Saturday, May 18, 2024
Home Blog Page 366

राष्ट्रपतींचा माध्यमांना आत्मपरिक्षणाचा सल्ला

0

प्रसार माध्यमांना आत्मपरिक्षणाचे डोस गल्लीतील पुढाऱ्यांपासून सारेच देत असतात.आत्ता राष्ट्रपती प्रणव मुखजी यांनीही अशीच री ओढत पत्रकारांना आत्मपरिक्षणाचा सल्ला दिला आहे.

इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रणव मुखर्जी म्हणाले,नफा मिळविण्यासाठी काही माध्यम संस्था पेड न्यूज किंवा अन्य मार्केटिंग प्रकाराचा अवलंब करीत आहेत.हा प्रकार अतिशय दुःखद आहे.तो रोखण्यासाठी प्रसार माध्यमांनी आत्मपरिक्षण करावे.
आएनएस च्या कामाचे राष्ट्रपतींनी काौतुक केले .

शेकापचे ज्येष्ठ नेते दत्तुशेठ पाटील यांचे निधन

0

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते दत्तुशेठ पाटील यांचे आज पहाटे तीनच्या सुमारास पनवेलनजिकच्या नावडे या त्यांच्या गावी वृध्दापकालाने निधन झाले.ते 86 वर्षांचे होते.त्यांच्या मागे तीन मुले आहेत.आज दुपारी तीन वाजता त्यांच्यावर नावडे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

1978 1985 आणि 1990 अशी तीन वेळा त्यांनी पनवेलचे आमदार म्हणून विधानसभेत काम केले.पनवेल-उरण परिसरातील अनेक लोक लढ्यात त्यांचा सक्रीय सहभाग होता.

अलिबाग स्फोट प्रकरणी कारखान्याच्या मालकास अटक

0

अलिबागनजिकच्या भायमळा येथील एका फटाके बनविणाऱ्या फॅक्टरीत काल झालेलय स्फोट प्रकरणी कारखान्याचा मालक प्रितम आदिनाथ कांबळे यास पोयनाड पोलिसांनी आज अटक केली आहे. त्यांच्यावर अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याचा ठपका ठेवत 304 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारखान्यात सुरक्षिततेच्या कोणत्याच उपाययोजना केल्या गेल्या नव्हत्या हे समोर आले आहे.आग कशामुळे लागली हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही.पोलिस कारणांचा तपास करीत आहेत.दरम्यान रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरी आज दुपारी घटनास्थळास भेट देणार असल्याचे सरकारीयंत्रणेकडून सांगण्यात आले.

पत्रकार बापू आफळेचे कुटुंब वाऱ्यावर

0

पत्रकारांनी पेन्शनसाठी सरकारकडं लाचारी करू नये,आपला स्वाभिमानी बाणा दाखवावा असे सल्ले देणाऱ्या मुंबईस्थित काही सुखवस्तू पत्रकार मित्रांनी पत्रकारांना पेन्शनची किती गरज आहे हे जाणून घेण्यासाठी सातारा येथील नुकतेच निधन झालेल्या पत्रकार बापू आफळे यांच्या कुटुबियांची मुद्दाम भेट घ्यावी,मग त्यांना कळेल ग्रामीण भागातील पत्रकार कोणत्या अवस्थेत कशा परिस्थितीत जीवन जगताहेत ते..

मी,किरण नाईक काल साताऱ्यात होतो.जिल्हा पत्रकार संघाची बैठक झाल्यानंतर शरद काटकर यांना घेऊन आम्ही मुद्दाम बापू आफळे यांच्या कुटुबियांना भेटायला गेलो.शहराच्या एका टोकाला घर होते.घर कसले ते दहा बाय दहाची पत्र्याची शेडच ती.प्रथमदर्शनीच दारिद्‌÷यानं गांजलेलं हे घर आहे याचा साक्षात्कार होतो.याच घरात बापू,त्याची पत्नी आणि मुलगा तेजस राहायचे.बापू गेला.आता तेजस आणि त्याची आई असे दोघेच येथे राहतात. आयुष्यभर अंगावर येऊन कोसळणाऱ्या संकटांनी कृश झालेलं शरीर,डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा आणि काळजीनं काळवंडलेला चेहरा अशा अवस्थेत असलेल्या त्या माऊलीच्या मनात किती प्रश्नांचं कोलाहल माजलं असेल याची कल्पना येऊ शकते.त्या अवस्थेतही बापूनं एखादं छप्पर घेऊन ठेवलं असतं तर आम्ही कसं तरी जगू शकलो असतो असं त्यांनी सांगितल्यावर आपल्या काळजाचं पाणी पाणी व्हायला लागतं.
अठराविश्वे दारिद्रय असल्यानं मुलाच्या शिक्षणाची आबाळ झाली.तेजसला पुण्यात वैदिक पाठशाळेत ठेवलं होतं पण त्याचं शिक्षण पूर्ण झालं नाही.इकडं शाळेतही जेम-तेम सातवी-आठवीपर्यतच शिक्षण झालेलं.त्याची व्यवस्था कोठे लावावी कळत नव्हतं.चिपळूणचे आमचे एक ज्यष्ट संपादक मित्र नानासाहेब जोशींना फोन लावला.ते चिपळूणच्या एका मोठ्या मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.तेजसला मंदिरात पुजारी किंवा तत्सम काम द्यावी अशी विनंती ( नव्हे आग्रह्च) मी त्यांना केला.त्यांनीही तो मान्य केला.विधी वगैरे संपल्यानंतर त्याला माझ्याकडं पाठवा मी त्याची सोय लावतो असं त्यांनी सांगितलं.बघू यात आता पुडं काय होतं ते..
घरातून बाहेर पडताना मन सुन्न झालं होतं.एका हाडाच्या पत्रकाराच्या आय़ुष्याची झालेली वाताहत आणि आता त्याच्या कुटुबाची चाललेली परवड पाहवत नव्हती.पत्रकारांना विशेषतः ग्रामीण भागातील पत्रकारांच्या नशिबी सर्वत्र हेच भोग येतात.परवा मंचरला एका कार्यक्रमात मी जेव्हा पत्रकार पेन्शनचा विषय काढला तेव्हा मुंबईतील काही ज्येष्ठ पत्रकारांनी त्याला विरोध केला.पत्रकारांनी सरकारकडं लाचार होऊ नये असं ज्ेयष्ठ पत्रकारांचं म्हणणं होतं.भरल्यापोटी स्वाभिमान माणसाला सुचू शकतो, पण बापू आफळेच्या पत्नीला आणि मुलाला आपण स्वाभिमानानं जगा असं मी कसं सागू ? दिशाहिन झालेले हे आई आणि मुलगा यांना स्वाभिमानाचे डोस कोणी मुर्दाडमनाचा माणूसच पाजू शकतो.माझ्या सारख्या संवेननशील माणसाचं हे काम नाही.
पत्रकार बापू आफळेचं कुटुंब आज ज्या अवस्थेत आहे ती अवस्था काही एकट्या बापू आफळे यांच्याच कुटुंबाची नाही.काही दिवसांपूर्वी वाशिमच्या एका पत्रकाराचं निधन झालं होत.त्यां पत्रकाराच्या वडिलांचा फोन आला होता.आमच्या घरात एकटा मुलगाच कमवता होता.तो गेला.आता मी,सून माझी पत्नी आणि नातूच आहोत.कमवता मुलगाच गेल्यानं उत्पन्नाचं अन्य साधन नाही.काही मदत करता आली तर बघा असं त्यानंी सांगितलं.काय करणार? शंकरराव कल्याण निधीसाठी अधिस्वीकृतीधारक पत्रकार हवा असतो.त्यांच्याकडं ती नव्हती.त्यामुळं काही सरकारी मदत मिळण्याची शक्यताच नाही.दोन्ही प्रकरणं गेली काही दिवस मला अस्वस्थ करून टाकताहेत.
कोरडी सहानुभूती ,कोरडे उसासे काही कामाचे नाहीत.अशा कोरड्या आणि शुष्क शब्दांनी पत्रकारांच्या कुटुंबियासमोर जे अनंत प्रश्न उभे आहेत त्याचा गुंता सुटत नाही.कोरड्या सहानुभूतीनं बळ मिळतं वगैरे खरं नाही.त्यामुळं अशा आपत्तीत सापडलेल्या पत्रकारांना काही मदत करता यावी यासाठी एक ट्रस्ट स्थापन कऱण्याचा प्रयत्न सुरू आङे.मोठी रक्काम जमा करून त्यातून गरजू पत्रकारांना काही मदत करता आली तर बघावी असा प्रयत्न आहे.अर्थात ते सारं होईल तेव्हा होईल.आज बापू आफळेच्या कुटुंबांना मदतीची गरज आहे.ज्या पत्रकारांनी किंवा ज्यांच्या संवेदना शाबूत आहेत अशा कोणीही आफळेंच्या कु टिु बांना मदत केली तर फार बरे होईल.त्यांना मदतीच अत्यंत गरज आहे.ज्यांना मदत करावी वाटते त्यांनी माझ्या 9423377700 वर माझ्याशी संपर्क साधावा मी तेजस आफळेचा नंबर संबंधितांना देईल.

राष्ट्रवादीच्या 18 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

0

1) नाशिक – छगन भुजबळ
2) माढा – विजयसिंह मोहिते पाटील
3) बारामती – सुप्रिया सुळे
4) उस्मानाबाद- पद्मसिंह पाटील
5) अमरावती- नवनीत राणा
6) ठाणे – संजीव नाईक
7) मुंबई नॉर्थ ईस्ट – संजय दिना पाटील
8) शिरुर – देवदत्त निकम
9) बुलडाणा- कृष्णराव इंगळे
10) सातारा- उदयनराजे भोसले
11) दिंडोरी- भारती पवार
12) भंडारा- प्रफुल्ल पटेल
13) अहमदनगर- राजीव राजळे
14) परभणी- विजय भांबळे
15) कल्याण- आनंद परांजपे
16) रावेर – मनिष जैन
17) कोल्हापूर – धनंजय महाडिक
18) जळगाव – सतीश पाटील
**
बीड, हिंगोली, मावळ आणि हातकणंगलेच्या उमेदवारीचा तिढा कायम असून यावर चर्चा सुरू आहे

आठ वर्षांनंतर सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघ पुन्हा अस्तित्वात येतोय

0

 

सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघ गेली काही वर्षे मृतावस्थेत होता.तीन वर्षांपूर्वी तो पुनरू ज्जीवीत करण्याचा प्रयत्न आम्ही केला पण तो असफल ठरला.त्यानंतर मराठी पत्रकार परिषदेचेही साताऱ्याकडं दुर्लक्ष झालं.परिणामतः जिल्हयात विविध पत्रकार संघटनांचे पिक उभं राहिलं.
जेथील जिल्हा संघ मृतावस्थेत आहेत किंवा जेथे गेली अनेक वर्षे निवडणुकाच झालेल्या नाहीत अशा जिल्हयात नव्यानं बांधणी करायची असा निर्णय मराठी पत्रकार परिषदेने घेतल्या नंतर नांदेडमध्ये निवडणुका घेतल्या गेल्या.नांदेडमध्येही आठ वर्षे पत्रकार संघ जवळपास अस्तित्वहिन होता.आता तेथे निवडणुका झाल्यात आणि नवी कार्यकारिणी अस्तित्वात आली आहे.आनंदाची गोष्ट अशी की नांदेडच्या निवडणुकाही बिनविरोध झाल्यात.
सातारा येथे काल मी,किरण नाईक,सुभाष भारव्दाज आणि बापूसाहेब गोरे गेलो होतो.पंधरा दिवसांपूर्वी आम्ही साताऱ्याचा दौरा करून जिल्हयात पत्रकारांची नोंदणी करण्यास सुरूवात केली होती.आश्चर्याची गोष्ट अशी की,जिल्हयातील अकरा जिल्हयात नोंदणीस अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.साडेचारशे पत्रकारांनी वर्गणीसह आपली नोंदणी केली आहे.आलेल्या अर्जाची काल छाननी केली गेली.शंभर टक्के जे पत्रकार आहेत त्यांचेच अर्ज स्वीकारण्यात आले अन्य अर्ज बाद झाले.त्यानंतर जिल्हयातील पत्रकारांची बैठक झाली.कार्यकारिणीसाठी निवडणुका घ्यायच्या नाहीत एकमताने कार्यकारिणी निवडायची अशी सकारात्मक भूमिका सर्वच उपस्थित पत्रकारांनी घेत आम्हाला आश्चर्याचा धक्का दिला.अन्यत्र पदांसाठी जोरदार रस्सीखेच होते.साताऱ्यात ते चित्र दिसले नाही.पदांपेक्षा पत्रकारांचे प्रश्न महत्वाचे आहेत आणि ते सोडविण्यासाठी आम्ही एकदिलाने काम करणार आहोत असा आशावाद उपस्थित सर्वच पत्रकारांनी दाखविला.शेवटी कार्यकारिणी निवडण्याचे सर्वाधिकार परिषदेच्या अध्यक्षांना देण्यात आले.किरण नाईक विविध पत्रकारांशी चर्चा करून ही कार्यकारिणी निवडतील.बहुसंख्य पत्रकारांची हीच इच्छा असल्याने काही अडचण येणार नाही.
साताऱ्रा जिल्हयातील सर्व पत्रकारांना मला धन्यवाद द्यायचे आहेत.पत्रकारांसमोर एवढ्या समस्या आहेत की,केवळ पदांसाठी आपल्यात मारामाऱ्या कऱण्यात अर्थ नाही हे वास्तव त्यांच्या लक्षात आले आहे.पत्रकार संघाचे पद हे कोणत्याही लाभाचे पद नाही त्यामुळे या पदासाठी मारामारी कऱणे व्यर्थ आहे.हे ही साऱ्यांच्या लक्षात आले आहे.मला वाटतं,गेली काही वर्षे पत्रकारांना एक करण्यासाठी आणि पत्रकारांच्या हक्कासाठी आम्ही जे लढे लढतो आहोत त्याचे हे फळ आहे.आमच्या चळवळींमुळे पत्रकारांना किमान एकत्र येण्याची आणि आपल्या प्रशनासांठी आवाज उठविण्याची जाणीव झाली हीच गोष्ट माझ्यासाठी फार महत्वाची आहे.
सातारा हा क्रांतीकारकांच्या जिल्हा आहे.येथील पत्रकारही धडाडीचे आपल्या हक्काची जाणीव असणारे आणि लढवय्ये आहेत.त्यामुळे जिल्हयात पत्रकारांवर कुठे काही अन्याय झाला की ते सारे एकत्र येऊन आवाज उठवताना दिसतात.आता संपूर्ण जिल्हयातील पत्रकार परिषदेच्या झेंडयाखाली एकत्र येत आहेत.त्यातून त्यांची शक्ती अधिक वाढणार आहे.अध्यक्ष -उपाध्यक्ष कोण होणार हा फार महत्वाचा मुद्दा नाही पत्रकार एकत्र येत आहे ही गोष्ट माझ्यासाठी फार महत्वाची आहे.साताऱ्यांच्या सर्व पत्रकारांचे मनःपूर्वक आभार आणि पुढील कार्यास शूभेच्छा.
आणखी एका गोष्टीचा येथे आवर्जुन उल्लेख करावा लागेल की,राज्यात पत्रकारांच्या संघटनांचे उदंड पीक आलेलं आहे.तरीही राज्यातील प्रत्येक पत्रकाराला आपण परिषदेच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या जिल्हा पत्रकार संघाचं सदस्य असावं असं वाटत असतं. साताऱ्यातही हेच दिसले.ही परिषदेचे नेतृत्व केलेल्या पुर्वजांची कमाई आहे असं मला वाटतं.जास्तीत जास्त पत्रकारांनी परिषेदेच्या झेंड्‌याखाली एकत्र येत आपला आवाज बुलंद करावा अशी माझी पुनश्च विनती आहे.

महाड येथील ट्रामा केअर सेंटरचे अजित पवारांच्या हस्ते उद्दघाटन

0

महाराष्ट्र सरकारने गेल्या काही दिवसात राज्यात सुरू केलेल्या विविध समाजोपयोगी योजनांप्रमाणेच राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ राज्यातील बहुसंख्य जनतेला होणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

रायगड जिल्हयातील महाड येथे नव्यानेच उभारण्यात आलेल्या ट्रामा केअर सेंटरचे उद्घघाटन आणि लोकार्पण सोहळा गुरूवारी सायंकाळी पवार याच्या हस्ते करण्यात आला तेव्हा ते बोलत होते.
20 खाटाच्या ट्रामा सेंटरमुळे महामार्गावरील अपघातग्रस्तांना त्याचा उपोयग होणार आहे.यावेऴी पालकमंत्री सुनील तटकरे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
काल अजित पवार यांचे पनवेल,मुरूड,महाड आदि ठिकाणी विविध कार्यक्रम झाले.

अलिबागनजिकच्या फटाक्याच्या कंपनीत स्फोट 10 ठार,20 जखमी

0

अलिबागनजिक भायमळा येथील क्रंाती फायर वर्क्स या फटाके बनविण्याच्या कारखान्याला गुरूवारी दुपारी झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या आता 10 झाली आहे.स्फोटात 20 जण जखमी झाले आहे. त्यातील 9 गंभीर जखमींना मुंबईस हालविण्यात आले असून इतरांवर अलिबागच्या शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

स्फोट झाल्यानंतर कारखान्यास लागलेली आग एवढी भीषण होती की,आगीचे गोळे दोन किलो मीटर अंतरावरील गवताळ डोंगरावर गोळे पडल्याने तेथेही आग लागली.शेजारच्या राजधानी कारखान्याबाहेर असलेला कच्चा माल देखील या आगीत जळून खाक झाली.साळाव येथील सुरेश बोबडे हा कारखान्याचा चालक असून त्याला रात्री उशिरापर्यत अटक करण्यात आली नव्हती.
क्रांती काऱखान्यात 69 कामगार काम करतात.मात्र आज महाशिवरात्र असल्याने 34 कामगारच कामावर हजर होते.कारखान्यात 80 टक्के कामगार बिहारचे असून वीस टक्के कामगार स्थानिक होते.कारखान्यात सुरक्षिततेच्यादृष्टीने कोणतेच उपाय योजलेले नसल्याचे ग्रामस्थांनी सागितले.कारखान्याच्या जवळूनच गॅस पाईप लाईन जाते असे असताना कारखान्यास परवानगी कशी दिली गेली असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

ओपिनियन पोल ही पेड

0

निवडणूकपूर्व ओपिनियन पोल घेणाऱ्या काही संस्थांनी अनुकूल अंदाजासाठी पैसे घेतल्याचा दावा एका वृत्तवाहिनीने केला आहे. या वृत्तवाहिनीच्या दाव्याची निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली असून चौकशी करण्याची घोषणा केली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी ही माहिती दिली. देशातील ११ संस्थांनी घेतलेले निवडणूकपूर्व ओपिनियन पोल वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. न्यूज एक्स्प्रेस या वृत्तवाहिनीने एका स्टिंग ऑपरेशनद्वारे हा भांडाफोड केला आहे. यासंदर्भात आयुक्त संपत म्हणाले, ‘ओपिनियन पोल संदर्भात निवडणूक आयोगाने २००४ मध्ये सर्वपक्षीय बैठक बोलाविली होती. आयोगाने आपल्या शिफारशींबरोबर राजकीय पक्षांची मते देखील जाणून घेतली होती. या शिफारशी आणि मते सरकारला पाठविण्यात आली होती. आता त्यावर सरकारने कृती करण्याची गरज आहे.’
न्यूज एक्स्प्रेसच्या आरोपाबाबात विचारले असता, ‘या आरोपांकडे लक्ष दिले जाईल. त्यावर सध्याच्या कायद्यानुसार, कोणती कारवाई करता येऊ शकते, हे तपासले जाईल.’, असे उत्तर संपत यांनी दिले.
..

पेडन्यूज ? खबरदार, प्रशासन ठेवणार करडी नजर

0

लोकसभा निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष व उमेदवारांच्या प्रसारमाध्यमांमधील पेड न्यूज आणि जाहिरातींवर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी आज प्रसारमाध्यमे व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना याबाबत माहिती दिली.
प्रसारमाध्यमांमधील संभाव्य अनुचित प्रकारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने कठोर र्निबध घातल्याचे कवडे यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालीच त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीची बैठक बुधवारी झाली. त्यानंतर कवडे म्हणाले, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांना दिल्या जाणाऱ्या जाहिराती प्रमाणित करून घ्याव्या लागणार असून, ही काळजी राजकीय पक्ष व उमेदवारांनाच घ्यावी लागेल. तीन दिवस आधी विहित नमुन्यातील अर्ज दाखल करून ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. वर्तमानपत्रांमधील प्रचारकी थाटाच्या बातम्यांचेही तर्पण होणार आहे. तक्रार आल्यानंतरच त्याची दखल घेतली जाईल असे नाहीतर अशा गोष्टींची ही समितीच दखल घेणार आहे. राजकीय पक्ष किंवा उमेदवारांचा प्रचार केवळ जाहिरातीतूनच झाला पाहिजे, बातम्यांमधून तो होऊ नये अशाच निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत असे कवडे यांनी सांगितले.

POPULAR POSTS

error: Content is protected !!