पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा

0
866

रायगड जिल्हयासाठी 6 कोटी 3 लाख रूपयांचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा जिल्हाधिकारी सुमंत भागे यांनी मंजूर केला आहे.

रायगड जिल्हयात 3500 मि.मी.च्या आसपास दरवर्षी पाऊस पडत असला तरी उन्हाळा सुरू झाला की,जिल्हयातीलन अनेक गावांना पाणी टंचाईची झळ बसायला लागते.जिल्हयात 194 गावं आणि 380 वाड्या मिळून 574 ठिकाणी मार्च,एप्रिल आणि मे अशी तीन महिने विविध साधनांनी पाणी पुरवठा करावा लागतो.त्यासाठी नळपाणी पुरवठा योजनांची दुरूस्ती,तात्पुरत्या पूरक नळपाणी पुरवठा योजना,नवीन विंधन विहिरीचे जलभंजन,करावे लागते .अनेक ठिकाणी बैलगाडी,टॅन्कर आणि होडीतूनही पाणी पुरवठा करावा लागतो.त्यासाठी यावर्षी 6 कोटी 3 लाख रूपयांची तरतूद करणयात आली आहे.गेल्या वर्षी हा खर्च 2 कोटी 83 लाख एवढा झाल ाहोता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here