अलिबाग – शेतकरी कामगार पक्ष राज्यात ३० ते ३५ ठिकाणी आपले उमेदवार उभे करणार असून उमेदवारांची घोषणा १५ आॅगस्टनंतर करण्यात येईल अशी घोषणा शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी आज पनवेलनजिक खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळच्या मैदानावर आयोजित मेळाव्यात केली.शेतकरी कामगार पक्षाचा आज ६७वा वधार्पनदिन पनवेल येथे साजरा करण्यात आला.पक्ष स्वबळावर निवडणुका लढविणार आहे की,अन्य कोणाबरोबर युती करणार आहे यावर त्यांनी काही भाष्य केले नाही.रायगड जिल्हयातील अलिबाग,पेणचे पक्षाचे उमेदवार आज जाहीर होतील अशी अपेक्षा होती मात्र जयंत पाटील उमेदवार जाहीर करू शकले नाहीत.