बँक ऑफ इंडियाचा अभिनव उपक्रम
नोटा बंदी मुळे बॅक आणि एटीएम समोर रांगा लावणार्या रायगडवासियांना दिलासा देणाऱा अभिनव उपक्रम बँक ऑफ इंडियाच्या रायगड विभागाने सुरू केला आहे .या उपक्रमाअंतर्गत बॅकेच्या दोन गाडया जिल्हयाच्या ग्रामीण भागात जाऊन ग्राहकांना सुलभपणे रक्कम बॅकेत भरणे किंवा काढण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहेत .बॅक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना त्यांचे खातेबुक,आधारकार्ड किंवा रूपे कार्ड वापरून त्यांच्या खात्यात 10 हजार रूपयांचा भरणा किंवा अडीच लाख रूपयांपर्यंत रक्कम काढता येणार आहे.बँकेच्या या गाडयांना आज बॅकेच्या रायगड विभागाचे प्रमुख गिरीष कुमार सिंह,उपविभाग प्रमुख चंद्रकांत पराते तसेच अग्रणी बँकेचे प्रवंधक टी.मुधुसुदन यांच्या हस्ते आज हिरवा झेंडा दाखविण्यात आला.आज पहिल्याच दिवशी अनेक ग्रामस्थांनी बँकेच्या या योजनेचा लाभ घेतला.सामांन्य जनतेने या उपक्रमाचे स्वागत केले आहे.