Tuesday, May 7, 2024
Home Blog Page 356

पेड न्यूजवर लक्ष ठेवणार- भांगे

0

पेड न्यूजच्या संदर्भात निवडणूक आय़ोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्हा स्तरावर मिडिया सर्टिफिकेशन ऍन्ड मॉनिटरिंग कमिटी स्थापन करण्यात आली असून या कमिटीच्या माध्यमातून पेड न्यूजवर लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी दिली.
रायगडातील माध्यमांचे संपादक आणि इलेक्टॉनिक मिडियाचे प्रतिनिधी यांची विशष बैठक गुरूवारी अलिबाग येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.त्यावेळी बोलताना जिल्हाधिकारी सुमंत भांगे यानी निवडणूक मुक्त,निर्भय आणि शांततेच्या मार्गाने पार पडावी यासाठी माध्यमांनी सक्रीय योददान द्यावे असे आवाहन केले.मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आणि नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यत मतदार नोंदणी करता येणार आहे यासंबंधीची जनजागृती माध्यमांनी करावी असे आवाहनही त्यांनी केले.
निवडणूक कालावधीत माध्यमांनी पेड न्यूज घेऊ नयेत असे आवाहन करतानाच पेड न्यूज रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावरही जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींची मतं जाणून घेतली.

त्यापेक्षा राष्ट्रवादीच कॉंग्रेसमध्ये विलीन करा की…

0

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सिंधुदुर्गात निलेश राणेंविरोधातला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा वाद आता विकोपाला गेलाय. उद्योगमंत्री नारायण राणे यांचा मुलगा आणि आघाडीतर्फे लोकसभेचे उमेदवार असलेले निलेश राणे यांचा प्रचार करणार नाही, असा पवित्रा जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे.त्यानंतर हे प्रकरण वरिष्ठांपर्यंत गेलं आणि निलेश राणे यांचा प्रचार करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून आले. पण, तरीही स्थानिक कार्यकर्ते बधले नाही आणि आपला विरोध कायम ठेवला. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तर आघाडीच्या उमेदवाराला सहकार्य केलं नाही तर खड्यासारखं बाजूला करू, असा इशाराही दिला. उदय सामंत यांच्या इशार्‍यानंतर सिंधुदुर्गातले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणखीनच संतप्त झाले आहे.

आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करायचा असेल तर राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस मध्येच का विलीन करीत नाही असा सवाल या कार्यकर्त्यांनी विचारलाय. आपल्याला खड्यासारखं बाजूला केलं तरी चालेल मात्र काहीही झालं तरी काँग्रेस उमेदवार निलेश राणे यांचा प्रचार न करण्यावर आपण ठाम आहोत असं या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा सांगितलंय.

वर्तमानपत्रं वाचू नका,टीव्ही पाहू नका. राष्ट्रवादीच्या आमदाराचा फतवा

0

वाहिन्यावरील सत्य विश्लेषण किंवा वर्तमानपत्रातील सत्य बातमीही आपल्या विरोधात जाणारी असेल तर ती कोणत्याच राजकीय नेत्यांना आवडत नाही.ते भडकतात,माध्यमांवर हल्ले करतात.माजलगावचे आमदार, माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांनी आता वेगळाच मार्ग अवलंबिला आहे.सातत्यानं आपल्या विरोधात बातम्या येत असल्याने त्यांनी आपल्या कार्यकर्त्यंाऩी वर्तमानपत्रंच वाचू नयेत असे आदेशच आता आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत.याचा माजलगाव तालुका पत्रकार संघाने निषेध केला आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीनेही या आमदार सोळंकेच्या या वक्तव्याचा प्रखर शब्दात निषेध केला असून हा प्रकार लोकशाहीतल्या चौथ्या स्तंभाचा आवाज घोटण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.माहिती जाणून घेणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे,वर्तमानपत्रांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करून आ.सोळंके सामांन्यांचा हा अधिकारच हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.लोकशाही आणि वृत्तपत्र स्वातंत्र्यावर श्रध्दा असणाऱ्या प्रत्येकाने अशा वक्तव्याचा निषेधच केला पाहिजे.
बीड लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश धस यांच्या प्रचारासाठी माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव,भाटवडगाव आदि ठिकाणी 23 तारखेला   सभा घेण्यात आल्या.या सभांना अत्यल्प प्रतिसाद मिळाला.त्यामुळे अस्वस्थ झालेल्या सोळंके यांनी आपला संताप माध्यमांवर काढला. या सभेत बोलताना प्रकाश सोळंके यांनी कोका-कोला आणि कोलगेटच्या जाहिराती प्रमाणे इलेक्ट्रॉनिक मिडियावाले 24 तास मोदी पुराण लावतात तर वर्तमानपत्रांना गोपीनाथ मुंडे यांच्या फोटोशिवाय काहीच दिसत नाही.हे सारे पाहिल्यानतर डोके काम करेनासे झाले आहे.तेव्हा किमान 17 एप्रिलपर्यत टीव्ही पाहणे आणि वर्तमानपत्रं वाचनं बंद केलं पाहिजे असे आवाहनच सोळंके यांनीआपल्या समर्थकांना केले आहे.

आरटीआयच्या 35 कार्यकर्त्यांवर हल्ले

0

चाकण येथील माहिती अधिकार कार्यकर्ते विलास दत्तात्रय बारवकर यानी आत्महत्या केल्याची बातमी या क्षेत्रात काम करणे किती कठिण झाले आहे याची कल्पना येते.बारवकर यांनी काही संवेदनशील प्रकरणं उघडकीस आणली होती.त्यातून त्यांना त्रास दिला जाऊ लागला आणि अंतिमतः त्यांच्यावर आत्महत्या कऱण्याची वेळ आली.

पत्रकारांची जी अवस्था महाराष्ट्रात आहे तशीच अवस्था माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांची आहे.महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यात 16 पत्रकारांवर हल्ले झाले आहेत .महाराष्ट्रात माहितीचा अधिकार देणारा कायदा 2005 मध्ये मंजूर झाला तेव्हापासून आजपर्यत 35 कार्यकर्त्यांवर हल्ले झाले,त्यांचा छळ केला गेला,त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले गेले किंवा त्यांच्या हत्तया झाल्या आहेत.माहितीचा अधिकार दिला गेला पण या क्षेत्रात काम कऱणाऱ्या सुरक्षा देण्यासाठी काहीच उपाययोजना केली गेली.केंद्राच्या व्हिसल ब्लोअरमध्ये काही तरतुदी केल्या आहेत पण अजून त्याची माहिती अनेक कार्यकर्त्यांना नाही.बारवकर यांच्यावर आत्महत्येची वेळ का आली याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे.

अटलजी एकाकी

0

राजकीय अस्पृश्यतेतून स्वीकारार्ह राजकारणापर्यत भाजपला घेऊन जाणाऱ्या अटलबिहारी वाजपेयी यांची आज चार-दोन नेते सोडले तर भाजपमधील कोनालाही आठवण नाही हे वास्तव टाइम्स ऑफ ंइंडियाने बुधवारच्या अंकात समोर आणले आहे.2009मध्ये पक्षाघाताचा झटका आल्यापासून ते बोलू शकत नाहीत.त्यांच्या हालचाली बंद झाल्या असल्या तरी ते वर्तमानपत्राच्या हेडलाईन वाचतात,मात्र ते कोणाशी संबाद साधू शकत नाहीत.त्यामुळे गेले अऩेक वर्षे अटलजी एकाकी आयुष्य कंठत आहेत.भाजपचे कार्यालय दिल्लीत अशोक मेनन रोडवर आहे तर वाजपेयी कृष्ण मेनन मार्गावरील एका वास्तुत राहातात.हे अंतर जेमतेम पाच मिनिटाचे आहे तरीही भाजपचे नेते अटलजींना भेटण्याची तसदी घेत नाहीत असंही टाइम्सच्या बातमीत नमुद करण्यात आलं आहे.वाजपेयींचे जुने स्नेही एनएमघटाटे,लालकृष्ण अडवाणी आणि उत्तरांखंडचे माजी मुख्यमंत्री बी.सी.खंडुरी सोडले हे अधुनमधून वाजपेयींना भेटण्यासाठी येत असतात.वाजपेयींच्या वाढदिवशी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग न विसरता त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत असतात.हे सारे अपवाद सोडले तर एकेकाळी लाखो भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या या नेत्याचे कोणाला स्मरण नाही ही चिंतावाटावी अशीच स्थिती आहे.निवडणुकीच्या धामधुमीत वाजपेयीचे एकाकी असणे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांच्या मनाला चटका लावणारे आहे.

रायगड लोकसभा: प्रशासन सज्ज

0
रायगड लोकसभा मतदार संघात येत्या 24 एप्रिल रोजी मतदान होत असून प्रशासनाची निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.रायगड लोकसभा मतदार संघात विधानसभेच्या सहा मतदार संघांचा समावेश असून त्यादृष्टीने विविध विभागांची पंधरा पथके तयार करण्यात आली आहेत.आचारसंहिता कक्ष जिल्हा आणि तालुका स्तरावर कार्यान्वित कऱण्यात आला आहे.निवडणूक प्रक्रिेयेसाठी 13 हजार 606 अधिकारी आणि कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे.या कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येणार असून पहिला टप्पा 30म ार्च रोजी दिले जात आहे.रायगड लोकसभा मतदार संघासाठी 2 हजार 106 मतदान केंद्रे निश्चित कऱण्यात आली आहेत.निवडणूक शांततेत पार पडावी,कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठीही विशेष काळजी घेण्यात येत असून संवेदनशील मतदान केंद्रावर विशेष दक्षता घेतली जाणार आहे. मतदार केंद्रावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आरोग्याच्या सुविधा देखील पुरविण्यात येणार आहेत.तसेच सर्व परवानग्या तातडीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी एक खिडकी योजना अलिबाग येथे कार्यान्वित कऱण्यात आली आहे.रायगड लोकसभा मतदार संघात 2009 मध्ये अवघे 56 टक्के मतदान झाले या पार्श्वभूमीवर यावेळेस मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबंर कसली असून त्यासाठीची प्रचार यंत्रणा गतीशील करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी सुमंत भागे यांनी माध्यमांना दिली.मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यंानी केले आहे.

पत्रकार संजय दिनकर यांचे निधन.

0

‘संजय दिनकर’ या नावानेच ते परिचित होते. फिल्मी लिखाण हा त्यांचा आवडीचा प्रांत होता. त्यांची पाच फिल्मी पुस्तकेही प्रसिध्द झाली आहेत. जयवंतराव टिळक यांच्या काळात त्यांनी “केसरी”त पत्रकारिता सुरू केली व आयुष्यभर केसरीवाड्यातच प्रामाणिक सेवा केली. “सांज केसरी” सुरू झाला तेव्हा ते त्याचे संपादक होते.

संजय दिनकर हा जबरदस्त न्यूज सेन्स असलेला माणूस, अतिशय चटपटीत व कॅची हेडिंग द्यायचा. कॉपी एकदम क्रीस्प, चुरचुरीत व आटोपशीर, पाल्हाळाला थारा नाही. लिखाणाच्या हातात थोडे अपंगत्व असले तरी त्यांची लेखणी निरंतर प्रभावी राहिली.

संजय दिनकर ज्येष्ठ पत्रकार म्हणून गेले, पुण्यात सर्वांना परिचित असले तरी फार काही मोठे नाव कमावता नाही आले. अशी चांगली माणसे मोठी का होऊ दिली जात नाहीत, हे  नेहमी सतावणारे कोडे आहे. संजय दिनकर या माणसाला तडजोडी जमल्या नाहीत, लांगुलचालन, हुजरेगिरी कधी जमली नाही; त्यामुळे बदलत्या काळाच्या मानसिकतेत आणि व्यवस्थापनात ते काहीसे मागे पडले. मात्र कसलाही इगो नसलेला,  ज्युनिअरला सांभाळून घेणारा हा शतप्रतिशत निर्मळ, शुध्द, प्रामाणिक आणि चारित्र्यवान माणूस होता.

संजय दिनकर यांना  भावपूर्ण अदरांजली!पत्रकारितेतील एक सच्चा माणूस गेला; माझ्यादृष्टीने एक फार मोठा, इमानदार माणूस गेला!         (बातमी विक्रांत पाटील यांच्या वॉलवरून साभार )

मलेशियन वृत्तपत्रांची अनोखी श्रध्दांजली

0

पध्दतीनं श्रध्दांजली अर्पण केली.आपल्या दैनिकाचे पहिले पान काळे ठेवले गेले.मलेशियातील सर्वात मोठे इंग्रजी वृत्तपत्र असलेल्या द स्टार ने संपूर्ण पहिले पान काळे ठेवत त्यावर मोठ्या अक्षरात एमएच370 आरआयपी असे लिहिले.त्यात मृत व्यक्तींची नावे दिली आहेत.द न्यू स्ट्रेटने पहिल्या पानावर गुडनाईट एमएच370 असे लिहिले. विमान 8 मार्च रोजी बेपत्ता होण्यापूर्वी वैमानिकाने गुडनाईट असा संदेश दिला होता त्याची आठवण करून देण्याच प्रयत्न स्ट्रेटने केलाय.द सन दैनिकाने आपले मास्कहेड काळ्या रंगात ठेवले.मलय आणि चिनी भाषेतील आपली पहिली पाने काळे ठेवत मृतांना श्रध्दांजली अर्पण केली.सोशल नेटवर्किंग आणि फेसबुकवर अनेकांनी आपल्या प्रोफाईल पाने काळे ठेवली.

महिला पत्रकाराशी असभ्य वर्तन

0

पंजाबचे मुख्यमंत्री सुखबीर बादल यांच्या सभेेचे कव्हरेज करणयासाठी गेलेल्या महिला पत्रकार प्रोमिला क ौशल यांच्याबरोबर पोलिसांनी दुर्वव्यबहार केल्याची आमि त्यांना महिलापोलिसांकरवी धक्काबुक्की केल्याची तक्रार कौशल यांनी पोलिस महासंचालकांकडे केली आहे.डीएसपीच्या विरोधात कडक कारवाई करावी असे या महिला पत्रकाराचे म्हणणे आहे.
बादल जेव्हा कपूरथळा येथे सभेसाठी आले तेव्हा त्यांचा बाईट घेण्यापासून कौशल यांना रोखण्यात आले.त्यांच्याशी डीएसपीने असभ्य वर्तन केले आणि असभ्य भाषा वापरली नंतर महिला पोलिसांना बोलावून त्यांना धक्काबुक्की करवविली असा आरोप आहे.

पत्रकार तरूणीवर रेप

0

छत्तीसगढची राजधानी असलेल्या रायपूरमध्ये पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या एका पत्रकार तरूणीवर बलात्काराचे प्रकरण उघडकीस आले आहे.आपल्याबरोबर शिकणाऱ्या एका तरूणावरच संबंधित तरूणीने बलात्काराचा आरोप लावला आङे.लग्न करण्याचे आमिष दाखवत संबंधित तरूण दीड वर्षे आपले शारीरिक शोषन करीत राहिला असा आरोप महिला पत्रकाराने न्यू राजेंद्र नगर पोलिसात दिलेल्या तक्रारीत केला आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केलीय.भूपेंद्र सिंह असे आरोपीचे नाव आहे.मार्च 2013 ते ऑक्टोबर 2013 या काळात अनेकदा आरोपीने तरूणीवर रेप केला.त्यानंतर तो लग्न करण्यास नकार देऊ लागला.त्यानंतर तरूणीने आपली ही कहानी आपल्या नातेवाईकाना सागितली.नंतर आरोपीवर 376,493 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

POPULAR POSTS

error: Content is protected !!