तरूणांचा पत्रकारितेकडचा ओढा ओसरला

पुणे ः मिडियातील कमालीची अनिश्‍चितता,रोजगाराच्या कमी होत चाललेल्या संधी,बच्छावत आयोगाची अंमलबजावणी करण्यास मिडिया मालकांची टाळाटाळ,छोट्या आणि जिल्हा वृत्तपत्रांना टाळे लावण्याचे सरकारी धोरण या सर्वांचा परिणाम जर्नालिझमच्या अभ्यासक्रमाकडे तरूणांचा कल कमी होत असल्याचे विदारक चित्र महाराष्ट्रात दिसत आहे.एक काळ असा होता की,जर्नालिझमला प्रवेश मिळावा यासाठी तरूणांना चांगलीच धावपळ करावी लागायची..या अभ्यासक्रमास असलेली मागणी लक्षात घेऊन अनेक विद्यापीठाने जर्नालिझमचा अभ्यासक्रम सुरू केला.मात्र आज स्थिती पूर्णपणे बदलली असून अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास कोणी तयार नसल्याचे चित्र अनेक विद्यापीठात दिसते.

मुंबई विद्यापीठातील संज्ञापऩ आणि पत्रकारिता विभागातर्फे जर्नालिझमचे अनेक अभ्यासक्रम चालविण्यात येतात.या अभ्यासक्रमाचा सर्वत्र दबदबा तर आहेच त्याच बरोबर  मुंबई  विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी घेतलेल्या तरूणांना मिडियात नोकरीच्या संधी देखील अन्य विद्यापीठाच्या तुलनेत जास्त असतात.असं असतानाही मुंबई विद्यापीठातही प्रवेश घ्यायला विद्यार्थी तयार नसल्याचे चित्र दिसू लागले आहे.त्यामुळं मुंबई विद्यापीठाने जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागातले काही अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.विद्यार्थी संख्येअभावी हे पाऊल उचलावे लागल्याचे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले आहे.विद्यापीठाचा हा निर्णय एकूणच मिडिया उद्योगासाठी मोठा फटका असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

मुंबई  विद्यापीठातर्फे जर्नालिझमशी संबंधित विविध अभ्यासक्रम चालविले जातात.त्यात डिप्लोमा,पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा समावेश आहे.मात्र आता विद्यार्थी मिळत नसल्याचं कारण सांगत पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे पाच अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय विद्यापीठानं घेतला आहे.त्यामध्ये मास्टर ऑफ आर्टस् ( कम्युनिकेशन अ‍ॅन्ड जर्नालिझम ),मास्टर ऑफ आर्टस् ( पल्बिक रिलेशन ),मास्टर ऑफ आर्टस् ( इलेक्शन मिडिया ) मास्टर ऑफ आर्टस् ( टेलिव्हिजन स्टडिज ) मास्टर ऑफ आर्टस् ( फिल्म स्टडिज )या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.एक वर्षासाठी हे अभ्यासक्रम बंद कऱण्याचे सांगण्यात येत असले तरी एकदा बंद झालेले हे अभ्यासक्रम पुन्हा सुरू होतील याची खात्री कोणालाच नसल्याने विभागाच्या या निर्णयाला विरोध होऊ लागला आहे.युवा सेनेने या विरोधात विद्यापीठाकडे आता तक्रार केली आहे.

मुंबई  विद्यापीठानं नुकतेच बृहत आराखडयाच्या माध्यमातून कौशल्याभूत अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.असं असताना प्रतिष्ठीत असे पाच अभ्यासक्रम बंद करण्याचा विद्यापीठाचा निर्णय संतापजनक असल्याची प्रतिक्रिया युवासेनेने दिली आहे.हे अभ्यासक्रम पुन्हा सुरू कऱण्यात आले नाहीत तर जोरदार आंदोलन करण्याचा इशारा युवा सेनेने दिला आहे.

—————————————————————————————-

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here