Sunday, May 19, 2024
Home Blog Page 359

शेकापला मनसेचा पाठिंबा

0

रायगड आणि मावळ लोकसभा मतदार संघात शेकापच्या उमेदवारांना आता मनसे पाठिंबा देणार असल्याने या दोन्ही मतदार संघातील लढती रंगतदार होणार आहेत.शेकापचे नेते आमदार जयंत पाटील यांनी आज मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या मुंबईतील कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली.आमटी चर्चा सकारात्मक झाली असून मनसेने आमच्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे जयंत पाटील यांनी नंतर माध्यमांना सांगितले.आमच्यातील मतभेदाचे किरकोळ मुद्दे आता दूर झालेत असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय.

रायगडमधून शेकापने रमेश कदम आणि मावळमधून लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली आहे.रायगडमधून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि शिवसेनेचे अनंत गीते निवडणूक लढवत आहेत तर मावळमधून सेनेच्यावतीने श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीच्यावतीने राहूल नार्वेकर निवडणूक मैदानात आहेत.
रायगडमध्ये मनसेचा फारसा प्रभाव ऩसला तरी जी काही थोडीफार मतं आहेत ती शेकापच्या उमेदवारांना पडणार असल्याने शेकाप नेत्याच्या आशा पल्लवित झाल्या आङेत.

डॉ.अमोल कोल्हे शिवसेनेत

0

शिवछत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका समर्थपणे साकार करणारे अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.सेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांनी एका पत्रकार परिषदेत मुंबईत ही घोषणा केली.अगोदर हे कोल्हे मनसेच्या संपर्कात होते पण ते नेतृत्व आपणास मान्य नव्हते,नेतृत्व कणखर पण संयमी असले पाहिजे उद्दव ठाकरे तसे नेते आहेत म्हणून आपण सेनेत आल्याचे सांगितले.

“केजरीवाल लाईव्ह ” बंद

0

माध्यमांना दिलेल्या शिव्या आणि धमक्यांचे परिणाम अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या टीमला भोगावे लागू लागले आहेत.केजरीवाल यांच्या बंगलोर दौऱ्यांबाबतची एक गोष्ट आता समोर आली आहे.केजरीवाल यांची सभा लाईव्ह दाखविण्याचे बहुतेक चॅनेलने टाळले आहे.एबीपी न्यूज आणि हेडलाईन टु डे हे दोन चॅनल सोडले तर केजरीवाल यांना लाइव्ह कोणीही दाखविले नाही.वस्तुतः सर्वच चॅनेलच कॅमेरे कार्यक्रम स्थळी हजर होते.नंतर केजरीवाल याच्या बातम्या दाखविल्या गेल्या असल्यातरी त्यांना लाइव्ह दाखवायचे टाळले आहे.

केजरीवाल यांचा कार्यक्रम सुरू असताना न्यूज-24 वर क्रिकेट,आयबीएन-7 वर होळीचा कार्यक्रम,एनडीटीव्हीवर-टी20 मॅच,इंडिया टीव्हीवर कॉमेडी वीथ कपिल,आजतकवर राहूल गांधी,झीवर होळी,टाइम्स नाऊवर विकेन्ड न्यूज,एनडीटीव्हीवर कॉमेडी शो,सीएनएन -आबीएनवर विविध कार्यक्रम दाखविले जात होते.केजरीवाल यांनी बेगलोरमध्ये वारानसीतून निवडणूक लढविण्याचे सूचित केले तरी तरी त्याला फारशी प्रसिध्दी मिळाली नाही.त्यामुळे केजरीवाल कधी आले आणि गेले हे बंगलोरकरांना कळलेही नाही.
बातमी देणे हे वृत्तपत्रे किवा वाहिन्याचे काम आहे.बातमी ब्लॅक आऊट कऱणे ही आपल्या व्यवसायाशी केली जाणारी प्रतारणा आहे हे जरी खरे असले तरी जेव्हा एखादी व्यक्ती माध्यमांचा आवाज बंद कऱण्याचाच विचार मांडते,माध्यमांना धमक्या देते किंवा कोणी माध्यमांवर हल्ले करीत असतील तर अशा व्यक्तींच्य बातम्या ब्लॅक आऊट कऱणे ही प्रतारणा नाही.पत्रकारांना कोणतेही कायदेशीर संरक्षण नसताना बातम्यांवर बहिष्कार टाकण्याशिवाय पत्रकारांच्या हाती काहीच नसते.

पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा

0

रायगड जिल्हयासाठी 6 कोटी 3 लाख रूपयांचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा जिल्हाधिकारी सुमंत भागे यांनी मंजूर केला आहे.

रायगड जिल्हयात 3500 मि.मी.च्या आसपास दरवर्षी पाऊस पडत असला तरी उन्हाळा सुरू झाला की,जिल्हयातीलन अनेक गावांना पाणी टंचाईची झळ बसायला लागते.जिल्हयात 194 गावं आणि 380 वाड्या मिळून 574 ठिकाणी मार्च,एप्रिल आणि मे अशी तीन महिने विविध साधनांनी पाणी पुरवठा करावा लागतो.त्यासाठी नळपाणी पुरवठा योजनांची दुरूस्ती,तात्पुरत्या पूरक नळपाणी पुरवठा योजना,नवीन विंधन विहिरीचे जलभंजन,करावे लागते .अनेक ठिकाणी बैलगाडी,टॅन्कर आणि होडीतूनही पाणी पुरवठा करावा लागतो.त्यासाठी यावर्षी 6 कोटी 3 लाख रूपयांची तरतूद करणयात आली आहे.गेल्या वर्षी हा खर्च 2 कोटी 83 लाख एवढा झाल ाहोता.

पुण्यातून “खिलाडी” बाद

0

कॉग्रेस पक्षाने आपली तिसरी यादी जाहीर केली असून त्यात महाराष्ट्रातून पाच उमेदवारांची नावे जाहीर केली गेली आहेत.सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या पुणे मतदार संघातून विश्वजीत कदम यांची उमेदवारी कॉग्रेसने नक्की केली आहे.त्यामुळं सुरेश कलमाडी नावाचा खिलाडी रिंगणातून बाद झालाय.चंद्रपूरमधून संजय देवतळे पालघरमधून राजेंद्र गावित आणि लातूरमधून बनसोडे यांना उमेदवारी देण्यात आलीय.नांदेडचा गुंता अजूनही सुटला नाही.अशोक चव्हाण यांना किंवा त्याच्या घरातील कोणाला उमेदवारी दिली तर त्याचे इतरत्रही परिणाम होतील.नाही दिली तर कॉग्रेस निवडणून येऊ शकत नाही अशा स्थितीत करायचं काय या पेचात कॉग्रेस आहे.

मराठी

0

सातारा

उद्याचा बातमीदार… एक निवेदन

0

आपल्या शहरात,जिल्हयात ,आसपास पत्रकारितेशी निगडीत अनेक बातम्या घडत असतात.पत्रकारांवर हल्ले होतात,पत्रकारांना धमक्या दिल्या जातात,पत्रकारांना पुरस्कार मिलतात,पत्रकारांचे सन्मान होतात .पत्रकार संघटनांचेही विविध कार्यक्रम होतात.या सर्व बातम्या आपण आमच्याक डे पाठवा त्याला उद्याचा बातमीदार या ऑनलाईन पेपरमधून प्रसिध्दी दिली जाईल.बातमीदारला दररोज शेक़डो पत्रकार,अधिकारी,नागरिक भेट देत असल्याने आपला आवाज म्हणा,आपले गाऱ्हाणे म्हणा योग्य त्या व्यक्तीपर्यत नक्की पोहोचेल.
पत्रकारांच्या चळवळीचे व्यासपीठ असलेल्या बातमीदाच्या चळवळीत आपणही आपला सहभाग नोंदवा.
आपण एकच करायचं आहे. मेनू मधील संपर्क मध्ये जा .त्यातील तुम्हीही पाठवा बातमी या ऑप्शनवर क्लीक करा .तेथे आपले नाव,इ-मेल,आता विषय नोंदवायचा आणि युवर मेसेजमध्ये आपली बातमी पेस्ट करा आणि सेन्डच्या ऑप्शनवर क्लीक करा.आपली बातमी आमच्यापर्यत पोहचेल.

[divider]

उद्याचा बातमीदार—- आपली बातमी, आपला आवाज

SEND NEWS

0

[contact-form-7 id=”197″ title=”Contact form 1″]

निषेध.. निषेध.. निषेध…

0

———————————————————
मुंबईतील अंधेरी भागात एका वाहिनीच्या महिला पत्रकाराच्या विनयभंगाची घटना तसेच तिच्या बरोबरच्या छायाचित्रकारास झालेल्या मारहाणीचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तीव्र शब्दात निषेध करीत असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करीत आहे.

समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकार म्हटले आहे की, अगोदर एका महिला पत्रकारावर झालेला सामुहिक अत्याचार,त्यानंतर एका हॉटेलात मुंबईतील एका सायंदैनिकाच्या चार महिला पत्रकारांशी केली गेलेली असभ्य वागणूक आणि चार दिवसांपूर्वीच बंगलोरमध्ये एका मंत्र्याने महिला पत्रकारास विवस्त्र कऱण्याचा केलेला प्रयत्न या साऱ्या घटना संतापजनक आणि पत्रकारिता करणे केवळ पुरूषांसाठीच नव्हे तर स्त्रियांसाठीही किती कठिण होत चालले आहे याचा प्रत्यय आणून देणाऱ्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आता तरी जास्त अंत न बघता महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा केला पाहिजे .
अंधेरीतील ताज्या घटनेतील पाच आरोपींना अटक करण्यात आली असली तरी आणखी काही आरोपी फरार आहेत.त्यांनाही तातडीने अटक झाली पाहिजे अशी मागणी करतानाच गृहमॅंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून अशा प्रकारांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे अशी मागणीही एस.एम.देशमुख यांनी केली आङे.

खासदार व्हायचंय मला…

0

सत्तेचे लाभ एव्हाना साऱ्यांच्याच ध्यानात आले आहेत.पूर्वी माफिया,उद्यागपती आपणास अनुकूल उमेदवारांना मदत करीत आज तेच निवडणुका लढवत आहेत.शिवाय वेगवेगळ्या थरातील व्यक्तींनाही सत्तेमुळे आसपासच्या लोकांची झालेली भरभराट दिसते.त्यामुळं आपणही सत्तेत असावं असं वाटणारांची संख्या मोठी आहे.आपने सामांन्य माणसांच्या अपेक्षा वाढविल्याने अनेकांना खासदार व्हावे वाटायला लागले आहे.त्याचा परिणाम 2014च्या निवडणुकात उमेदवारांच्या सख्येत भरमसाठ वाढ झाल्याचे दिसेल.

1998 च्या लोकसभा निवडणुकीत 4,750 उमेदवार उभे होते.त्यानंतर दहा वर्षांनी झालेल्या निवडणुकीत हा आकडा जवळपास दुप्पट म्हणजे 7514 पर्यत गेला.सुरूवातीला डिपॉझिटची रक्कम 500 रूपये होती ती नंतर 25,000 रूपये झाली.आश्चर्य म्हणजे जे निवडणुकांना उभे राहतात त्यापैकी 25 टक्के उमेदवार आपले डिपप्रझिटही वाचवू शकत नाहीत.तरीही अर्ज भरले जात आहेत.या वेळेस हा आकडा लक्षणिय वाढेल असा टाइम्स ऑफ इंडियाचा अंदाज आहे.या बाबतची एक सविस्तर स्टोरी आज टाइम्सने प्रसिद्ध केली आहे.
देशातील उत्तर प्रदेश,तामिळनाडू,महाराष्ट्र,बिहार,मध्य प्रदेश आणि कर्नाटक या मोठ्या राज्यात सरासरी प्रत्येक मतदार संघात 17 उमेदवार 2009मध्ये उभे होते.तामिळनाडूत हा आकडा 21 असा होता तर महाराष्ट्रात 17 होता.महाराष्टात 48 जागांसाठी 2004मध्ये 412 उमेदवारांनी अर्ज भरले होते.2009मध्ये त्यात दुप्पट वाढ होत तो 819वर गेला .यावेळेस तो आकडा आणखी वाढेल असे दिसते.खासदार व्हायचंय मला म्हणत निवडणुकांना सामोरं जाणाऱ्यंाची संख्या वाढतेय ही गोष्ट प्रगल्भ लोकशाहीसाठी स्वागतार्ह मानली पाहिजे.द

POPULAR POSTS

error: Content is protected !!