्या मनात असते.डॉ.अपरांती यांच्याबद्दलही असेच आहे.ते काही काळ डीवायएसपी म्हणून रायगडात होते.पण नंतर त्यांना रायगडकर विसरेलीही होते.ते आता आपच्या तिकिटावर उभे आहेत.जिल्हयातील काही एनजीओंनी त्यांना पाठिंबा दिला आहे.एनजीओंची हजार दोन हजार मतं आणि आपवर विश्वास असलेल्या मध्यमवर्गींची काही मतं गृहित धरली तरी अपरांती फार मजल मारू शकणार नाहीत.त्यांच्या उमेदवारीचा तोटा सुनील तटकरेंना होईल असे कोणी बोलत असेल तर असे बोलणारे राजकीयदृष्ट्या अपरिपक्व आहेत असेच समजावे.
– रायगडातील ही सारी राजकीय स्थिती सुनील तटकरेंना अनुकूल असल्यानेच त्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचा नि र्णय घेतला.तटकरे दिल्लीत रमणार नाहीत.ते आज ना उद्या राज्यात येणारच पण त्यासाठी लोकसभा जिंकणेही आवश्यक आहे हे ते ओळखून आहेत.कोणताही पराभव राजकारण दहा वेर्षे मागे घेऊन जातो हा अनुभव विजयसिंह मोहिते पाटलांसह अनेकांना असल्याने सुनील तटकरे सावध होते.गेला महिनाभर त्यांनी सारी चाचपणी केल्यानंतर आणि सारे डाव आपल्याला अनुकूल पडत आहेत असे लक्षात आल्यावर सुनील तटकरेंनी पक्षश्रेष्ठींना होकार कळविला आणि आता त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.निवडणुका लढविण्याचा त्यांचा अनुभव लक्षात घेता ते कधीच गाफिल राहात नाहीत.यावेळेसही त्यांना त्यांच्या राजकीय कौशल्याचा लाभ होणार हे नक्की.राहिला प्रश्न त्यांच्यावरील सिंचन घोटाळ्यातील आरोपांचा.त्याचा जिल्हयातल्या मत दारांवर काही फरक पडेल असे वाटत नाही.शिवाय त्यांच्यावर झालेल्या आरोपांची उजळणी ना शेकाप करेल,ना आप.त्यामुळे ते आरोपही कळीचा मुद्दा ठरतील असा कोणाचा त र्क असेल तर तो देखील खोटा ठरण्याचीच शक्यता आहे.म्हणजे सुनील तटकरेंचे पारडे नक्कीच जड असणार हे स्पष्टय.
एस.एम.देशमुख

खालापुरात मतदार जनजागृती रॅली

0

रायगड जिल्हयात मतदार नोंदणी आणि मतदार जागृतीची विशष मोहिम हाती घेण्यात आली असून या मोहिमेअंतर्गत नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवट दिवसापर्यत मतदार नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी दिली
लोकप्रतनिधीत्व अधिनियम 1950 अन्वये मतदार जनजागृती अभियानाअंतर्गत खालापूर येथे सांसदीय लोकशाही पध्दतीमधील निवडणूक प्रक्रियेचे महत्व नागरिकांना पटवून देण्यासाठी गुरूवारी खालापूर येथे मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन कऱण्यात आले होते.या रॅलीला जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून त्याचे उद्घघाटन करण्यात आले त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी वरील आवाहन केले.

फरारी नितीश ठाकूरची अटकपूर्व जामिनीसाठी धडपड

0

कोट्यवधी रूपयांच्या घोटाळा प्रकरणी पोलिसांना हवा असलेला तत्कालिन उपजिल्हाधिकारी नितीश ठाकूर याला कोर्टाने फरारी घोषित केल्यानंतर त्याने आता पुन्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनीसाठी न्यायालयात दाखल केला आहे.ठाकूरची तब्बल 118 कोटींीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.1988 ते 2010 या काळात उपजिल्हाधिकारी असताना ठाकूर यांने प्रचंड प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता जमा केली होती असा आरोप लाचलुचपत विभागाने केला होता.खंडणी मागितल्याच्या आरोपावरून त्याला 2013 मध्ये निलंबित कऱण्यात आले होते.हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाच नितीश ठाकूर न्यायालयात हजर राहत नसल्याबद्दल न्यायालयाने त्याच्यावर अटक वॉरंट बजावले होते.त्यावेळेस तो नेपाळमध्ये पळून जात असताना त्याला नेपाळच्या सिमेवर पकडण्यात आले होते.त्यानंतर त्याची जामिनावर मुक्तता झाली होती मात्र त्यानंतरही तो न्यायालयात हजर राहत नसल्याने त्यााला सहा महिन्यापूर्वी फरारी घोषित कऱण्यात आले होते.आता अटकेच्या भितीने त्याने पुन्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनीसाठी काल अर्ज केला आहे.त्याच्यावर अजून दोषारोपपत्र दाखल केले गेलेले नाही.

केजरीवांलाचे टार्गेट मिडिया

0

आरंभीच्या काळात माध्यमांबद्दल भरभ़रून कौतूकाचे बोल बोलणारे आपचे सर्वेसर्वा अऱविंंद केजरीवाल आता सातत्यानं माध्यमांवर आगपाखड करायला लागले आहेत.काही माध्यमं पैसे घेऊन मोदीसाठी आम्हाला बदनाम करीत आहेत असा आरोप केजरीवाल यांनी आज एका मुलाखतीत केला तर दुसरीकडे कालच्या मुंबई भेटीत जो गोंधळ झाला त्यालाही केजरीवाल यांनी माध्यमांनाच जबाबदार धरले आहे.माध्यमांचा अतिउत्साहामुळे कालचा दौरा पूर्णपणे कोसळला असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

केजरीवाल आता आम राहिले नाहीत ते खास झाले आहेत.हे त्यांना स्वतःलाही माहिती आहे.त्यामुळे ते जेथे जातील तेथे माध्यमं बातमीसाठी त्यांचा पाठपुरावा करणार हे सारं माहिती असतानाही त्यांनी रिक्षातून प्रवास कऱणं,रेल्वेतून जाणं आणि ते ज्या आम आदमीबद्दल गळा काढत असतात त्यांचीच अडचण करणं योग्य आहे काय याचा विचार केजरीवाल पक्षाने करण्याची गरज आहे.रिक्षातून अथवा रेल्वेतून प्रवास करण्यासाठी सर्वसामांन्य माणसाला पोलिसांची परवानगी घ्यावी लागत नाही हे जरी खरे असले तरी सामांन्य माणसामुळे कोंडी होत नाही.ज्याच्यामुळे कोंडी होते त्यांनी आपल्यामुळे जनतेला त्रास होणार नाही हे पाहिले पाहिजे.हे सारं करायचं त्यावर माध्यमांनी टीका केली की,पुन्हा माध्यमांच्या नावाने बोटं मोडायचे हे योग्य नसल्याची भावना व्यक्त होत आहे.
चर्चगेटवरचे स्कॅनर्स माध्यमांच्या रेटारेटीमुळेच पडलेअसे आपने म्हटले आहे.त्यात आमचा काही संबंध नाही.उलट हे स्कॅनर आपच्या कार्यकर्त्यानी व्यवस्थित ठेवले असेही आपने म्हणत माध्यमांना टार्गेट केले आहे.बातमी सत्य असली तरी ती आपल्या विरोधात असली की,सारेच पिसाळतात अरविंद केजरीवाल आणि त्यांचा पक्षही आता त्याला अपवाद राहिलेला नाही.

पत्रकाराला मारपीट, मानवाधिकार आयोगाची पोलिसांना चपराक

0

सच कहू चे पत्रकार संदीप कुमार यांना 17 ऑगस्ट 2012 रोजी पोलिसांनी अत्यंत बेकायदेशीररित्या ताब्यात घेत त्यांना पोलिस कोठडीत डांबून त्यांना बेदम मारहाण केली होती.त्यांना दोषी ठरविण्यासाठी त्यांच्या हातात जबरदस्तीने तलवार देऊन त्याचे फोटो देखील काढले होते.या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला गेला आणि माध्यमकर्मींनी त्याविरोधात उग्र निदर्शनेही केली होती.या घटनेच्या विरोधात मानवाधिकार आयोगाकडेही तक्रार करण्यात आली होती.त्यानुसार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने चौकशी अहवाल सादर कऱण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार अंबाला ग्रामीणचे नाजनीन भसिन यांनी अहवाल सादर केला होता पण त्याने आयोग समाधानी नव्हता.आयोगाच्या मते या चौकशी अहवालात पत्रकाराने दिलेल्या पुराव्याक डे दुर्लक्ष केलेले होते.त्यामुळे आता आय़ोगाने नव्याने पोलिस महासंचालक श्रीनिवास वशिष्ट यांना अहवाल सादर करायला सांगितले आहे.त्यासाठी सहा आठवड्याची मुदत दिली गेली आहे.या घटनेमुळे अंबाला आणि एकूणच हरियाणातील पत्रकार आनंदीत आहेत.

आपल्याकडेही पोलिस मनमानी पध्दतीने पत्रकारांना त्रास देत असतात.अशा पोलिसांच्या विरोधात मानवी हक्का अयोगाकडे तक्रार करता येते.या आयोगाचे मुंबईतील कार्यालय छत्रपती शिवाजी टर्मिनस जवळ आणि मराठी पत्रकार परिषदेचे कार्यालय ज्या परिसरात आहे तेथेच आहे.

माणगावमध्ये बनावट नोटा सापडल्या

0

रायगड जिल्हयातील माणगाव येथील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत हजार रूपयांच्या दोन आणि पाचशे रूपयांच्या दोन अशा एकून तीन हजार रूपयांच्या बनावट नोटा आढळल्याने खळबळ उडाली आहे.

बॅेकेतील रक्कम रिझर्व्ह बॅकेकडे जमा झाल्यानंतर तेथे हा प्रकार उघडकीस आला.या प्रकऱणी माणगाव शाखेचे कॅशियर नारायण जानबा सोनावणे यांनी माणगाव पोलिसात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.या प्रकऱणी पोलिस चौकशी करीत आहेत.

डुकरासाठी लावलेल्या फासकीत बिबटया अडकला

0

डुकरासाठी लावलेल्या फासकीत बिबट्या अडकल्यानंतर वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल अडीच तास अथक प्रयत्न केल्यानंतर बिबट्याची सुटका करण्यात येश आले.बिबट्याला नंतर फणसाड अभयारण्यात सोडण्यात आले.रायगड जिल्हयातील मुरूड खारआंबोली येथे शनिवारी सायंकाळी ही घटना घडली.

डुकरांची शिकार करण्यासाी केबल वायरचे मजबूत फासे अनेकदा लावले जातात.त्यात विविध प्राणी अडकतात.काल बिबट्याच त्यात अडकला.स्वतःची सुटका करून घेण्यासाठी धडपडणारा बिबट्या मोठमोठ्याने डरकाळ्या फोडत होता.त्यााचा आवाज ऐकुन गावकऱ्यांनी वनविभागाला त्याची खबर दिली.वनविभागाच्या लेपर रेस्क्यू टिमने तब्बल अडीच तासाच्या प्रयासानंतर बिबट्याची सुखरूप सुटका केली.नंतर त्याला नजिकच्या फणसाड अभयारण्यात सोडण्यात आले.बिबट्या26 कोलो वजनाचा होता.

POPULAR POSTS

error: Content is protected !!