माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विविध मागण्यांसाठी मंगळवारी विद्यापीठावर मोर्चा नेला. त्यात शेकडो विद्यार्थी सहभागी झालेले होते.
यावेळी बदललेली ग्रेडिंग सिस्टीम पूर्ववत करावी, पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी नेमावा, निकालाच्या पुनर्तपासणीचे दर कमी करावे, विद्यार्थीसंख्येनुसार वसतिगृहांची संख्या वाढवणे, अभ्यासिकेची व्यवस्था करणे, वायफायसाठी घेतली जाणारी रक्कम त्वरित बंद करावी, वसतिगृहात चांगल्या दर्जाचे जेवण मिळावे, विद्यार्थ्यांना न मिळालेली ई. बी. सी. सवलत पुन्हा सुरु करावी, स्वच्छता गृहांची सुधारणा करावी, विकास कामांच्या नावाखाली अनेक फी घेतली जाते, तिचा विद्यापीठातील सुधारणेसाठी विनियोग करावा, लोणेरे ते विद्यापीठ अशी बससेवा सुरु करावी, सुसज्ज मैदान मिळावे, वर्गांमध्ये प्रोजेक्टर, विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंटची सोय करावी, अशा अनेक मागण्या यावेळी विद्यार्थ्यांनी मांडल्या.
मोर्चाचे नेतृत्व अ. भा. वि. प. चे महाराष्ट्र प्रदेश महामंत्नी प्रमोद कराड यांनी केले.