सोमय्यांचे आरोप प्रसिध्दीसाठी- तटकरे 

0
879
भाजप खासदार किरिट सोमय्या यांनी सिंचन गैरव्यवहाराबाबत केलेले आरोप केवळ प्रसिध्दीसाठी केलेले आहेत असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे.शनिवारी सायंकाळी मुरूड जंजिरा येथे एका कार्यक्रमास तटकरे उपस्थित होते.त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सोमय्या यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते लाचलुचपत प्रतिवंधक विभागाकडे द्यावेत अशी सूचना केली.एसीबीने तीन तास आपली काय चौकशी केली ? या प्रश्‍नावर मौन पाळणार्‍या तटकरे यांनी राज्यातील भाजप-सेना युतीचे सरकार वर्षभरात सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे.-सोमय्यांनी कंपन्यांची नावे जाहीर करावेत असे आव्हानही तटकरे यांनी त्यांना दिले आहे.-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here