Sunday, May 5, 2024
Home Blog Page 365

पत्रकार प्रवीण पुरोचा उरणला सत्कार

0

 

काल उरणमध्ये होतो.विधीमंडळ आणि वार्ताहर संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रवीण पुरो यांचा माझ्या हस्ते सत्कार झाला.अघ्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शहरातील सर्वपक्षीय लोकांनी एकत्र येणं,सत्कार समिती स्थापन करणं आणि ह्रद्य असा सत्कार सोहळा आयोजित करणं हे भाग्य फारच थोड्या पत्रकारांच्या वाट्याला येत असेल.हॉल गच्च भरला होता.सर्व स्तरातील सर्वपक्षीय मंडळी कार्यक्रमास उपस्थित होती.विशेष म्हणजे प्रवीणच्या वृध्द मातोश्री लक्ष्मीबाई पुरो उपस्थित होत्या.आईसमोर मुलाचा सत्कार होणं हे त्या मातेसाठी मोठा आनंदाचा क्षण असतो.तो आनंद प्रवीणच्या आईला मिळाला होता.यावेळी साऱ्यांचीच भाषणं भावणारी होती.
माझ्यासाठीही उरणचा कार्यक्रम आनंदाचा होता.रायगडात असताना बऱ्याचदा उरणला गेलो होतो.अलिकडं चार-पाच वर्षात उऱणला जाता आलं नाही.काही वर्षांपूर्वी आम्ही रायगडच्या पत्रकारानी उरणच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी महाचर्चा नावाचा कार्यक्रम घेतला होता.उरणमधील अनेक प्रश्नांची तेथे चर्चा झाली होती.पण उरणमध्ये असताना त्यापैकी एकही प्रश्न मार्गी लागलाय असं दिसलं नाही.याचं कारण उरणला पूर्ण आमदार कधी मिळालाच नाही.अगोदर उरण अलिबागला जोडलेले होते,नंतर ते पनवेलला जोडले गेले,आता उरण स्वतंत्र मतदार संघ झाला असला तरी या मतदार संघाला पनवेलचा मोठा भाग जोडलेला आहे.त्यामुळे विद्यमान आमदारांचेही पनवेलकडेच जास्त लक्ष असते.ही खंतही अनेक वक्त्यांनी बोलून दाखविली.तसेच प्रवीण हा हाडाचा पत्रकार आहे.कार्यकर्ता पत्रकार आहे,चळवळीतही त्याचा सहभाग असतो त्यामुळे उरणचा प्रतिनिधी म्हणूनच तो विधानसभेत काम करेल अशी अपेक्षा उपस्थित साऱ्यांनीच व्यक्त केली.
माझ्या हस्ते सत्कार झाल्यानंतर असंख्य उरणकरांनी प्रवीणला पुुष्पगुच्छ देऊन आणि शाल घालून त्यांचा सत्कार केला.चांगल्या काय्रक्रमास उपस्थित राहिल्याचा आनंद मलाही झाला.
पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याच्या बातम्या वाचून अस्वस्थ होणाऱ्या माझ्या मनाला एका पत्रकाराचा एवड्या अपुलकीन सत्कारही होऊ शकतो हे चित्र मला नक्कीच आनंद देणारे होते.सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या प्रत्येक पत्रकाराच्या पाठिशी समाजनं उभं राहिलं पाहिजे ही अपेक्षा मी उरणलाही व्यक्त केली.

दोन पत्रकारांवर हल्ले

0

आज दिवसभरात,

दोन पत्रकारांवर हल्ले,एकाच्या विरोधात

विनयभंगाची खोटी तक्रार,सांगतील टीव्हीचा
कार्यक्रमच उधळून लावला

महाराष्ट्रातील पत्रकारितेसाठी आजचा दिवस क्लेशदायक होता.आज राज्यात किमान चार पत्रकारांना विविध संकटांचा मुकाबला करावा लागला.इंदापूरच्या निळकंठ मोहिते या पत्रकारास बातमी दिल्याबद्दल बेदम मारहाण केल्याची बातमी मी सकाळीच आपल्याबरोबर शेअर केली होती.त्यानंतर शिरूर येथून बातमी आली.तेथील तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मुकुंद मनोहर ढोबळे याच्या विरोधात कट-कारस्थान करून महिलेच्या वियमभंगाचा गुन्हा दाखल केला गेला.वस्तुतः ज्या महिलेने तक्रार दिली तिनेच आपल्यावर दबाव आणला गेल्याचे मान्य केले आहे.आता पोलिसवाले पत्रकारास अटक करायला टपून बसले आहेत.

तिसरी घटना पिंपरी चिंचवडला घडली .ताथवडे भागात राहणारे राम गायकवाड मर्द महाराष्ट्र हे साप्ताहिक चालवतात.साप्ताहिकात प्रसिध्द झालेल्या बातमीचा राग मनात धरून त्यांच्यावर हल्ला केला गेला.वाकड पोलिसात राम गायकवाड यांनी संजय चव्हाण याच्या विरोधाता तक्रार दाखल केली आहे.
चौथी घटना सांगलीत घडली.टीव्ही-9वर आपण यांना पाहिलंत का हा कार्यक्रम दाखविला जातो.या कार्यक्रमाचं शुटिंग करू नका म्हणून कॉग्रेस कार्यकर्त्यांनी टीवही -9 चे राजेंद्र कांबळे तसेच अन्य टिमला धमक्या दिल्या आणि कार्यक्रम बंद पाडला गेला.
या चारही घटना मी आरआरपाटलांच्या कानावर घातल्या आङेत.इंदापूरच्या प्रकरणात आरोपीला उद्या पर्यत अटक झाली नाही तर पत्रकार पोलिस ठाण्यासमोरच उपोषणाला बसतील असा इशारा जिल्हा पत्रकार ंसंघातर्फे देण्यात आला आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती या सर्व घटनाचा निषेध करीत आहे

इंदापूरनजिक पत्रकारावर हल्ला

0

इंदापूर तालुक्यातील रेडा गावी काल रात्री साडेबारा वाजता दैनिक प्रभातचे पत्रकार निळकंठ मोहिते यांना कॉग्रेसच्या एका पुढाऱ्याच्या चमच्यांनी बेदम मारहाण केली.

रेडा हे गाव इंदापूरपासून वीस किलो मीटर अंतरावर आहे.तेथील गुलाब बाबा देवस्थानची सध्या यात्रा सुरू आहे.या यात्रेच्या संदर्भात काही बातम्या मोहिते यांनी छापल्या होत्या.त्याचा राग मनात धरून बातम्या का दिल्यास असा जाब विचारत काल रात्री निळकंठला बेदम मारहाण केली गेली.या प्रकरणी बावडा पोलिस ठाण्यात निळकंठ यांनी तक्रार दिली असली तरी अद्याप पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही.तानाजी देवकर हे देवस्थानचे कारभारी आहेत.
या प्रकऱणाचा पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद पाबळे,कार्याध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी तीव्र शब्दात धिक्कार केला असून आज दिवसभरात आरोपींवर कारवाई झाली नाही तर उद्या पत्रकार संघाचे एक शिष्टमंडळ जिल्हा पोलि स अधीक्षकांना भेटेल असा स्पष्ट केले आहे.महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीनेही या हल्ल्याचा निेषेध केला आहे.

तरूण तेजपाल पुन्हा गोत्यात

0

पत्रकार तरूण तेजपाल यांच्य़ाकडे तुरूंगात मोबाईल सापडल्यानंतर आता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे तेजपाल यांच्या अडचणी आता आणखीनच वाढल्या आहेत.

सहकारी महिलेचा शारीरिक लगट कऱण्याच्या प्रकरणात तेजपाल सध्या गोव्यातील एका तुरूंगात आहेत.तेथे त्यांच्याकडे मोबाईल मिळाल्यानंतर आता त्यांच्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.तेजपाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडे जामिनीसाठी अर्ज केला आहे.त्यावरची सुनावणी येत्या 4 मार्च रोजी होणार आहे.त्यापूर्वीच हा प्रकार घडल्याने तेजपाल पुन्हा गोत्यात आले आहेत.

पत्रकाराची आत्महत्त्या

0

नोकरी गमवावी लागल्याने आपल्याकडे काही पत्रकार छायाचित्रकारांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडलेल्या आहेत.आता झारखंड मधील मोकामा येथून बातमी आहे की तेथील छायाचित्रकार राजीव ने नोकरी गेल्याने ट्रेन खाली उडी घेऊन आत्महत्या केली.तुकडे झालेला त्यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.प्रभात खबर मध्ये राजीव काम करीत होते त्यांनी नोकरीवरून काढल्यानांतर ते अडचणीत आले.त्यातून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला.नोकरी का गेली हे मात्र समजू शकले नाही.

वागळे-खांडेकर यांच्यावरील हक्कभंग मागे घेण्याची मागणी

0

आयबीएन-लोकमतचे संपादक निखिल वागळे आणि एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांच्यावरील हक्कभंग ठराव मागे घ्यावा अशी मागणी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी आज विधान परिषदेत केली आहे.सुदैव आपलं,क ुठल्यातरी राजकीय पक्षाच्या आमदाराला पत्रकारांची बाजू घेण्याची सुबुध्दी सुचली.सभापतींनी जयंत पाटील यांची मागणी मान्य केली नसली तरी कोणी तरी बोलले हे काही कमी नाही.जयंत पाटील यांना धन्यवाद दिले पाहिजेत.

राज्यातील तमाम पत्रकारांची देखील हीच मागणी आहे.हक्कभंग मागे घ्यावा.कोणत्याही पध्दतीनं मग तो हक्कभंग असो,पत्रकारावर हल्ले करून असो किंवा पत्रकारांच्या नोकऱ्यांवर गदा आणून असो पत्रकाारंचा आवाज बंद कऱण्याचा कोणताही प्रय़त्न आम्हाला मान्य नाही.तो राज्यातील पत्रकार चालूही देणार नाहीत.

सुनील तटकरे यांच्याकडून रूग्णांची विचारपूस

0

भायमळा घटनास्थळासही भेट

अलिबाग नजिकच्या भायमळा येथील फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटातील जखमींची रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांनी अलिबागच्या शासकीय रूग्णालयात जाऊन विचारपूस केली.तसेच तटकरे यांनी घटनास्थळासही भेट दिऊन पाहणी केली.अपघातात जे ठार आणि जखमी झाले आहेत त्यांच्या नातेवाईकांना सरकारकडून मदत देण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल अशी माहितीही सुनील तटकरे यांनी दिली.स्फोट आणि आगीची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तींविरूध्द कडक कारवाई करण्यात येईल असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.गंभीर त्रुटी असलेल्या कारखान्याचे परवाने रद्द कऱण्याचे सुतोवाचही तटकरे यांनी केले.
दरम्यान अपघातात ठार झालेल्यांपैकी तिघांची ओळख पटली आहे.

पत्रकाराचे अपहरण

0

कलान ( शाहजांहपूर) येथील पत्रकार प्रदीप सिंह यांंंंचे शुक्रवारी अपहरण करण्यात आले.पोलिस त्यांचा तपास करीत आहे.आज सकाळी त्याच्या बंधूच्या मोबाईलवर अपहरणकर्त्यानं फोन केला आणि त्याचं अपहरण करण्यात आल्याचं सांगितलं.प्रदीपसिंह दैनिक जागरणसाठी काम करतात.

मच्छिमार आंदोलकांची अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक

0

आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या अलिबाग आणि पेणच्या धरमतरखाडी काढच्या मच्छिमारांच्या संयमाचा बांध आज अखेर फुटला.त्यांनी आज अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यलयावर तुफान दगडफेक केली.या दगडफेकीत तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले असून शहरातील वातावरण तंग बनले आहे.पोलिसांनी रॅपिड ऍक्शन फोर्सची तुकडी शहरात तैनात केली आहे.

धरमतर खाडी काढच्या कंपन्यांचे रासायनिक पाणी खाडीत सोडले जाते त्याचा मच्छिमारीवर परिणाम होत आहे.तसेच पीएनपी आमि इस्पात कंपनीच्या मोठ्या बार्जेसमुळे मच्छिमारांचे नुकसान होत आहे.त्याचा बंदोबस्त करावा यामागणीसाठी 18 गावातील 1800च्यावर मच्छिमार गेली अनेक वर्षे शांततेच्या मार्गाने ंआंदोलन करीत आहेत मात्र सरकारने त्यांच्या मागण्याकडे लक्ष दिले नाही.त्यामुळे 22 जानेवारी रोजी मच्छिमारांनी जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस दिली होती.त्यानंतर मच्छिमारांच्या प्रतिनिधींची 7 फेब्रुवारी रोजी प्रांत दीपक क्षीरसागर यांच्याशी चर्चाही झाली होती मात्र त्यातून काही निष्पण्ण न झाल्याने मच्छिमारांनी 11 फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केेले होते.आंदोलनास 18 दिवस झाल्यानंतरी सरकार काही दखल घेत नाही म्हटल्यावर आंदोलक संतापले आणि त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयालाच आपले लक्ष्य बनविले.आंदोलकांनी जिल्ङिधाकीरी कार्यालायवर तुफान दडगफेक केली आहे.

शिवसेनेचे १५ उमेदवार जाहीर!

0

शिवसेनेने आज (शुक्रवारी) लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या १५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नावांची घोषणा केली.

दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी आग्रही असणारे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना अखेर सक्तीची निवृत्ती देण्यात आली असून त्यांच्या जागी मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष व तरुण नगरसेवक राहुल शेवाळे यांना संधी देण्यात आली आहे.

१५ उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे:

मुंबई – अरविंद सावंत
दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे
उत्तर पश्चिम मुंबई – गजानन कीर्तिकर
ठाणे – राजन विचारे
कल्याण- डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे
औरंगाबाद – चंद्रकांत खैरे
हिंगोली- सुभाष वानखेडे
परभणी – संजय जाधव
अमरावती – आनंदराव अडसूळ
बुलढाणा – प्रतापराव जाधव
यवतमाळ – भावना गवळी,
रामटेक – कृपाल तुमाणे
रायगड- अनंत गीते
रत्नागिरी-सिंधुदुर्ग – विनायक राऊत

POPULAR POSTS

error: Content is protected !!