Saturday, April 27, 2024
Home Blog Page 357

रोह्यात डोंगर पेटले

0
रोहा तालुक्यात गेली आठ दिवस सतत डोंगरांना लागत असलेल्या वणव्याने मोठ्या प्रमाणावर वनसंपत्ती जळून खाक होत आहे.त्याच बरोबर या परिसरात असलेले मोर,पोपट,साळिंदर,ससे,भेकर,रानडुकरे आदि पक्षी आणि प्राणी देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत.डोंगरांना लागत असलेल्या वणव्यामुळे वरकस भागात लागवड केलेल्या आंबा,काजू आदि फळबागांची आणि शेतीचीही मोठ्‌या प्रमाणावर हानी होत आहे.त्या मुळे शेतकरी चिंतेत आहेत.डोंगरांना लागणाऱ्या आगी मुळे होणारे नुकसान भरपाई देण्याची कोणतीही तरतूद वनखात्याकडे नसल्याने अनेक शेतकरी हतबल झाले आहेत.
कळसगिरी,हनुमान टेकडी,खांब,सुकेळी आणि चनेरा आदि भागात हे वणवे लागत आहेत.खांब य़ेथील पर्वतरांगा तर सतत आठ दिवस धुमसत आहेत.सुकेळी येथील आगीची तीव्रताही प्रंचंड असल्याने आग विझवायला जायलाही कोणी तयार नाही.काही दिवसांपुर्वीच तळे परिसरात आगीने एका वृध्दाचा बळी घेतला आहे.दिसभर धुराचे लोट आणि रात्री पेटलेले डोंगर पहातच मुंबई-गोवा महामागावरून प्रवास करावा लागत आहे.

अंतुलेंच्या आशीर्वादाचा अर्थ

0

कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.आर.अंतुले यांनी रायगडातील शेकापच्या उमेदवारांना आशीर्वाद दिल्याने नव्या चर्चेला उधाण आले आहे.85 वर्षांच्या अंतुले यांनी असा निर्णय का घेतला ?, शेकाप बरोबर असलेले पन्नास वर्षांचे वैर अंतुले एका रात्रीत कसे विसरले ?,त्यांनी आशीर्वाद दिल्याने जिल्हयातील कॉग्रेसचे नेते त्याचा शब्द पाळतील काय?  त्यानी आशीर्वाद दिल्याने त्याचा फायदा शेकापला होईल काय?  या प्रश्नांची चर्चा करणारा एक कार्यक्रम मंगळवारी रात्री झी-24 तासवर झाला.त्याची व्हिडिओ क्लीप ज्यांनी हा कार्यक्रम पाहिला नाही त्यांच्यासाठी…

विवेक पाटील सेनेत जाणार नाहीत हे नक्की पण …

0

“शेकापचे उरणचे आमदार विवेक पाटील शिवसेनेत जाणार” अशी बातमी सकाळच्या मुंबई आवृत्तीत रविवारी प्रसिध्द झाली.सकाळच्या विश्वासार्हतेबद्दल पूर्ण आदर राखून हे स्पष्ट कऱणं भाग आहे की,असं काही होणं शक्य नाही.याची दोन कारणं आहेत,पहिलं स्व.दि.बा.पाटील आयुष्यभर शेकापमध्ये राहिले.आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी शिवसेनेला जवळ केले.त्यानंतर त्यांचे जे हाल झाले ते विवेक पाटलांना माहिती आहेत.दि.बां.सारखा ज्येष्ठ नेता शिवसेनेत गेला तरी उरण-पनवेलमधील पक्षाचे सामांन्य कार्यकर्ते शिवसेनेत गेले नाहीत.कारण ते पक्षाशी “कमिटेड”आहेत.उरण-पनवेल-अलिबाग तालुक्यात अशी अनेक घराणी आहेत की,ती शेकापशी चार-चार पिढ्यांपासून जोडली गेलेली आहेत.लाल बावटा हा त्यांचा श्वास आहे.नेता जोवर लाल बावट्याचा आदर करतो तोवर ते नेत्यावर जीव ओवाळून टाकायला तयार असतात.नेता पक्षाशी बेईमान झाला तर ते त्याला वाऱ्यावर सोडतात,हा शेकापचा इतिहास आहे.विवेक पाटलांना हा इतिहास माहिती असल्याने ते शिवसेनेत जाणार नाहीत हे नक्की.

– विवेक पाटील शिवसेनेत जाऊ शकत नाहीत याचं दुसरं कारण असं की,ते सेनेत गेले तर त्यांची आमदारकीही धोक्यात येऊ शकते.कारण उरणमध्ये शिवसेना-भाजपची ताकद असली तरी ती स्वबळावर आपला उमेदवार निवडून आणू शकेल एवढी नक्कीच नाही.निवडून यायचं तर शेकापची साथ हवी.जर विवेक पाटील शिवसेनेत गेले तर शेकाप त्यांना पराभूत करण्याचा सर्वशक्तीनिशी प्रयत्न करणार हे उघड आहे.मतदारांचं प्रमाणं बघता त्यात ते यशस्वी होणार यातही शंका नाही.हे देखील राजकारण निपून विवेक पाटील यांना माहिती आहे.त्यामुळं ते लगेच पक्ष सोडण्याच्या भानगडीत पडणार नाहीत.शेकपमध्ये त्यांना फारसं भवितव्य नाही ते आमदारकीच्या पुढं जाऊ शकत नाहीत कारण तशी वेळ आलीच तर मंत्रीपदावर पहिला हक्क जयंत पाटीलच सांगतील आणि विवेक पाटील आमदारच राहतील हे ही त्यांना माहिती आहे तरीही ते पक्षांतर करण्याची राजकीय घोडचूक करणार नाहीत हे आजचे चित्र आहे.त्यामुळं सकाळच्या बातमी त्या अर्थानं निराधार ठरते.

याचा अर्थ सध्या रायगडमध्ये जयंत पाटील जे राजकारण करीत आहेत ते विवेक पाटलांना मान्य आहे असं नाही.विशेषतः शिवसेनेबरोबरची युती तोडून मनसेची मदत घेण्याची तसेच अ.र.अंतुलेचे आशीर्वाद घेण्यासाठी शेकापच्या उमेदवारांना मुनलाईटवर घेऊन जाण्याची  जयंत पाटील यांची ़़खेळी  विवेक पाटील आणि बाळाराम पाटील यांना अजिबात आवडलेली नाही असे त्यांचे समर्थक सांगतात.त्याचंही कारण आहे.जिल्हयात शेकाप आणि शिवसेनेची जी युती झालेली आहे त्याचे शिल्पकार विवेक पाटील हे आहेत.त्याचं कारण पनवेल-उरणच्या राजकारणात दडलेलं आहे.प्रारंभी म्हटल्याप्रमाणं पनवेल -उरणमध्ये शिवसेनेचा प्रभाव बऱ्यापैकी आहे. उऱण नगरपालिका भाजप-सेनेच्या ताब्यात आहे.जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरही युतीचाच पगडा आहे.याशिवाय आता खालापूर तालुक्यातील चौक आणि रसायनीचा परिसर उरणला जोडला गेलेला असल्याने आणि हा परिसर शिवसेनेचा परंपरागत बालेकिल्ला आहे.याउलट उरणमध्ये आणि पनवेलमध्ये राष्ट्रवादीची फारशी ताकद नाही. – पनवेलमध्ये कॉग्रेस भक्कम आहे.पनवेल नगरपालिका,आणि पनवेलची आमदारकी कॉग्रेसकडे आहे. अशा स्थितीत उरणची सुभेदारी पुनश्च मिळवायची तर शिवसेनेशी युती कऱण्यावाचून गत्यंतर नाही हे विवेक पाटील यांनी ओळखले आणि त्यांनी शिवसेनेच्या बबन पाटील यांच्यामार्फत ही युती घडवून आणली.याचा फायदा किमान उरण – पनवेल मध्ये   दोन्ही पक्षांना झाला.जिल्हा परिषदेत सत्ता आली.उरण पंचायत समिती किंवा उरणमधील जिल्हा परिषदेच्या मतदार संघातही युतीने कॉग्रेसला धूळ चाखली.युतीमुळे रामशेठ ठाकूर याचं काही चाललं नाही.विवेक पाटील याचं राजकारण व्यवस्थित चालू राहिलं.मात्र सेनेबरोबरच्या युतीचा जेवढा लाभ विवेक पाटील यांना झाला तेवढा लाभ आमदार  जयंत पाटील यांना झाला नाही.जिल्हा परिषदेत सत्तेत आज अलिबागच्या पाटील घराण्यातील कोणी नाही.शिवाय अलिबाग पंचायत समिती आम्ही आमच्या ताकदीवर निवडून आणली असं जयंत पाटील सांगतात आणि ते खरंही आहे.  थळ जिल्हा परिषद मतदार संघात जयतं पाटील याचं चिरंजीव नृपाल पाटील यांचा जो प्रचंड फरकाने पराभव झाला त्याला शिवसेनेचे असहकार्य कारणीभूत आहे असंही जयंत पाटील याचं म्हणणं आहे.विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेची मदत शेकापला मिळत नाही हे जयंत पाटील अनेकदा खासगीत सांगत असतात.अलिबाग तालुक्यात सेनेची दहा-बारा हजारच मतं आहेत ती आम्हाला मिळत नाहीत कारण तालुक्यातील शिवसैनिक परंपरागत शेकापचे विरोधक आहेत असा जयंत पाटील यांचा तर्क असतो.त्यामुळं पेण,पनवेल,उरणमध्ये शिवसेनेची जी मदत शेकापला होते त्यावर पाणी सोडत जयंत पाटील यांनी शिवसेनेबरोबरची युती तोडण्याची घोषणा केली.लोकसभेला आपला उमेदवारही उभा केला.मात्र असं विधानसभेच्या वेळेस झालं तर तिकडे विवेक पाटील आणि पेणमध्ये धैर्यशील पाटीलही धोक्यात येऊ शकतात.कारण त्यांना सेनेची मदत मिळते.ती त्यांना हवीही आहे.विवेक पाटील यांची पनवेल -उऱणमध्ये बलाढ्य रामशेठ ठाकूर यांच्या कॉग्रसशी लढाई आङे.धैर्यशील पाटील यांना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीशीही लढायचं आहे.त्यासाठी पेण आणि उरणच्या दोन्ही पाटलांना शिवसेनेशी युती हवी आहे.त्यासाठी त्यंाच जयंत पाटील यांच्यावर दबाव आहे.विवेक पाटील असोत किंवा धैर्यशील पाटील असोत या दोघांनाही मनसे किंवा लक्ष्मण जगताप यांचा काही उपयोग होणार नाही.कारण लक्ष्मण जगताप अगदी निवडून आले तरी त्याचं सारं लक्ष पिपरी-चिचवडमध्येच असेल तर मनसेचा विवेक पाटील किंवा धैर्यशील पाटील यांच्या मतदार संघात अजिबात प्रभाव नाङी.उरण आणि पेणमध्ये मनसेची अगदी पाच-पाच हजारमतंही नाहीत अशा स्थितीत शिवसेनेशी युती तोडून मनसेशी घरोबा कऱण्याचा जयंत पाटील यांचा खेळ विवेक पाटील यांच्यासाठी तरी आतबट्टयातला व्यवहार ठरणार असल्याने ते अस्वस्थ आहेत.खाजगीत युती तुटणार नाही असे हे दोन्ही नेते बोलतात.त्यात तथ्यही दिसते.कारण युती तोडायची घोषणा जयंत पाटील यांनी केली असली तरी ते अजून जिल्हा परिषदेच्या सत्तेतून बाहेर पडलेले नाहीत.ते लोकसभेपर्यत जिल्हा परिषदेच्या बाबतीत काहीच निर्णय घेणार नाहीत.जयंत पाटील आज खेळत असलेला  राजकीय जुगार हरलेच तर नक्कीच ते शिवसेनेबरोबरची युती तोडू शकणार नाहीत.विवेक पाटील त्यांना कुठल्याही परिस्थितीत तसे करू देणार  नाहीत.विवेक पाटील शिवसेनेच्या विरोधात बोलत नाहीत आणि बबन पाटीलही जयंत पाटील यांच्यावरच हल्ले करीत आहेत,ते विवेक पाटलांच्या विरोधात बोलत नाहीत हे ही रायगडच्या जनतेच्या लक्षात आल्याशिवाय राहिले नाही.यातून काय तो योग्य अर्थ घेण्याएवढी रायगडची जनता नक्कीच राजकीयदृष्टया परिपक्व आहे.

– या सगळ्या राजकारणाला अ.र.अंतुले यांनी शेकापच्या उमेदवारांना दिलेला आशीर्वाद हा देखील एक कंगोरा महत्वाचा आहे.उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे की,गेले पन्नास वर्षे रायगडात शेकाप विरूध्द कॉग्रेस अशीच लढत झालेली आहे.अनेकदा ही लढाई एवढी तीव्र होती की,दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांना रक्तही सांडावे लागले आहे.शेकापच्या नेत्यांनी अंतुलेवर चप्पल उगारण्यापर्यतही तेव्हा मजल गेलेली होती.अशा स्थितीत जयंत पाटील यांनी अंतुलेंचे आशीर्वाद घेण्यासाठी मूनलाईटवर  जाणे म्हणेज बाळासाहेबाच्या स्मारकासाठी शिवसेना नेत्यांनी शरद पवार यांचे दरवाजे ठोठावण्यासारखे होते.जिल्हयात अंतुलेचा प्रभाव पूर्वीसारखा राहिला नाही आणि पक्षातही अंतुलेंच्या शब्दाला आता पुर्वीसारखा मान राहिलेला नाही हे त्यांना डावलून ज्या पध्दतीनं कॉग्रेसने रायगड राष्ट्रवादीला आंदण  दिलाय त्यावरून सिध्द झालं आहे.तरीही जयंत पाटील मुनलाईटवर आपल्या दोन्ही उमेदवारांना घेऊन जातात आणि अंतुलेंचे आशीर्वाद घेतात ही गोष्ट ना कॉग्रेसवाल्यांच्या पचनी पडणारी आहे ना शेकापच्या कार्यकर्त्यांच्या.या आशीर्वाद नाट्याने पुन्हा एकदा विवेक पाटील यांची अडचण करून टाकली आहे.विवेक पाटील यांची उरण आणि पनवेलमधील लढाई प्रामुख्यानं कॉग्रेसशी आहे.रामशेठ ठाकुर यांनी दोन्ही तालुक्यात विवेक पाटील आणि  त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना नाकीनऊ आणलेले आहेत हे सर्वश्रुत आहे.अशा स्थितीत विवेक पाटील यांनी कॉग्रेसच्या भांडवलदारी राजकारणावर टीकास्त्र सोडायचे,कॉग्रेस हा पक्ष किती गरीब विरोधी आहे याचे पाढे वाचायचे आणि तिकडे जयंत पाटील यांनी मुनलाईटवर जाऊन एवढे दिवस जिल्हा कॉग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या अंतुलेंचे आशार्वाद घ्यायचे ही गोष्टही विवेक पाटील यांना आवडणे शक्य नाही.विवेक पाटील आणि बाळाराम पाटील मुनलाईटवर गेल्याचे किमान जयंत पाटील यांनी जे फोटो माध्यमांना दिलेत त्यातून तरी दिसून आलेले नाही.लोकसभेचे सोडा पण उद्या विधानसभेच्या निवडणुका जेव्हा होतील तेव्हा कॉग्रेसचे नेते अंतुलें शेकापच्या दोन्ही उमेदवारांना आशीर्वाद देत आहेत आणि मागे स्वतः जयंत पाटील हास्यविनोद करीत आहेत ही छायाचित्रे नक्की प्रसिध्द करतील तेव्हा विवेक पाटील यांना उत्तर देणे महाकठिण काम होणार आहे.कॉग्रेस नेत्याचे आशीर्वाद खरे की,कॉग्रेसवरची टीका खरी या आम आदमीच्या प्रश्नाला विवेक पाटलांकडे उत्तर नसेल.अंतुलेंनी उद्या कॉग्रेस सोडली किंवा कॉग्रेसने त्यांच्यावर कारवाई केली तरी परिस्थिती बदलणार नाही हे उघड सत्य आहे.त्यामुळे खाली शिवसेनेच्या रामदास कदम यांची जी अडचण झाली आहे तशीच अडचण पनवेल-उरणमध्ये विवेक पाटील यांची झालेली असल्याने त्यांची अवस्था इकडे आड तिकडे विहिर अशी झाली आहे.मात्र विवेक पाटील हे संयमी नेते आहेत.अनेकदा जयंत पाटील यांचे राजकारण पटले नसले तरी त्यांनी कधी आदळ-आपट केलेली नाही.पक्षातील ऐक्य टिकले पाहिजे ही भूमिका घेतच ते राजकारण करीत आले आहेत.मात्र आता त्याच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाल्याने ते या पेचातून स्वतःची कशी सुटका करून घेतात ते येत्या काही दिवसातच दिसणार आहे.

काही वर्षांपूर्वी विवेक पाटील राष्ट्रवादीमध्ये जाणार अशी बातमी सागरने प्रसिध्द केली होती,त्यावेळेस सागरच्या कार्यालयावर शेकापच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता.आता विवेक पाटील शिवसेनेत जाणार अशी बातमी सकाळमध्ये आल्यानंतर शेकापवाल्यांनी सकाळची होळी केली.असे हल्ले करून होळ्या करून किंवा पत्रकारांना दमदाटी करून प्रश्न संपणार नसतो.मुळात अशा बातम्या का येतात याचा विचार विवेक पाटील यांनी केला पाहिजे.अशा बातम्या वारंवार येत गेल्याने विवेक पाटील यांच्या विश्वासार्हतेचाच प्रश्न निर्माण होईल आणि ते त्यांच्या राजकीय कारकीर्दीसाठीही धोकादायक ठरू शकेल.राजकारणात विश्वासार्हता महत्वाची असते ती जपली नाही तर अडचणी येतात.अनेक राजकारण्यांना याचा अनुभव आलेला आहे.

[divider]

-एस.एम.देशमुख

[divider]

वाल पिकाचीही वाट लागली

0

बदलते हवामान आणि अवेळी पडणाऱ्या पावसामुळे रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या वाल उत्पादनावर विपरित परिणाम झाला आङे.त्यामुळे वाल उत्पादनात मोठी घट होणार असल्याने कोकणातील शेतकरी चिंतेत आहे.
वाल पिकाच्या बाबतीत रायगड जिल्हा राज्यात पहिला आहे.अलिबाग,रोहा,माणगाव तालुक्यात वालाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. रायगड जिल्हयात प्रसिध्द असलेल्या पोपटीसाठी वालाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो.मात्र सतत बदलणाऱ्या वातावरणाच्या आंबा पिकावर जसा परिणाम झालाय तसाच वाला पिकावरही परिणाम झालाय.त्यामुळे वाल पिकाच्या उत्पादनात लक्षणीय घट होणार असल्याने वालाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

 

आपच्या कार्यकर्त्यांची पत्रकारास मारपीट

0

राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याचे दिसल्यानंतर एका पत्रकाराने त्यास जेव्हा विरोध केला तेव्हा आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी संबंधित पत्रकारास लाथ्या बुक्कया आणि जोडयाने मारहाण केली.दिल्ली नजिक गुडवाव लोकसभा मतदार संघातील आप चे उमेदवार योगेंद्र यादव यांच्या प्रचाराच्या वेळेस धारूहेडा येथे ही घटना घडली.नंतर ही गोष्ट अरविंद केजरीवाल यांना कळल्यांनंतर त्यांनी माध्यमांची माफी मागितली.

पनवेलमध्ये सकाळची होळी

0

उरणचे पनवेलचे आमदार विवेक पाटील शिवसेनेत जाणार अशी बातमी आजच्या मुंबई सकाळमध्ये प्रसिध्द झाल्याने संतप्प झालेल्या विवेक पाटील समर्थकांनी आज सकाळी दैनिक सकाळची होळी केली.

आमदार जयंत पाटील यांनी शिवसेनेशी युती तोडून पक्षाचे उमेदवार उभे केले आहेत चर्चा अशी आहे की,ही भूमिका विवेक पाटील तसेच शेकापचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांना मान्य नव्हती.त्यामुळे ते नाराज होते.त्यातून अशी बातमी आल्याने आज पनवेलमध्ये खळबळ उडाली.या अगोदरही एकदा विवेक पाटील राष्ट्रवादीत जाणार अशी बातमी प्रसिध्द झाली होती.त्यानंतर सागर दैनिकाच्या कार्यालयावर शेकाप कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता.
सकाळने बातमीसोबत विवेक पाटील आणि बाळाराम पाटील यांची प्रतिक्रियाही प्रसिद्ध केली असून असा कोणताही नि र्णय आम्ही घेणार नाही आम्ही शेकापमध्येच शेवटपर्यत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .सकाळने दोन्ही बाजू मांडल्या असतानाही संतप्त शेकाप कार्यकर्त्यांनी आज अंकाची होळी केली.( बातमी बरोबरचे चित्र संग्रहातले आहे )

राजकीय पक्षांना पत्रकारांचे आवाहन

0

पत्रकारांच्या प्रश्नंाबाबात राजकीय
पक्षांनी आपली भूमिका निवडणूक
जाहिरनाम्यातून स्पष्ट करावी-समिती

पत्रकारांच्या प्रश्नंासंदर्भात राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी आणि त्याचा उल्लेख आपल्या जाहिरनाम्यातून करावा अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने कॉग्रेस,भाजप,राष्ट्रवादी,शिवसेना,मनसे,आम आदमी पार्टी,शेकाप,माकपं आदि पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांना पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.
समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी विविध पक्षांना पत्र पाठवून राजकीय पक्षांनी पत्रकारांच्या प्रश्नांकडे कशापध्दतीनं दुर्लक्ष केलंय याची इत्यंभूत माहिती दिली आहे.पत्रकार संरक्षण कायदा,पत्रकार पेन्शन योजना,पत्रकार अपघात आणि आरोग्य विमा योजना,मुक्त पत्रकारांसाठी वेतन निश्चिती,मजिठिया आयोगाची तातडीने अंमलबजावणी,राज्यात जर्नालिझम युनिर्व्हसिटी स्थापन करणे,राज्य प्रेस कौन्सिल स्थापन करणे,अधिस्वीकृती समितीचे तातडीने पुनर्गठण करणे ,टीव्ही पत्रकारांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करणे आदि मागण्यांसाठी राज्यातील पत्रकार गेली पाच वर्षे सनदशीर मार्गाने आंदोलन करीत आहेत मात्र सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी देखील सातत्यानं पत्रकारंाच्या या मागण्यांची उपेक्षाच केली आङे असा आरोप पत्रात करण्यात आला आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे शिष्टमंडळ जेव्हा राजकीय नेत्यांना भेटते तेव्हा सारेच तुमच्या मागण्या रास्त असून आम्ही तुमच्यासोबत असल्याची ग्वाही देत असतात पण निर्णय़ घेण्याची वेळ येते तेव्हा कधी समिती नेमून तर कधी अन्य फाटे फोडून विषय प्रलंबित ठेवले जातात.गेली अनेक वर्षे पत्रकार हाच अनुभव घेत असल्याने आता सर्वच पक्षांनी आपली भूमिका आपल्या जाहिरनाम्यातून स्पष्ट करावी अशी मागणी एस.एम.देशमुख यांनी सर्वच प्रमुख पक्षांच्या अध्यक्षांकडं केली आहे.

थोरल्या पवारांचे माध्यमांवर टीकास्त्र

0

आजवर पंडित नेहरु, शास्त्री, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, सोनिया गांधी यासारख्या नेत्यांची संपूर्ण भाषणे मीडियाने कधी ‘लाईव्ह’ केल्याचे पाहण्यात नाही. पण एका राजकीय पक्षाचे भाषण संपूर्ण टीव्ही मीडिया पूर्ण वेळ ‘लाईव्ह’ करीत आहे. याचा अर्थ वेगळा आहे. यातून वृत्तवाहिन्यांतही थैलीशाहीची संस्कृती रुजत आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस- कॉँग्रेस आघाडीतर्फे आयोजित मेळाव्यात पवार शनिवारी बोलत होते. ते म्हणाले, ”एखाद्या पक्षाने पंतप्रधानाचा उमेदवार निवडून पक्षाला नाही तर त्या उमेदवारासाठी मतदान करण्यास सांगितले जात आहे. देशाच्या निवडणुकीच्या इतिहासात असे प्रथमच घडत आहे. यातून देश लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे जात आहे. ही एक फॅसिस्ट प्रवृत्ती आहे. लोकशाहीच्या मुलभूत अधिकारावर आघात झाला आहे. या प्रवृत्तीचा पराभव केला पाहिजे. ”

“आम आदमी”ची संपत्ती 8 कोटी

0

आम आदमी पीर्टीचे उमेदवार आशूतोष यांच्याकडं आठ कोटी रूपयांची संपत्ती आहे.ही माहिती त्यंानीच चांदणी चाौक लोकसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज भरताना दिली.यामध्ये आपल्या पत्नीच्याही संपत्तीचा समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उत्तर पश्चिम दिल्लीतून लढणाऱ्या राखी बिर्ला यांच्याकडे 16 लाख रूपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे.

पत्रकार एम.जे.अकबर भाजपमध्ये

0

वरिष्ठ पत्रकार आणि कॉग्रेसचे माजी खासदार एम.जे.अकबर यांनी आज पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.नीती के लिए राजनीती करण्यासाठी आपण राजकारणात परत आलोत असं अकबर याचंं म्हणणं आहे.अकबर हे बिहारमधील किशनगंज येथून दोन वेळा कॉग्रेसच्या तिकीटावर निवडून आले आहेत.भाजपमध्ये प्रवेश करताना त्यांनी अपेक्षेप्रमाणे मोदींवर स्तुती सुमने उधळली.मोदीचं नेतृत्व देशासाठी आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.देशातील मुस्लिम भाजप बरोबर येतील अशी आशा त्यांनी व्यक्त केले.अकबर यांना भाजपची दिल्लीतून उमेदवारी मिळेल अशी शक्यता आहे.

POPULAR POSTS

error: Content is protected !!