रायगडात सेना स्वबळावर लढणार

0
861

रायगडात सेना स्वबळावर लढणार

केंद्रात आणि राज्यात शिवसेनेची भारतीय जनता पार्टी बरोबर असलेली युती म्हणजे राजकीय समझोता आहे.त्यामुळे राज्यात शंभर टक्के शिवसेना हे स्वप्न पाहण्यात गैर ते काय आहे असा सवाल केंद्रीय अवजड उद्योग अनंत गीते यांनी उपस्थित केला आहे.
अलिबाग येथे काल आयोजित पदाधिकार्‍यांच्या बैठकीत बोलताना गीते यांनी भाजपच्या शतप्रतिशद भाजपाच्या भूमिकेलाच आव्हान दिले.ते म्हणाले,या पुढे रायगडात शिवसेना जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढविणार आहे.राष्ट्रवादी आणि शेकापचे अनेक दिग्गज शिवसेनेच्या संपर्कात असल्याने आगामी काळात शिवसेनेला टक्कर देऊ शकेल असा दुसरा पक्ष जिल्हयात असणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.पक्षातील मतभेद ,कुरबुरी बाजुला ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला.यावेली जिल्हा प्रमुख प्रकाश देसाई,जिल्हा सल्लागार किशोर जैन यांच्यासह अलिबाग,मुरूड तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here