Wednesday, May 8, 2024
Home Blog Page 358

शेकाप उमेदवारांना अंतुलेंचे आशीर्वाद

0

राष्ट्रवादी आणि कॉग्रेस आघाडीला छेद देत कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते अ.र.अंतुले यांनी मावळ आणि रायगडमधील शेकापचे उमेदवार लक्ष्मण जगताप आणि रमेश कदम यांना आशीर्वाद दिल्याने रायगड जिल्हा कॉग्रेसमध्ये अस्वस्थतः पसरली आहे.रायगड जिल्हयात आता पर्यत शेकाप विरूध्द कॉंग्रेस अशीच लढत झाली आहे.स्वतः अंतुलेंना देखील अनेक वेळा शेकापच्या कडव्या विरोधाला तोंड द्यावे लागले होते.असे असतानाही अंतुले यांनी शेकापच्या उमेदवारांना आशीर्वाीद दिल्याने हा विषय रायगडमध्ये चर्चेचा झाला आहे.

शेकापच्या नेत्यांनी नुकतीच मुंबईत अंतुले यांची आपल्या दोन उमेदवारांसह भेट घेतली.त्यावेळी अंतुले यांनी शेकापला आशीर्वाद दिले अशी माहिती शेकापचे नेते आमदार जयंत पाटील यांनी शनिवारी अलिबाग येथे पत्रकार पऱिषदेत दिली.
रायगडची जागा कॉग्रेस लढवावी यासाठी अ.र.अंतुले आग्रही होते .त्यासाठी त्यांच्या जावयाला तिकीट मिळावे असाही त्यांचा प्रयत्न होता पण पक्षाने ते अमान्य केल्याने अंतुले नाराज असल्याची चर्चा आहे.

अतुलेंजी को गुस्सा क्यू आता है…

0

लोकसभा किंवा विधानसभा निवडणुका आल्या की अ.र.अंतुले रायगडकरांना हमखास आपलं अस्तित्व दाखवून देतात.एरवी रायगडमध्ये जेव्हा केव्हा  जिल्हा परिषदा,नगरपालिका, पंचायत समित्या किंवा तत्सम  निवडणुका असतात तेव्हा” अंतुले कोठे आहेत”? असा प्रश्न विचारलेलेही त्यांना आवडत नाही.( – मी एकदा असा प्रश्न विचारण्याची हिमाकत केली होती तेव्हा ते माझ्या नोकरीवरच उठले होते ) अंतुले महान नेते आहेत,त्यांनी गल्ली- बोळातल्या निवडणुकात रस घेणं त्याच्या प्रतिष्ठेला शोभा देणारं नाही हे गृहितक जरी आपण मान्य केलं तरी काही प्रश्न अनुत्तरीतच राहतात. लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत त्यांचा जेव्हा संबंध नसतो ( म्हणजे ते उभे नसतात ) तेव्हा तरी ते अशा निवडणुकांत रस घेतात का ? असं विचाराल तर  त्याचंही उत्तर” नाही” असंच  मिळेल. .अ.र.अंतुले यांनी लोकसभेची पहिली निवडणूक 1989 मध्ये लढविली.ते जिंकले पण त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकातूनही  अंग काढून घेतलं.विधानसभा उमेदवाराच्या प्रचारासाठी अंतुले रायगडात  आलेत असं अभावानंच घेडलेलं मी पाहिलं आहे.(त्यावर एका निवडणुकीत मी “अंतुले या,रायगड आपल स्वागत  असा “या मथळ्याखाली  लेख लिहिला होता.)1989,1991,आणि 1996 असे सलग तीन वेळा अंतुले रायगडमधून विजयी झाले होते.मात्र त्यांंचं मताधिक्य क्रमशः घटत गेलं.1996 मध्ये तर अनंत तरेंच्या विरोधात ते जेमतेम 10 हजार मतांनी विजयी झाले होते.( त्याबद्दल त्यांनी आकांडतांडव करीत कार्यकर्त्यांना चांगलंच फ ैलावर घेतलं होतं )1998मघ्ये  ते रामशेठ ठाकूर यांच्या विरोधात पराभूतच झाले.त्यानंतर 1999मध्ये जी निवडणूक झाली ती अंतुले यांनी कुलाब्यातून लढली नाही.अंतुले औरंगाबादला गेले.तेथे पराभूत झाले.अंतुले औरंगाबादला गेल्यानं त्यांचा रायगड निवडणुकीशी काही संबंध उरला नाही.त्यामुळं आपल्या ऐवजी ज्या पुप्पा साबळे यांना पक्षानं उमेदवारी दिली आहे,त्याचं प्रचाराचं कसं चाललंय, ? त्यांच्यासाठी रायगडला गेलं पाहिजे,त्यांना विजयी करण्यासाठी काही करिष्मा दाखविला पाहिजे असा कोणताही प्रयत्न तेव्हा अ तुंले यांनी केल्याचं मला स्मरत नाही.याचा अ र्थ निवडणुकांशी जेव्हा त्यांचा संबंध असतो किवा त्यांना जेव्हा डावलेले गेलेले असते तेव्हाच ते  लोकसभा निवडणुकीतही  रस घेतात हा इतिहास आहे.आता ते जो रस घेत आहेत तो त्यांना डावलले गेल्यामुळं.

– लोकसभेच्या निवडणुका जवळ येत असताना एक दोन वेळा अंतुले याचं नाव वाचण्यात आलं. “रायगडची जागा कॉग्रेसनेच लढवावी” अशी अंतुलेंची इच्छा असल्याची बातमीही वाचली होती .पक्षासाठी असा हट्ट अंतुले धरतात म्हणून अनेकांना बरंही वाटलं असेल.मला मात्र अंतुलेंचा हा आग्रह पक्षासाठी चालला असेल यावर विश्वास बसत नव्हता.नंतर अपेक्षेप्रमाणं बातमी आली,” अंतुले स्वतः इच्छुक नाही त पण रायगडची जागा अंतुले यांची मुलगा किंवा मुलीला मिळावी अशी त्यांची इच्छा आहे ” हे समोर आलं.त्यासाठी त्यांनी खटाटोपही करून पाहिला,पण कॉग्रेस त्यांच्या आग्रहाला बळी पडली नाही.समर्थ  उमेदवारच नसल्यानं कॉग्रेसनं ही जागा राष्ट्रवादीसाठी सोडण्याचा नि र्णय़ घेतला.मला वाटतं, कॉग्रेसचा तो नि र्णय योग्यच होता.मात्र पक्षानं आपल्याला डावलून नि र्णय़ घेतल्याबद्दल स्वाभाविकपणे अंतुले चिडले आणि नेहमीप्रमाणे त्यांनी कॉग्रेस नेतृत्वावरच तोफ डागली. “नरेंद्र मोदी आणि राहूल गांधी पंतप्रधानपदाच्या पात्रतेचे  नाहीत” असे “रोखठोक” विधान त्यांनी केले आहे.राहूल गांधी यांचं एकट्याचं नाव घेतलं तर गहजब माजेल म्हणून त्यांनी मोदींनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं असलं तरी त्यांचा राग राहूल यांच्यावरच आहे हे लपून राहिलेेलं नाही.”राहूल गांधी यांनी अगोदर मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळात काम करावं आणि नंतरच पंतप्रधानपदाची दावेदारी दाखल करावी “अशीही त्यांची सूचना आहे. – हे विधान करतानाच आपण “खरं तेच बोलतो ” अशी पुष्ठीही त्यांनी जोडली आहे.ही पुष्ठी जाडताना   राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांना कोणता अनुभव होता हे मात्र त्यांनी स्पष्ट केलं नाही. असं विचारलेलंही त्याना आवडत नाही.ते जे बोलतात तेच अंतिम सत्य असतं यावर त्यांचा गाढा विश्वास आहे.समजा अंतुले यांच्या घरातील किंवा नात्यातील व्यक्तीला तिकिट मिळालं असतं तर त्यांनी हे सत्य कथन केंलं असतं का?  तर या प्रश्नाचं उत्तर नाही असंच असेल.मात्र पक्षानं डावलेले असल्यानं ते चिडले.त्यातून त्यांनी राहूल गांधी यांची लायकी काढली.तेवढ्यावरही ते थांबले नाहीत रायगडमधील त्यांचा गट म्हणे,शेकापच्या उमेदवारास पाठिंबा देणार आहे.जयंत पाटील यांनीच ही माहिती दिली आहे.अंतुले यांनी त्याचा अजून इन्कार केलेला नाही म्हणजे जयंत पाटील जे बोलले आहेत ते सत्य आहे असं म्हणता येईल.अंतुले आता 85 वर्षांचे झालेले असल्यानं आता त्याचं राजकारण जवळपास संपल्यातच जमा आहे. ते राहूल गाधी यांच्या विरोधात बोलू शकतात किंवा पक्षाच्या विरोधात शेकापला मदत कऱण्याची भूमिकाही घेऊ शकतात.मात्र माणिक जगताप असोत,रामशेठ ठाकूर असतो,मधू ठाकूर असोत किंवा रवी पाटील असोत याना असं बोलता आणि पक्षानं घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात काही करताही येणार नाही.याचं कारण त्यांना जिल्हयात अजून राजकारण करायचं आहे.लोकसभेच्या निवडणुकात त्यांच्या विधानसभेची गणितं दडलेलं असल्यानं त्यांना पक्षाचा आदेश मानणं आणि सुनील तटकरेंना निवडणून आणणं क्रमप्राप्त आहे.त्यात त्याचा व्यक्तिगत स्वार्थही आहे.कारण लोकसभेत सुनील तटक रेंना काही द गा फटका झाला तर कॉग्रेसचे जे नेेते आमदार व्हायला उत्सुक आहेत त्यांची खैर नाही हे त्यांनाही माहित असल्यानं ते तटकरे यांच्या कामाला लागले आहेत.आणखी एक कंगोर आहे.अंतुले कोणाला मदत करायला सागतात तर शेकापला.  मधू ठाकूर,रामशेठ ठाकूर,रवी पाटील यांची शेकापशी व्यक्तिगत दुष्मनी आहे.अशा स्थितीत अंतुले सागतात म्हणून शेकापला मदत करीत तटकरेंना अंगावर घेण्याएवढे अपरिपक्व राजकारणी यापैकी कोणीच नाही.कॉग्रेसचे हे सारे नेते पाहिजे तर मुनलाईटवर जाऊन अंतुलेंना कर्णिसात घालतील पण ते म्हणतात म्हणून शेकापला मदत नक्कीच करणार नाहीत.

मग जयंत पाटील जो कॉग्रेसमधील अंतुले गट म्हणतात तो कोणता ? हा प्रश्न वाचकांना पडू शकतो.रायगडात अंतुलेंचा असा स्वतःचा कोणताही गट  नाही.जिल्हा का्रग्रेसमध्ये भांडणं लावायची,नेत्यांना आपसात झुंजवत ठेवायचं आणि एकदा एकाला तर नंतर दुसऱ्याला मुनलाईटवर बोलावून पक्षात परस्पर अविश्वासाचे वातावरण तयार करायचे असेच राजकारण करीत अंतुले यांनी जिल्हा कॉग्रेसवर अनेक वर्षे पकड ठेवली.अंतुलेंचं जेष्ठत्व,त्याचं पक्षात असलेलं वजन यामुळे जिल्हयातील पक्षाचे नेते कधी त्यांच्या विरोधात गेले नाहीत.या मागं काही अंशी भितीही होती .हे सारं खरं असलं तरी अंतुले पक्षाच्या विरोधात भूमिका घ्या म्हटल्यानं कोणी त्यांची री ओढेल अशी अजिबात शक्यता नाही.1984 ची परिस्थिती वेगळी होती,त्यावेळचा प्रसंग वेगळा होता आणि त्यावेळचे अंतुलेही वेगळे होते.आज तशी स्थिती जिल्हयात नसल्यानं अंतुलेंना मानणारेही त्यांचा आदेश माऩत शेकापला मदत करतील असं मला अजिबात वाटत नाही.जिल्हयात अशी अनेक घराणी आहेत की,ज्यांच्या चार-चार पिढ्या कॉग्रेसशी एकरूप झालेल्या आहेत.ही जुनी घराणी नक्कीच अंतुलेंवर प्रेम कऱणारी आहेत पण अंतुले सागतात म्हणून ही मंडळी शेकापला मदत करतील हे शक्य नाही.कारण जिल्हयातील प्रामाणिक कॉग्रेसवाल्यानं नेहमीच शेकापच्या विरोधात राजकारण केलेलं आहे,किंबहुना शेकाप विरोध हाच त्यांच्या राजकारणाचा धागा राहिलेला आहे.त्यामुळं नेेते कोठेही गेले तरी सामांन्य कॉग्रेस कार्यकर्ता पक्षातच राहिला.पक्षादेश हाच त्याच्यासाठी अंतिम शब्द राहिल्यानेच अंतुले औरंगाबादला पळून गेल्यानतंरही पुप्पा साबळे या नवख्या उमेदवारालाही तब्बल दीड लाख मतं पडली होती.ही मतं कोण्या एका गटाची नव्हती तर कॉग्रेसला मानणाऱ्या सामांन्य रायगडवासियांची होती हे विसरता येणार नाही.1984चा अनुभव लक्षात घेऊन अंतुले लोकांना गृहित धरणार असतील तर तो त्यांचा भ्रम ठऱणार आहे. कारण आज अंतुलेंवर अन्याय झालाय असं कोणालाच वाटत नाही.कॉग्रेसनं एवढं भरभरून दान अंतुले यांच्या पदरात टाकलेलं आहे की,त्यांनी पक्षाचं कायम कृतज्ञ राहायला हवं असंच सामांन्य कॉग्रस कार्यकर्त्याला वाटतं,पण काही माणसं कायम असंतुष्ट असतात.अंतुले याच पंथातले आहेत.का्रग्रेसने अंतुलेंना1962मध्ये प्रारंभी आमदार केले.त्यानंतर अनेकदा ते आमदार झाले.राज्यमंत्री ,कॅबिनेट मंत्री आणि अंतिमतः – मुख्यमंत्रीपदही त्यांना दिलं.9जून 1980 ते फ़ेब्रुवारी 82 या काळात ते मुख्यमंत्री होते.पण एका प्रतिष्ठानसाठी घेतलेल्या निधीचे प्रकऱण अंगलट आले.न्यायालयाने त्यांच्या विरोधात निकाल दिल्यानं त्याना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं.त्यानंतर त्यांनी वेगळा पक्ष काढला.त्यातून काही राजकारण पुढं जात नाही असं दिसल्यावर ते पुन्हा कॉग्रेस पक्षात परतले.त्यानंतरही त्याचं बंड विसरून कॉग्रेसनं त्यांना वारंवार खासदार केलं.1989,1991,1996 असे सलग तीन वेळा  आणि नंतर 2004मध्ये ते लोकसभेवर कॉग्रेसचे खासदार म्हणून गेले.त्यांना एकदा राज्यसभेवरही पाठविले गेले होते.केंद्रीय मंत्री म्हणून ते अगोदर नरसिंहरावांच्या आणि नंतर मनमोहनसिंग यांच्या सरकारात होते.2009मध्ये अनंत गीते यांच्याविरोधात ते पराभूत झाले  नसते तर ते पुन्हा मंत्री नक्कीच झाले असते.आता यापेक्षा आणखी काय हवं होतं अंतुलेंना.? जिल्हयात असे असंख्य निष्टावान कार्यकर्ते आहेत की,ज्यांना पक्षानं जिल्हा परिषदेतही पाठविलं नाही पण त्यांनी पक्षाशी कधी फंदफितुरी केली नाही.पक्षादेश कधी अव्हेरला नाही. – पक्ष माझं ऐकत नसेल तर थेट पक्षनेतृत्वावर झोड उठवत शेकापला मदत कऱण्याची भाषाही केलेली नाही.अंतुलेंना सारं काही मिळुनही ते जर पुन्हा बंडांची भाषा कऱणार असतील तर ते यशस्वी होणार नाही.चार माणसंही त्यांच्या बरोबर असणार नाहीत .अंतुले शेकापसाठी सभा घेऊ लागले तर ज्या मैदानावर त्याचं हार फुलांनी कॉग्रेसवाल्यांनी स्वागत केलं ति थं अतुलेंना काटे बोचल्याशिवाय राहणार नाहीत.

कारण वडखळ नाक्यावर प्रभाकर पाटील यांनी अंतुलेंची गाडी अडवून त्यात स्मगलिंग चं सोनं असल्यानं गाडीची तपासणी करायला भाग पाडलेलं प्रकऱण असेल किंवा ते बाधकाम मंत्री असताना त्यांच्यावर शेकाप नेत्यांनी उचललेली चप्पल असेल हे सारे प्रसंग कदाचित अंतुले विसरले असतील पण सामांन्य कॉग्रेस कार्यकर्त्यांच्या मनातील ही बोच आजही कमी झालेली नाही.  या कारणांमुळे अनेक कॉग्रेसजन शेकापला आजही माफ करायला तयार नाहीत.मग भले अंतुलेनी स्वार्थासाठी ते जहर गिळले तरीही सामांन्य कार्यकर्त्याच्या मात्र शेकापला मदत करण्याचा अंतुलेंचा पवित्रा पचनी पडणार नाही.हे वास्तव ओळखून अंतुले यांनी पक्षानं जे दिलं ते इतरांपेक्षा किती तरी पटीनं जास्तीचं दिलं याची जाणीव ठेऊन गप्प बसायला हवं होतं.अशाने  त्याचा आदर जिल्हयात पुढेही ठेवला गेला असता.मुनलाईटवरचा राबताही कायम राहिला असता पण आता नियमित मुनलाईटवर जाणारे रामशेठ ठाकूर असोत की अन्य कोणी ते अंतुलेंना भेटायला जावू शकणार नाहीत .त्यांनी तसं केलं तरी ते पक्ष शिस्तीच्या विरोधात जाईल आणि पक्षाच्या कारवाईला तोंड देण्याची वेळ त्यांच्यावर येईल.त्यामुळं अंतुले एकटे पडतील हे नक्की.कुठं थाबायचं हे लक्षात नाही आलं की अशीच वेळ येते.हे अंतुले असतील किंवा दत्ता खानविलकर यांना  हे कोण सांगणार ?

-एस एम देशमुख

आता रोबो जर्नालिझम

0

अगोदर प्रन्ट जर्नालिझम,नंतर इलेक्ट्रॉनिक जर्नालिझम नंतर आला वेब जार्नालिझम आणि आता येत आहे रोबो जर्नालिझम.म्हणजे बातम्या लिहिण्यासाठी आता मनुष्य पत्रकाराची गरज असणार नाही तर हे काम रोबो करणार आहे.अमेरिकेतील द लांन्य एजिल्स टाइम्स या वृत्तपत्राने रोबो जर्नालिझमला सुरूवात केली आहे.या दैनिकाने रोबो पत्रकाराची कामं करणारा प्रोग्राम तयार केला आहे.केन श्वेन्के तयार केलेल्या या प्रोग्रामचा काल प्रयोग केला गेला.तो यशस्वी झाला.भूकंप आल्यानंतर रोबो पत्रकार काही मिनिटात भूकंपावर एक लेख लिहून तयार करणार आहे.टाइम्सच्या रोबोने पहिली बातमी भूकंपाचीच दिली आहे.रोबोला सूचना दिल्यानंतर केवळ तीन मिनिटात रोबोने बातमी तयार करून ती वेबसाईठवर पोस्ट केली.अर्थात हा रोबो केवळ भूकंपाच्याच बातम्या देईल असे नाही तर खेळ,गुन्हेगारी विश्वाच्या बातम्याही तो देणार असून अन्य दैनिकात त्यादृष्टीने प्रयोग सुरू आहेत.
रोबोट पत्रकारावरून पाश्चात्य देशातील पत्रकार आणि पत्रकार संघटनांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.रोबो पत्रकार भविष्यात आपली जागा तर घेणार नाही ना या आशंकेने सारे पत्रकार अस्वस्थ झाले आहेत.ही व्यवस्था आपल्याकडे यायलाही आता फार वेळ लागणार नाही.अर्थात रोबो माहिती संकलीत करून ती एकत्र कऱून बातमी तयार कऱणार असल्याने त्यात मानुसकीचा ओलावा असणार नाही असे अनेक पत्रकारांचे म्हणणे आहे.भूकंप असेल,गारपीट असेल किंवा तत्सम नैसर्गिक आपत्तीच्या बातम्या देताना नुसतीच आकडेवारी उपयोगाची नसते त्यात त्या बातमीला मानवेतचा गंधही असला पाहिजे.

पत्रकार तरूणीवर गॅंगरेप,आरोप सिद्द

0

शक्तीमिल सामूहिक बलात्कारप्रकरणी चारही आरोपींवर गुन्हा सिद्ध झाला असून त्यांना उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे. विजय जाधव, सिराज रहमान, कासिम बंगाली, सलीम अन्सारी या चौघांवर बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाला आहे. .शक्तीमिल कम्पाऊंडमध्ये ३१ जुलै रोजी टेलिफोन ऑपरेटर असलेल्या तरुणीवर आणि २२ ऑगस्ट रोजी महिला पत्रकारावर सामूहिक बलात्कार झाला होता.

२२ ऑगस्टला पत्रकार तरुणी एका सहकाऱ्यासोबत फोटोग्राफीसाठी शक्ती मिल परिसरात गेली होती. त्यावेळी तिथे पाच जणांनी तिच्यावर अत्याचार केले.

याच आरोपींपैकी विजय जाधव, कासीम बंगाली आणि सलीम अन्सारी या तिघांवर ३१ जुलै रोजी टेलिफोन ऑपरेटर तरुणीवर झालेल्या बलात्कार केल्याचा आरोप होता.

पत्रकार खुशवंंत सिंह यांचे निधन

0

वरिष्ठ संपादक,लेखक,खुशवंत सिंह यांचे आज दिल्लीत निधन झाले.मृत्यूसमयी ते 99 वर्षांचे होते. गेली अॆनक दिवस आजारी असलेल्या खुशवंत सिंह यांनी आज आपला निरोप घेतला.

2 फेब्रुवारी 1915 रोजी पंजाबातील एका गावात जन्मलेल्या खुशवतं सिह यांची पत्रकारितेतील कारकीर्द वादळी ठरली.इलेस्टेटेड विकलीचे संपादक असताना त्यानी विकली नवा आयाम मिळवून दिला.हिंदुस्थान टाइम्स ,नॅशनल हेरॉल्ड आणि अन्य काही दैनिकाचे संपादक म्हणूनही त्यांनी काम केले. योजना या सरकारी नियतकालिकाचे संपादनही त्यांनी केले होते.
बिनधास्त स्वभाव,तेवढीच रोखठोक लेखनशैली आणि मिस्किल स्वभावाच्या खुशवंत सिंह यांना पद्मविभूषण मिळालेले आहे.ते राज्यसभा सदस्यही राहिलेले आहेत.गेल्या वर्षीच म्हणजे वयाच्या 98व्या वर्षी त्यांचे एक पुस्तक प्रसिध्द झाले होते.
त्यांच्या निधनाने इंग्रजी पत्रकारितेतील एक वादळी पर्व संपले आहे.बातमीदारची खुशवंतसिंह यांना भावपूर्ण श्रध्दांजली

पत्रकाराची आत्महत्त्या

0

वैकुंठपूर येथील हरिभूमीचे पत्रकार गुलाब बघेल यांनी विषारी औषध घेऊन काल रात्री आत्महत्या केली.आत्महत्तया केली त्यावेळी त्यांची पत्नी माहेराला गेलेली होती.घरात ते एकटेच होते.सकाळी दरवाजा उघडला जात नाही असे दिसले तेव्हा काही पत्रकारांना बोलावून दरवाजा तोडण्यात आला.तेव्हा बघेल मृतावस्थेत सापडले.मृतदहाजवळ सल्फासच्या गोळ्या मिळाल्या आहेत.ते जेथे भाड्याने राहात होते त्या घरच्या मालकाने पती पत्नीत गेली काही दिवस वाद होता त्यातून ही घटना घडलेल्ीी असू शकते असे म्हटले असले तरी पालोसिंनी मात्र या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.आत्महत्या म्हणून घटनेची नोंद कऱण्यात आली आहे.

चवदार तळे सत्यागृहाचा 87वा वर्धापनदिन

0
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या  समतेच्या लढ्यात महाडच्या चवदार तळे सत्यागृहाला अनन्यसाधारण महत्व असल्यानेच या घटनेचा उल्लेख महाडचा धर्मसंगर असाच केला जातो.
अस्पृश्यांसाठी सार्वजनिक पानवठे आणि तलाव,विहिरी खुल्या कऱण्यासंबंधीचा सी.के.बोले यांचा एक ठराव विधिमंडळानं संमत केला होता.मात्र या ठरावाची अंमलबजावणी स्थानिक संस्थेनं करायची होती.त्यानुसार महाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुरबानान टिपणीस यांनी देखील गावातील सर्व पानवटे सर्वांसाठी खुले करण्याचा ठराव 5 जानेवारी 1924 रोजी पालिकेत मंजूर करून घेतला होता.प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नव्हती.याच काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या बहिष्कृत हितकारिणी सभेचं रायगड जिल्हयाचं अधिवेशन 19 आणि 20 मार्च रोजी महाडला घ्यायचं ठरलं.या अधिवेशनासाठी 2500 लोक उपस्थित होते.परिषदेत 33 ठराव मंजूर झाले.परिषदेचा समारोप करताना अनंतराव चित्र यांनी “आपण चवदार तळ्यावर जावू आणि तेथील जल प्राशन करू” अशी सूचना मांडली.त्यानुसार डॉ.बाबासाहेब आंबडकरांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते चवदार तळ्यावर गेले आणि तेथील जलप्राशन केले.हा दिवस होता 20 मार्चचा.या दिवसाचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी लाखो भीमसैनिक महाडच्या क्रांती भूमीत अभिवादन करण्यासाठी येतात.यावर्षी चवदार तळ्याचा 87 वा वर्धापन आज साजरा होत असून त्यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.येणाऱ्या  कार्यकर्त्यांना कोणतीही अडचण होऊ नये म्हणून महाड नगरपालिकेने सारी व्यवस्था केल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक झिजाड यांनी दिली.

सोनपेठमध्ये पत्रकाराला अमानूष मारहाण

0

परभणी जिल्हयातील सोनपेठ येथील सामनाचे पत्रकार भागवत शंकरआप्पा पोपडे यांच्यावर राष्ट्रवादीच्या काही गुंडांनी काल रात्री आमानूष हल्ला केला.दहा ते पंधरा गुंडांनी हा हल्ला केला.पोपडे यांना मारहाण होत असताना ते जिवाच्या आकांताने ओरडत पोलिस स्टेशनच्या दिेशेने पळत होते तेव्हा असंख्य बघे हा प्रकार पहात होते पण कोणीही पोपडे यांची सुटका केली नाही. एखाद्या चित्रपटात शोभावे असे हे दृश्य होते.हा प्रकार सुरू असताना काही जणांनी पोलिसांना फोन केला पण साहेब शिवजयंतीच्या बंदोबस्तात आहेत असे उत्तर दिले.पोलिस स्ठेशन गाठल्यावर पोपडे यांनी तक्रार दाखल केली आङे.त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि खिश्यातील एक हजार रूपये गुंडांनी लंपास केले आहेत.याबाबतची त्रक्रार पोलिसात दाखल केली पण अजून गुन्हा दाखल केला गेलेला नाही.सोनपेठचे पीआय कापकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले.मात्र मारहाणीचा गुन्हा दाखल करू पण दरोड्याचा गुन्हा दाखल करता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल.याविरोधात सोनपेठचे पत्रकार तसेच परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तसेच पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे पदाधिकारी आज परभणी जिल्हा पोलिस अधीक्षकांना भेटणार आहेत.हा विषय आर.आर.पाटील यांच्या कानावर घालण्यात आला आहे.शिवसेनेचे बंडू जाधव यांच्या कार्यक्रमाची बातमी दिल्याने संतापून हा हल्ला केला गेला आहे.पत्रकारांनी कार्यक्रमाच्या बातम्याही द्यायच्या नाहीत काय असा प्रश्ऩ आता विचारला जात आहे.

पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प्रमुख एस.एम.देशमुख यांनी या हल्लयाचा तीव ्र शब्दात धिक्कार करीत आहे.गेल्या अडिच महिन्यात राज्यातील पत्रकारांवर झालेला हा पंधरावा हल्ला आहे.
राज्याभरातील पत्रकार आणि पत्रकार संघटनांनी या हल्लयाचा निषेध केला पाहिजे.

आशुतोष हुए नौ दो ग्यारह

0

न्यूज रूममध्ये बसून राजकारणाचे आणि निवडणूक निकालाचे विश्लेषण कऱणे वेगळी गोष्ट आहे आणि जनतेमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजावून घेणे आणि त्याच्या विारोधाचा मुकाबला करणे ही गोष्ट वेगळी आहे.पत्रकारिता सोडून राजकारणात आलेल्या आशुतोष यांना काल हा अनुभव आला.

आशुतोोष आम आदमी पार्टीच्यावतीनं दिल्लीतील चांदनी चौक मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत.काल आपल्या प्रचारासाठी आशुतोष बाहेर पडले पण स्थानिक लोकांनी त्यांच्या आणि त्यांचे नेते अरविंद केजराीवाल यांच्याविरोधात नारेबाजी सुरू केली.आशुतोष यांना लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणंही कठिण झालं.लोकाचा संताप पाहून अशा पध्दतीनं घाबरले की,बाईकवर बसून ते नौ दो ग्यारह झाले.त्याची व्हिडीओ क्लीप येथे देत आहोत.

शिवजयंती उत्साहात साजरी

0

किल्ले रायगडावर आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.काल रात्रीपासूनच हजारो शिवसैनिक किल्ले रायगडावर जमा झाले होते.पहाटे 4 वाजता शिवाजी वाळण येथील तरूणांनी शिवरायंाच्या गडावरील पुतळ्यास अभिवादन करून सकाळी पाचाड-कोझर मार्गे महाड शहरातून शिवज्योतीची मिरवणूक काढली.त्यानंतर शङरातील शिवरायांच्या पुतळ्यासही अभिवादन करण्यात आले.हजारो शिवप्रमींच्या जय शिवाजी ,जय भवानीच्या गजरांनी आज रायगड आणि परिसर दणाणून गेला होता.

आज अलिबाग येथेही शिवजयंती निमित्त नगराध्यक्षा नमिता नाईक यांनी शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.तसेच नंदूरबार येथील शिवप्रमी चंद्रशेखर बेहेरे यांनी कुलाबा किल्लयातून प्रज्वलीत केलेली शिवज्योत घेऊन नंदूरबारकडे प्रय़ान केले.यावेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

POPULAR POSTS

error: Content is protected !!