डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने 16 नोव्हेंबर 2014 रोजी घेण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे.16 नोव्हेबर 14 रोजी एकाच दिवशी डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील 21 शहरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली होती.या मोहिमेत प्रतिष्ठानचे सदस्य तसेच विविध शासकीय विभागाच्या 2 लाख 5 हजार स्वयंसेवाकानी भाग घेतला होता.त्यावेळी 5 हजार 454 किलो मिटरचे रस्ते स्वच्छ कऱणयात आले होते.त्यावेळी जमा झालेल्या 3 टन कचर्यांची व्यवस्थित विल्हेवाट लावण्यात आली होती.
आप्पासाहेब धर्माधिकारी यांची राज्यपालांनी राज्याचे स्वच्छता दूत म्हणून निवड केली असून धर्माधिकारी प्रतिष्टानच्यावतीने सातत्यान वृक्षलागवड,वृक्ष संवर्धन,रक्तदान शिबिरं,आऱोग्य शिबिरं,पौढ शिक्षण अभियान आदि उपक्रम राबविले जातात.अलिकडेच त्यांनी रायगड जिल्हयातील विहिरींची स्वच्छता करण्याची मोहिम हाती घेतली आहे.