रायगड लोकसभा: प्रशासन सज्ज

0
631
रायगड लोकसभा मतदार संघात येत्या 24 एप्रिल रोजी मतदान होत असून प्रशासनाची निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.रायगड लोकसभा मतदार संघात विधानसभेच्या सहा मतदार संघांचा समावेश असून त्यादृष्टीने विविध विभागांची पंधरा पथके तयार करण्यात आली आहेत.आचारसंहिता कक्ष जिल्हा आणि तालुका स्तरावर कार्यान्वित कऱण्यात आला आहे.निवडणूक प्रक्रिेयेसाठी 13 हजार 606 अधिकारी आणि कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे.या कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येणार असून पहिला टप्पा 30म ार्च रोजी दिले जात आहे.रायगड लोकसभा मतदार संघासाठी 2 हजार 106 मतदान केंद्रे निश्चित कऱण्यात आली आहेत.निवडणूक शांततेत पार पडावी,कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठीही विशेष काळजी घेण्यात येत असून संवेदनशील मतदान केंद्रावर विशेष दक्षता घेतली जाणार आहे. मतदार केंद्रावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आरोग्याच्या सुविधा देखील पुरविण्यात येणार आहेत.तसेच सर्व परवानग्या तातडीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी एक खिडकी योजना अलिबाग येथे कार्यान्वित कऱण्यात आली आहे.रायगड लोकसभा मतदार संघात 2009 मध्ये अवघे 56 टक्के मतदान झाले या पार्श्वभूमीवर यावेळेस मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबंर कसली असून त्यासाठीची प्रचार यंत्रणा गतीशील करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी सुमंत भागे यांनी माध्यमांना दिली.मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यंानी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here