शक्तीमिल सामूहिक बलात्कारप्रकरणी चारही आरोपींवर गुन्हा सिद्ध झाला असून त्यांना उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे. विजय जाधव, सिराज रहमान, कासिम बंगाली, सलीम अन्सारी या चौघांवर बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाला आहे. .शक्तीमिल कम्पाऊंडमध्ये ३१ जुलै रोजी टेलिफोन ऑपरेटर असलेल्या तरुणीवर आणि २२ ऑगस्ट रोजी महिला पत्रकारावर सामूहिक बलात्कार झाला होता.
२२ ऑगस्टला पत्रकार तरुणी एका सहकाऱ्यासोबत फोटोग्राफीसाठी शक्ती मिल परिसरात गेली होती. त्यावेळी तिथे पाच जणांनी तिच्यावर अत्याचार केले.
याच आरोपींपैकी विजय जाधव, कासीम बंगाली आणि सलीम अन्सारी या तिघांवर ३१ जुलै रोजी टेलिफोन ऑपरेटर तरुणीवर झालेल्या बलात्कार केल्याचा आरोप होता.