24 जुलै रोजी ‘बातमीदार’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या

लेखाविषयी संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुखांचा अधिकृत खुलासा

1) संबंधित लेखात ज्या अभ्यासक्रमांचा उल्लेख आहे त्या नावांचे अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आमच्या विभागात चालत नाहीत.
2) विभागातील सर्व नियोजित अभ्यासक्रम यंदाही चालू आहेत.
3) संबंधित लेखाच्या लेखकांना ही वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे व ब्लाॅगवर तसा खुलासा करून चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याची विनंती केली आहे.

डाॅ. उज्ज्वला बर्वे
प्रमुख
संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
24 जुलै 2018

————————————————————————-

दिलगीर आहोत…
‘पत्रकारिता नको रे बाबा’ या मथळ्याखाली आज बातमीदार या आमच्या वेबसाईटवर पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या बाबतीत बातमी प्रसिध्द झाली आहे.वस्तुतः ही बातमी मुंबई विद्यापीठाशी संबंधित आहे.नजरचुकीने त्यात ‘पुणे विद्यापीठ’ असा उल्लेख केला गेला आहे.बातमीतील छायाचित्रही पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन विभागातले वापरले गेले आहे..बातमीदारमध्ये प्रसिध्द होणार्‍या बातम्या खात्री करूनच दिल्या जातात मात्र केवळ नजरचुकीने उल्लेख चुकीचा झाला आहे.त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.हरी नरकेसर आणि काही मित्रांनी ही चूक लक्षात आणून दिली त्यांचेही आभार .
या संदर्भात पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्र विद्या विभाग प्रमुख डॉ.उज्वला बर्वे यांचाही खुलासा आलेला आहे.बातमीत ज्या अभ्यासक्रमाचा उल्लेख आहे ते अभ्यासक्रम पुणे विद्यापीठात नाहीत ,विभागातील नियोजित अभ्यासक्रम यंदाही चालू आहेत असं त्यांनी खुलाश्यात स्पष्ट केलं आहे.झालेल्या चुकीबद्दल क्षमस्वः
बातमीत दुरूस्ती केली आहे.
एस.एम.देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here