Sunday, May 19, 2024
Home Blog Page 374

श्रीवर्धन-म्हसळा तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार – तटकरे

0

रायगड : श्रीवर्धन-म्हसळा तालुक्याच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल तटकरे यांनी रायगड पाटबंधारे विभाग कोलाड विभागतर्फे कुडकी लघुपाटबंधारे योजनेच्या नविन विमोचकाचे बांधकाम व भूमिपूजन समारंभ प्रसंगी केले. या प्रसंगी श्रीवर्धन तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष महंमद मेमन, पंचायत समिती सभापती स्वाती पाटील, जिल्हा परिषद सदस्य श्याम भोकरे, श्रीवर्धनचे नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे, सरपंच जगदास चौलकर, अधिक्षक अभियंता वाडगावे, कार्यकारी अभियंता चव्हाण आदी उपस्थित होते. श्री. तटकरे म्हणाले की, कुडकी धरणास मोठी गळती लागली होती. येथील ग्रामस्थ व अधिकाऱ्यांनी अथक प्रयत्न करुन ती थांबविली. यामध्ये धरणाच्या मुख्य विमोचक विहिरींचे नुकसान झाल्याने या धरणावर अवलंबून असलेली कुडकी, वडवली, शिस्ते, गोंडघर, भावे गावातील जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये म्हणून नियोजनबध्द पध्दतीने पाणी पुरवठा करण्यात आला. या धरणाच्या दुरुस्तीचे काम दर्जेदार व मर्यादित वेळेत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी आमदार निधीतून वडवली येथे बांधण्यात आलेल्या भंडारी समाज सभागृहाचे उद्घाटनही श्री. तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

सुजीत आंबेकर सातारा जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक

0

सातारा जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या निमंत्रकपदी सुजीत बाळासाहेब आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली आव्याची माहिती महाराष्ट पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस एम देशमुख यांनी काल सातारा येथे दिली.
समितीच्या अन्य सदस्यांमध्ये विनोद सूर्यनारायण कुळकर्णी,शरद तात्यासाहेब काटकर,हरिष यशवंत पाटणे,मधुसुदन पत्की यांचा समावेश आहे.
जिल्हयातील पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याच्या विरोधात आवाज उठविण्याचं काम समिती करणार आहे.तसेच पत्रकार पेन्शन योजना आणि  पत्रकारांच्या अन्य प्रश्नासाठीही समिती लढा देईल.येत्या 17 फेबुवारी रोजी राज्यातील डीआय़ओ कार्यालयांना घेराव घालण्यात येणार आहे.हे आंदोलन साताऱ्यात यशस्वी करून दाखव्विमार असल्याची माहिती सुजित आंबेकर यांनी दिली.

सवाल का जबाब थप्पड से

0
टीव्हीच्या पत्रकारास 91 वर्षी य
शंकराचार्यांनी लगावली थप्पड
साधू संताना हल्ली झालंय काय तेच कळत नाही,आसाराम आपल्या  “काम” वर नियंत्रण ठेवू शकले नाहीत तर  व्दाककापिठाचे शंकराचार्य स्वरूपानंद  सरस्वती यांना आपल्या “क्रोधा”वर नियंत्रण ठेवता येत नाही असं दिसतयं.मोदी संबंधी एक प्रश्न स्वरूपानंदांना विचारल्यानंतर त्यांनी थेट टीव्ही  पत्रकाराच्याच श्रीमुखात भडकावली.मध्य प्रदेशातील जबलपूरच ी ही घटना आहे.
शंकराचार्यांनी ज्या पत्रकाराला थप्पड मारली तो आय़बीसी24 या वाहिनीचा पत्रकार आहे.नरेद्र मोदी पंतप्रधान होतील काय? असा प्रश्न विचारल्यावर शंकराचार्य भडकले आणि त्यांना आपल्या साधूत्वाचाच विसर पडला आणि त्यांनी पत्रकाराला थप्पड मारली.थप्पड मारताना ते म्हणाले,” भाग जा राजनीतीपर बात नही करनी हमे”.
या घटनंतर धर्मगुरू असलेले प्रमोद कृष्णन यांची प्रतिक्रिया हास्यास्पद होती.ते म्हणाले,” संतो के गुस्से को भी आशीर्वाद मानना चाहिए” . वरिष्ठ पत्रकार एन,के,सिंंग यानी या घटनेचा निषेध करीत शंकराचार्य याचं कृत्य घृणास्पद आणि गुन्हेगारीस्वरूपाचे असल्याचं म्हटलं आहे.
शंकराचार्यंच्या शिष्यांचंी थेरी वेगळीच आहे.संबंधित पत्रकार माईक घेऊन स्वरूपानंद महाराजांच्या फारच जवळ आला होता.डॉक्टरांनी 91 वर्षीय महाराजांना लोकांपासून दूर राहण्यास सांगितले आहे.त्यामुळे महाराजांनी माईक दूर केला. हे शंकराचार्य राजकीयदृष्टया कॉग्रेसच्या जवळचे मानले जातात.अधुन-मधून ते राजकारणावर वाट्टेल तसे भाष्य करीत असतात.शंकराचार्यांना राजकारणात असलेली रूची लक्षात घेऊनच पत्रकाराने त्यांना राजकीय प्रश्न विचारला होता.पण त्यांना प्रश्न रूचणारा नसल्यानं त्यांनी या प्रश्नाचं उत्तर थप्पडच्या स्वरूपात दिलं.

पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती टीव्ही पत्रकाराला शंकराचार्यांनी केलेल्या मारहाणीचा तीव्र शब्दात धिक्कार करीत असून शंकराचार्यांवर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करीत आहे.

लातूरचे पत्रकार रवींद्र जगताप यांच्यावर हल्ला

0

रवींद्र जगताप हल्ला प्रकरण: पत्रकार
संघानं खडसावलं मेडीकलच्या प्रशासनाला

लातूर दि.१० फेब्रुवारी: लातूरचे पत्रकार रवींद्र जगताप यांना वृत्तांकन करीत असताना सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मारहाण केली होती. याचा सर्वत्र निषेध होत असून लातूर जिल्हा पत्रकार संघाने अधिष्ठाता दिप्ती डोणगावकर यांची भेट घेऊन निवेदन दिले, जाबही विचारला. अध्यक्ष अशोक चिंचोले यांच्या नेतृत्वाखाली सगळे पत्रकार पत्रकार संघाच्या कार्यालयात जमले. त्यांनी लातूर शहरात पडत असलेल्या वाईट पायंड्याला विरोध केला, आज हे विद्यार्थी पत्रकारांना मारतात, उद्या रुग्णांना मारतील, परवा महाविद्यालयाच्या प्रशासनालाही बडवायला कमी करणार नाहीत ही बाब निदर्शनास आणून दिली. चिंचोले यांनी निवेदन दिल्यानंतर डोणगावकरांनी पत्रकारांचीच उलटतपासणी सुरु केली, असुविधेबाबत कशी तक्रार करायची असते याचे डोस पाजण्याचे प्रयत्न केले तेव्हा हे डोस रुग्णांना-सामान्यजणांना पाजवा, त्यांनाच आधी गरज आहे, अडचण आली की पत्रकारांना वेठीला का धरता असा सवाल यावेळी करण्यात आला. आधी असं काही घडलंच नाही हे आस्थाहीन स्वरात ऐकवण्याचा प्रयत्न डोणगावकरांनी केला. नंतर मवाळ स्वरात चौकशी करुन कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. यावेळी अरुण समुद्रे, विजयकुमार स्वामी, प्रदीप नणंदकर, एजाज शेख, अनिल पौलकर, महेंद्र जोंधळे, शशिकांत पाटील, निशांत भद्रेश्वर, अरविंद रेड्डी, पंकज जैस्वाल, काकासाहेब घुटे, इस्माईल शेख, आनंद माने, विजय कवाळे, परमेश्वर कंदले, रवींद्र जगताप, तम्मा पावले, हारुण सय्यद, लिंबराज पन्हाळकर यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.
या आधी पत्रकारांनी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांची भेट घेऊन निवेदन देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर संबंधित विभागाला आदेशित केलं जाईल असं सांगण्यात आलं. –

बोला आता काय करायचं ?

0

पत्रकार दिनकर रायकर,अरूण साधू

दिलीप चावरे यांचा पत्रकार 

संरक्षण कायद्यास जाहीर विरोध
 पुणे जिल्हयातील आंबेपूर तालुका पत्रकार संघाच्यावतीनं आज मंचर येथे सभोवतालच्या पाच तालुक्यातील पत्रकारांसाठी कार्यशाळा आयोजित कऱण्यात आली होती.या कार्यशाळेच्या उद्घघाटन कार्यक्रमास विधानसभेचे अध्यक्ष श्री.दिलीप वळसे पाटील,ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर,अरूण साधू,दिनकर रायकर,दिनेश गुने,श्रीकांत बोजावार , दिलीप चावरे,एस.एम,देशमुख किरण नाईक उपस्थित होते.माझ्या भाषणात मी पत्रकारांना संरक्षण मिळालेच पाहिजे आणि पत्रकारांना राज्यात पेन्शन योजना लागू  केली पाहिजे हे आपले मुद्दे जोरदारपणे मांडले.त्याची कारणंही मी विस्तारानं मांडली.हे सांगताना केतकर,रायकर,अरूण साधू या ज्षेष्टांनी आमच्या चळवळीस मार्गदर्शन करावे,पाठिंबा द्यावा अशी विनंतीही केली.
दुदैर्वाने  या ज्येष्ठ पत्रकारांपैकी,दिलीप चावरे यांनी पत्रकारांच्या या दोन्ही मागण्यांना विरोध दर्शविला,अरूण साधू यांनीही विरोधाी सूर आळवला .दिनकर रायकर यांनी पत्रकार संरक्षण कायद्याला विरोध आहे मात्र पत्रकार पेन्शन योजना लागू झाली पाहिजे असे मत व्य़क्त केले .ग्रामीण भागातील पत्रकार गरीब आहेत हे मान्य नाही असेही अत्यंत धाडशी विधान त्यांनी केले. कुमार केतकर यांनी पत्रकारांच्या दोन्ही मागण्यांकडं  दुर्लक्ष करीत माध्यमं बेजबाबदार,निर्बुन्ध आणि आळशी झाली आङेत हे सांगताना त्याची काही उदाहरणं दिली.विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी तुमच्या मागण्या सरकारपर्यत पोहोचवितो असे आश्वासन दिले.सर्वच ज्येष्ठ पत्रकारांनी पत्रकारांच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष क रून पत्रकारांच्या मागण्यांबद्दल नकारात्मक सूर काढल्याबद्दल उपस्थित पत्रकारांनी तीव्र नारजी व्यक्त केली.
माझं भाषण होऊन गेल्यानंतर ज्येष्ठांची भाषणं झाल्यानं मला त्यांंंच्या वक्त व्याचा प्रतिवाद करता आला नाही पण समारोपाच्या भाषणात मी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीची भूमिका जोरदारपणे मांडताना सकाळच्या सत्रात ज्येष्ठ पत्रकारांनी उपस्थित केलेल्या मुद्यांचा विस्ताराने प्रतिवाद  केला  काही ज्येष्ठांचा कायद्याला आणि पेन्शनला विरोध असला तरी  राज्यातील 98 टक्के पत्रकारांना कायदा आणि पेन्शन पाहिजे असल्याने त्यासाठीची लढाई चालूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.दुपारच्या सत्रात खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकारांच्या मागणीस पाठिंबा देत पत्रकार संरक्षण कायद्‌ायचं खासगी बिल आपण लोकसभेत मांडलं पण ते चर्चेला आल नाही असं सांगितल.आपण पुन्हा त्यासाठी प्रय़त्न कऱणार असल्याचं आश्वासनही दिलं.पत्रकार संरक्षण कायदा झालाच पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
राज्यातील काही ज्येष्ठ पत्रकार कायद्याला विरोध करीत असल्याने सरकारला निमित्त मिळते आणि पत्रकारांमधीलच एका गटाचा कायद्याला विरोध असल्याचे कारण सांगत सरकार पळवाट शोधून काढते .कायद्याचा पाळणा हालत नाही यास जेवढे राजकारणी जबाबदार आहेत तेवढेच आपल्यातील काही मंडळीही जबाबदार आहे  हे सांगताना नक्कीच मला मानसिक क्लेश होतात.मात्र हा सारा विरोध गृहित धरून आपणास ही चळवळ पुढे न्यायची असल्याने येत्या 17 फेब्रुवारीस आपणास आपली ताकद दाखवावी लागेल.तसेच राज्यातील बहुसंख्य पत्रकार कायद्याच्या,पेन्शनच्या बाजुने आहेत हे देखील दाखवून द्यावे लागेल.
आंबेपूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष डीकेवळसे पाटील यांनी आय़ोजित केलेल्या या कार्यक्रमास दोनशेच्या जवळपास पत्रकार उपस्थित होते..

पत्रकारांच्या एकजुटीचा पहिला विजय

0

अधिस्वीकृती नसलेल्या पत्रकारांनाही आता

विशेष बाब म्हणून मिळणार कल्याण निधीचा लाभ

 महाराष्ट्रातील पत्रकारांचा वाढता दबाव  आणि एकजूट यांचा  आता हळूहळू  परिणाम जाणवू लागला आहे.महाराष्ट्र सरकारची शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी नावाची व्यवस्था आहे.या योजनेमार्फत गरजू पत्रकारांना उपचारासाठी काही निधी दिला जातो.वास्तव असे आहे की,या निधीचा जो जीआर आहे त्यात कुठेही केवळ अधिस्वीकृतीधारक पत्रकारानाच मदत करावी असे म्हटलेले नसले तरी अधिकाऱ्यांनी मनमानी पध्दतीने अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाच या योजनेचा लाभ दिला होता.त्यामुळे नाशिकचे ज्येष्ठ पत्रकार सुरेश अवधूत यांनाही मदत नाकारली गेली.अखेर त्यांचे निधन झाले होते.हा पोरखेळ बंद झाला पाहिजे अशी मागणी वारंवार पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने केली होती.राज्यातील सर्वच गरजू पत्रकारांना या योजनेचा लाभ मिळायला हवा अशी आमची भूमिका होती.आज मराठी पत्रकार परिषदेचे किरण नाईक,विधीमंडळ वार्ताहर संघाचे प्रवीण पुरो तसेच अन्य संधटनांच्या प्रतिनिधींनी  बैठकीत हा मुद्दा उपस्थित करून तो जोरदारपणे मांडला.त्यामुळे माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या सचिव मनिषा पाटणकर यांनी तो मुद्दा मान्य करीत विशेष बाब म्हणून अधिस्वीकृती नसलेल्या पत्रकारांनाही या योजनेचा लाभ देण्याचे मान्य केले.मला वाटतं हा आपल्या एकजुटीचा आणि दबवाचा विजय आहे.आज जवळपास साडेचार लाख रूपये गरजू पत्रकारांसाठी मंजूर करण्यात आले.
आजच्या बैठकीत एक धक्कादायक बाब समोर आली.समितीचे काही सदस्य वारंवार बैठकांना दांड्या मारतात.ज्यांना या समितीत स्वारस्य नाही किवा ज्यांना वेळ नाही अशांना बैठकीत सदस्य म्हणून बोलावले जाते आणि त्यांच्या अनुपस्थितीकडेही दुर्लक्ष केले जाते हे संतापजनक आहे.आज काही सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यावर जे तीन बैठकांना गैरहजर राहतील त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
आणखी एक महत्वाचा मुद्दा.महाराष्ट्रतील निवृत्त पत्रकारांना पेन्शन सुरू होण्याची शक्यता आहे.शासन येत्या चार-आठ दिवसात तसा नि र्णय घेऊ  शकते पण पुन्हा तेच अधिस्वीकृतीधारकांंंंनाच ही पेन्शन दिले जाण्याचा धोका आहे.त्यालाही आपण लेखी विरोध केलेला आहे.ज्यांचं वय साठ वर्षे आहे,ज्यांनी किमान वीस वर्षे पूर्णवेल पत्रकारिता केलेली आहे आणि ज्यांचं सध्याचं उत्पन्न दोन लाख रूपयांपेक्षा कमी आङे अशा सर्व पत्रकारांना पेन्शन मिळाले पाहिजे ही आपली भूमिका आहे.प्रत्येक जिल्हयातील पत्रकारांनी या संबंधिची निवेदनं तातडीने मुख्यमंत्री कार्याळयाकडे पाठवावीत ही विनंती आहे.

१७ फेब्रुवारीचे आंदोलन सर्व शक्ती निशीयशस्वी करणार मराठी पत्रकार परिषदेचा निर्धार..

0

पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने जाहीर केलेले १७ फेब्रुवारी चे डी.आय.ओ कार्यालयाला घेराव आंदोलन पूर्ण शक्ती निशी यशस्वी करण्याचा निर्धार मराठी पत्रकार परिषदेच्या काल पुण्यात झालेल्या बैठकीत करण्यात आला.बैठकीच्या अध्यक्ष स्थानी परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक होते.राज्यभरातील ३५ पैकी २९ जिल्ह्यातील प्रतिनिधी आणि जिल्हा अध्यक्ष बैठकीला उपस्थित होते.१७ फेब्रुवारीच्या आंदोलनाची तयारी आणि संघटनात्मक बाबीवर चर्चा करण्यासाठी हि बैठक बोलावण्यात आली होती.बैठकीत पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी आंदोलनाची माहिती दिली .ते म्हणाले १७ फेब्रुवारी रोजी ११ वाजता राज्यातील पत्रकार आप आपल्या जिल्ह्यातील ,जिल्हा माहिती कार्यालयात जातील आणि तेथे तीव्र स्वरुपाची निदर्शने आणि सरकार च्या विरोधात तीव्र स्वरूपाचे निदर्शने आणि घोषणाबाजी करतील आणित्यानंतर मागण्यांचा निवेदन जिल्हा माहिती अधिकार्यांना देण्यात येतील.पत्रकार सौरक्षण कायदा व्हावा आणि पत्रकारांना पेन्शन मिळावे तसेच अन्य ८ मागण्यांसाठी करण्यात येणारे हे आंदोलन यशस्वी करण्याचे आव्हान हि बैठकीत करण्यात आले.बैठकीस कार्याध्यक्ष चन्द्रशेकर बेरे,सरचिटणीस संतोष पवार,सिद्धार्थ शर्मा ,सुभाष भारद्वाज,शरद पाबळेराजेंद्र कापसे ,बापू गोरे,सुनील वाळूंज आदि उपस्थित होते.

पत्रकारांच्या गळचेपीत भारत अव्वल

0

वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

वृत्तपत्रे, मीडियाच्या स्वातंत्र्याविषयी भारतात कितीही पुरोगामी वारे वाहत असले तरी पत्रकारांची गळचेपी करण्यात आपला देश १८० देशांच्या यादीत १४०व्या स्थानावर असल्याचे धक्कादायक चित्र सन २०१४च्या जागतिक पाहणीतून पुढे आले आहे. २०१३मध्ये भारतात पत्रकारांवर हल्ल्याच्या बऱ्याच घटना घडल्या असून, या काळात देशभरात ८ पत्रकारांचा मृत्यू झाल्याचे या पाहणीतील आकडेवारी सांगते.
भारतात अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकारांची संख्या मोठी आहे. मात्र, बहुतेक जण राजकीय पक्ष, सुरक्षा यंत्रणा, पोलिस, निदर्शक आणि गुंड टोळ्यांकडून लक्ष्य केले जातात. बऱ्याच प्रकरणात अशा पत्रकारांना न्यायव्यवस्थेकडूनही वाऱ्यावर सोडले जाते आणि मग स्वतःवर सेन्सॉरशिप लादून घेण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय उरत नाही, असे या पाहणी अहवाल म्हणतो.
भारतात बहुतेक राज्यांमध्ये पत्रकारांवर हल्ले होण्याचे प्रकार कमीअधीक प्रमाणात घडत आहेत; मात्र, कश्मीर आणि छत्तीसगढ या राज्यांमध्ये अशा हल्ल्यांचे प्रमाण जास्त आहे, असेही या पाहणीत आढळले आहे.
पाकिस्तान धोकादायक
पत्रकारांसाठी सर्वात धोकादायक असलेल्या देशांमध्ये पकिस्तानचा समावेश असून यादीत तो १७५व्या स्थानावर आहे. तेथील पत्रकारांना दहशतवादी गटांचेच नव्हे, तर ‘आयएसआय’सारख्या सरकारी गुप्तचर यंत्रणांचेही लक्ष्य व्हावे लागते. चीनमधील परिस्थिती भारतापेक्षा गंभीर असून या यादीत तो १५८व्या स्थानावर आहे. पहिल्या क्रमांकावर फिनलँड, दुसऱ्या क्रमांकावर नेदरलँड तर तिसऱ्या क्रमांकावर नॉर्वे हे देश आहेत. अमेरिकेचे स्थानही ४६वर घसरले असून गेल्यावर्षी हा देश ३२व्या स्थानी होता.( म टा वरुन साभार )

मोनोरेलची पहिली सारथी, अलिबाग कन्या जुईली भंडारें

0
संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलेल्या मुंबईच्या  पहिल्या मोनोरेलचे सारथ्य कऱण्याचा बहुमान एका महिलेला मिळाला.जुईली भंडारे असे या 23 वर्षीय महिलेचं नाव असून ती अलिबागची सूकन्या  आहे.अलिबाग तालुक्यातील चोंढी या छोट्‌याश्या खेड्यातून पुढं आलेल्या जुईलीच्या एतिहासिक कामगिरीनं अलिबागकारंामध्ये आत्मसन्मानाची लहर पसरली आहे
अनेक मालिका आणि चित्रपटांमधून अलिबागसे आया क्या असे कुत्सित प्रश्न विचारून अलिबागकरांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला जातो.या विरोधात अलिबागकरांनी वारंवार आवाज उठविला असला तरी चित्रपट आणि मालिका निर्मात्यांनी त्याची दखल घेतली नाही.आता जुईली भंडारे यांनी आपल्या ऐतिहासिक कर्तृत्वाने चित्रपट निर्मात्यांना सणसणीत चपराक लगावत अलिबागकरांचा तरूण येरागबाळा नाही तर अलिबागला कर्तृत्वाची मोठी परंपरा आहे हे दाखवून दिलं आहे.त्यामुळं यापुढं हा मै अलिबागसेही आया हू असं छातीठोकपणे सांगू शकणार आहेत.
जुईलीचं शिक्षण अलिबागला झालं.अलिबागमधून बारावीची पदवी घेतल्यानंतर तिनं कर्जतनजिकच्या एका खासगी इंजिनिअऱिंग कॉलेजमधून इलेक्टॉनिक्स ऍन्ड टेलिकम्युनिकेशनची पदवी संपादन केली.त्यांनंतर जुईलीला मोनोरेलसाठी प्रशिक्षणाची संधी मिळाली आणि ती मुंबईत धावलेल्या पहिल्या मोनोरेलची पहिली साऱथी ठरली.ती मोनोरेल व्यवस्थेत कॅप्टन या पदावर कार्यरत आहे.
जुईलीचे वडिल समीर भंडारे हे थळ येथील आरसीएफ कंपनीत कार्यरत आहेत.जुईलीच्या कर्तृत्वाची बातमी आल्यानंतर अलिबागच्या नगराध्यक्षा नमिता नाईक यांनी त्याना बोलावून त्यांचा अलिबागकरांच्यावतीनं सन्मान केला.जुईलीच्या उत्तुंग कामगिरीने अलिबागचे नाव  मोनोरेलच्या ईतिहासात कोरले गेले असून संपूर्ण अलिबागकरांना त्याचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया नमिता नाईक यांनी यावेळी बोलताना व्यक्ती केली.अलिबाग नगरपालिकेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात जुईली भंडारेचा जाहीर नागरी सत्कार कऱण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.

कोर्टात मालक हरले, श्रमिक पत्रकार जिंकले

0

मजिठिया आयोगाच्या शिफारशींच्या विरोधातील\

मालकांची याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळली

श्रमिक पत्रकरांसाठी आज बऱ्याच दिवसांनंतर एक चांगली बातमी आली आहे.पत्रकारांच्या वेतनाच्या संदर्भाथ मजिठिया आयोगानं ज्या शिफारशी केल्या आहेत त्या लागू करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. 11 नोव्हेंबर 2011पासून मजिठिया आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन द्यावे लागेल.म्हणजे किमान दोन अडिच वर्षांचे ऍरियर्स मालकांना द्यावे लागतील.सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे देशभरातील श्रमिक पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचाऱ्यांना मोठा लाभ होणार आहे.

देशातील काही मोठ्या वृत्तपत्र समुहांनी मजिठिया शिफारशीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.गेली अनेक दिवस या याचिकांची सुनावणी सुरू होती.त्यामुळे पत्रकाारामध्ये अस्वस्थतः होती.मात्र अखेरीस मालक पराभूत झाले,श्रमिक जिंकले.मालकांच्या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळून लावत मजिठिया वेतन आयोगानुसार पगार देण्याचे आदेश दिले आहे.जी मागील थकित बाकी आहे ती एका वर्षात चार हप्त्यात देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.

मजिठिया आयोगाच्या शिफारशींबाबतचा निकाल पत्रकारांच्या बाजुने लागल्याची बातमी येताच पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले.विविध पत्रकारानी परस्परांचे अभिनंदन करीत आपला आनंद साजरा केला.

कोर्टाच्या या निर्णयाचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीला विशेष आनंद झाला.सरकार पत्रकारांचे कोणतेच प्रश्न सोडवत नसेल तर आता पत्रकारांना न्यायालयात जावून आपले प्रश्न सोडविता येऊ शकतात अशी आशा न्यायालायाच्या या निर्णय़ामुळे निर्माण झाल्याची प्रतिक्रिया समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केली आहे.न्यायालायाच्या या निर्णयाचे त्यांनी मनःपूर्वक स्वागत केले आहे.

POPULAR POSTS

error: Content is protected !!