अलिबाग- रायगड जिल्हयातील पोलादपूर तालुक्यात गेल्या पाच दिवसात विंचु दंशाच्या पंधरा घटना घडल्याने जनतेने विंचवाचा धसका घेतल्याचे चित्र आहे.क़डक उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी विंचू भातकापणीनंतर वाळण्यासाठी ठेवलेल्या भाऱ्याखाली गारव्याला बसू लागले आहेत.भारे उचलून घेणारे शेतकरी विंचू दंशाचे शिकार ठरत आहेत.त्यामुळे गेल्या पाच दिवसात पंधरा रूग्ण पोलादपूर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल झाले आहेत अशी माहिती रूग्णालयाच्या सूत्रांनी दिली.महाड -पोलादपूर तालुक्यात विषारी विंचवाच्या काही जाती असून अशा विचंवांनी दंश केल्यास अनेकदा प्राणासही मुकावे लागते.त्यामुळे विंचू दंश टाळण्यासाठी जनेतनं काळजी घ्यावी शक्यतो पलंग किंवा खाटेवर झोपावे असे आवाहन जागतीक कीर्तीचे विंचूदंश तज्ज्ञ डॉक्टर हिंमतराव बावसकर यांनी केले आहे.