पुरस्कार म्हणजे एखादया व्यक्तीनं आपल्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याची पोचपावती असते.पुरस्कारांचे स्वरूप असे असले पाहिजे की,तो देणारांनाही आनंद झाला पाहिजे आणि घेणारांनाही त्याचं अप्रूप वाटलं पाहिजे.हल्ली असं होताना दिसत नाही.पुरस्कार देणार्‍यांकडं आणि तो घेणार्‍यांकडंही संशयानं पाहिलं जातं अशी स्थिती आहे.याला काही सन्माननिय व्यक्ती आणि संस्था नक्कीच अपवाद आहेत मात्र पुरस्कारांचा बाजार मांडला गेलाय हे नक्की.
हे पुरस्कार पारायण आठवण्याचं कारण रायगड जिल्हा परिषदेचे घाऊन रायगड भूषण पुरस्कार.रायगड जिल्हा परिषदेने जेव्हा रायगड भूषण पुरस्कार द्यायला सुरूवात केली तेव्हा जिल्हयातील पाच व्यक्तींना हा पुरस्कार दिला जायचा.त्याला प्रतिष्ठाही होती आणि घेणाऱयांनाही त्याचं अप्रुप होतं.मात्र या पुरस्काराचीं संख्या दरवर्षी वाढत गेली आणि त्याचं महत्वही संपून गेलं.रायगड भूषण पुरस्कार हा टंगलीचा,हेटाळणीचा विषय झाला.कारण हे पुरस्कार घाऊक स्वरूपात दिले जाऊ लागले.विशेषतः निवडणुकांच्या तोंडावर हे पुरस्कार दिले जाऊ लागले आणि त्यात कर्तृत्वापेक्षा खूष करण्याचा भाव महत्वाचा होऊ लागला.वरती जे झायाचित्र दिले आहे ते खूष पुरस्काराचे आहे.पुरस्कार स्वीकारण्यासाठी रांगच रांग लागलेली दिसते आहे.किती पुरस्कार दिले असतील रायगड जिल्हा परिषदेने.. ? लोकसभा निवडणुकांच्या अगोदर 150 आणि आता विधानसभा निवडणुकांच्या अगोदर 186 लोकांना हे पुरस्कार दिले गेले आहेत.म्हणजे या वर्षात एकून 336 रायगड वासियांना हे पुरस्कार दिले गेले आहेत..आणखी एखादी निवडणूक असती तर आणखी दोनशे लोकांना हे पुरस्कार दिले गेले असते.रायगड भूषण पुरस्कार जिल्हा परिषदेचा आहे.मात्र सत्ताधार्‍यांनी हे पुरस्कार निवडणुकांशी जोडले आहेत.ज्यांना पुरस्कार दिला ते आपले मिद्दे झाले आहेत अशी समजूत सत्ताधारी करून घेत असावेत.रायगडवासियांनीच आात या पुरस्कारांवर बहिष्कार टाकला पाहिजे.
छायाचित्र सौजन्य ः रायगड टाइम्स अलिबाग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here