मोनोरेलची पहिली सारथी, अलिबाग कन्या जुईली भंडारें

0
910
संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलेल्या मुंबईच्या  पहिल्या मोनोरेलचे सारथ्य कऱण्याचा बहुमान एका महिलेला मिळाला.जुईली भंडारे असे या 23 वर्षीय महिलेचं नाव असून ती अलिबागची सूकन्या  आहे.अलिबाग तालुक्यातील चोंढी या छोट्‌याश्या खेड्यातून पुढं आलेल्या जुईलीच्या एतिहासिक कामगिरीनं अलिबागकारंामध्ये आत्मसन्मानाची लहर पसरली आहे
अनेक मालिका आणि चित्रपटांमधून अलिबागसे आया क्या असे कुत्सित प्रश्न विचारून अलिबागकरांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला जातो.या विरोधात अलिबागकरांनी वारंवार आवाज उठविला असला तरी चित्रपट आणि मालिका निर्मात्यांनी त्याची दखल घेतली नाही.आता जुईली भंडारे यांनी आपल्या ऐतिहासिक कर्तृत्वाने चित्रपट निर्मात्यांना सणसणीत चपराक लगावत अलिबागकरांचा तरूण येरागबाळा नाही तर अलिबागला कर्तृत्वाची मोठी परंपरा आहे हे दाखवून दिलं आहे.त्यामुळं यापुढं हा मै अलिबागसेही आया हू असं छातीठोकपणे सांगू शकणार आहेत.
जुईलीचं शिक्षण अलिबागला झालं.अलिबागमधून बारावीची पदवी घेतल्यानंतर तिनं कर्जतनजिकच्या एका खासगी इंजिनिअऱिंग कॉलेजमधून इलेक्टॉनिक्स ऍन्ड टेलिकम्युनिकेशनची पदवी संपादन केली.त्यांनंतर जुईलीला मोनोरेलसाठी प्रशिक्षणाची संधी मिळाली आणि ती मुंबईत धावलेल्या पहिल्या मोनोरेलची पहिली साऱथी ठरली.ती मोनोरेल व्यवस्थेत कॅप्टन या पदावर कार्यरत आहे.
जुईलीचे वडिल समीर भंडारे हे थळ येथील आरसीएफ कंपनीत कार्यरत आहेत.जुईलीच्या कर्तृत्वाची बातमी आल्यानंतर अलिबागच्या नगराध्यक्षा नमिता नाईक यांनी त्याना बोलावून त्यांचा अलिबागकरांच्यावतीनं सन्मान केला.जुईलीच्या उत्तुंग कामगिरीने अलिबागचे नाव  मोनोरेलच्या ईतिहासात कोरले गेले असून संपूर्ण अलिबागकरांना त्याचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया नमिता नाईक यांनी यावेळी बोलताना व्यक्ती केली.अलिबाग नगरपालिकेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात जुईली भंडारेचा जाहीर नागरी सत्कार कऱण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here