जिल्हा परिषदेतर्फे कृषी मेळावा

0
1049

अलिबाग : रायगड जिल्हय़ातील शेतकर्‍यांच्या शेतमालाचे योग्य मार्केटिंग करुन त्याला बाजारपेठ मिळवून दिल्यास येथील शेतकर्‍यांमध्ये आर्थिक सुबत्ता येण्यास मदत होणार आहे. त्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत २३, २४ जानेवारीला   पनवेल तालुक्यातील नावडे  येथे जिल्हास्तरीय कृषी मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी सभापती अरविंद म्हात्रे यांनी दिली.
रायगड जिल्हा परिषद, महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा पार पडणार आहे. यामध्ये विविध प्रकारच्या धान्याचे, प्रक्रिया केलेला मालाचे प्रदर्शन व विक्री, विविध पिकावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. शेती आणि शेतीला पूरक असणार्‍या व्यवसायाशी संबंधित १00 स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये महिला बचत गटांचा समावेश असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. मेळाव्याचा शेतकर्‍यांनी लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
मेळाव्याला कृषीरत्न आनंद कोठाडीया, वनश्री व दलित मित्र पुरस्कार विजेत्या संध्या चौगुले, उद्यान पंडित उदय बापट यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमाला खासदार, विधान परिषद, विधान सभा सदस्य, प्रशासकीय सेवेतील प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे कृषी विकास अधिकारी बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. भात क्षेत्रात घट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here