रायगडात सुनील तटकरेंना धक्का

रोहा-माणगाव हा राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला..मात्र चित्रं असंय की..तो आता ढासळतोय..गेल्या वर्षी झालेल्या रोहा नगरपालिकेच्या निवडणुकीत सुनील तटकरे यांचा उमेदवार निसटत्या मतांच्या फरकानं विजयी झाला होता.आज माणगावची नगरपंचायत सुनील तटकरे यांना गमवावी लागली.वास्तवात सुनील तटकरे यांच्या राष्ट्रवादीचे 11 नगरसेवक होते.शिवसेनेचे केवळ 5 आणि कॉग्रेसचा अवघा एक नगरसेवक होता.त्यामुळं नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळणं अपेक्षित होतं.मात्र आज घडलं भलतंच.सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात तीन नगरसेवक फुटले..त्यांनी शिवसेनेच्या उमेदवार योगिता चव्हाण यांना मतदान केलं.कॉग्रेसही शिवसेनेबरोबरच गेली.त्यामुळं शिवसेनेची सदस्य संख्या 9 झाली आणि राष्ट्रवादीच 8 ..त्यात शिवसेना जिंकली.उपनगराध्यक्षपद राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवाराला दिलं गेलं.पक्षाच्या व्हिपची पर्वा न करता राष्ट्रवादीचे नगरसेवक फुटले.आता कोर्ट-कचेर्‍या होतील.त्यातून काय निष्पण्ण व्हायचं ते होईल.आज बाजी मात्र शिवसेनेनं मारली.जिल्हयात याची चर्चा सुरू आहे.सुनील तटकरे रायगडमधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत.त्यांचा सामना शिवसेनेचे अऩंत गीते यांच्याशी आहे.या पार्श्‍वभूमीवर नगरपंचायतीची निवडणूकही महत्वाची ठरते आहे.फोडाफोडीच्या राजकारणात राष्ट्रवादीचा हातखंडा आहे.मात्र आता हे अस्त्र आता त्यांच्यावरच उलटत आहे.हे चांगलं नसलं तरी शिवसेना आता जश्यास तसे उत्तर द्यायच्या प्रयत्नात आहे हेच यातून दिसंलं..–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here