अटलजी एकाकी

    0
    819

    राजकीय अस्पृश्यतेतून स्वीकारार्ह राजकारणापर्यत भाजपला घेऊन जाणाऱ्या अटलबिहारी वाजपेयी यांची आज चार-दोन नेते सोडले तर भाजपमधील कोनालाही आठवण नाही हे वास्तव टाइम्स ऑफ ंइंडियाने बुधवारच्या अंकात समोर आणले आहे.2009मध्ये पक्षाघाताचा झटका आल्यापासून ते बोलू शकत नाहीत.त्यांच्या हालचाली बंद झाल्या असल्या तरी ते वर्तमानपत्राच्या हेडलाईन वाचतात,मात्र ते कोणाशी संबाद साधू शकत नाहीत.त्यामुळे गेले अऩेक वर्षे अटलजी एकाकी आयुष्य कंठत आहेत.भाजपचे कार्यालय दिल्लीत अशोक मेनन रोडवर आहे तर वाजपेयी कृष्ण मेनन मार्गावरील एका वास्तुत राहातात.हे अंतर जेमतेम पाच मिनिटाचे आहे तरीही भाजपचे नेते अटलजींना भेटण्याची तसदी घेत नाहीत असंही टाइम्सच्या बातमीत नमुद करण्यात आलं आहे.वाजपेयींचे जुने स्नेही एनएमघटाटे,लालकृष्ण अडवाणी आणि उत्तरांखंडचे माजी मुख्यमंत्री बी.सी.खंडुरी सोडले हे अधुनमधून वाजपेयींना भेटण्यासाठी येत असतात.वाजपेयींच्या वाढदिवशी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग न विसरता त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत असतात.हे सारे अपवाद सोडले तर एकेकाळी लाखो भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या या नेत्याचे कोणाला स्मरण नाही ही चिंतावाटावी अशीच स्थिती आहे.निवडणुकीच्या धामधुमीत वाजपेयीचे एकाकी असणे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांच्या मनाला चटका लावणारे आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here