नंदुरबारमध्ये ‘परिषदे’चा आवाज घुमला

0
839
????????????????????????????????????

नीट-नेटके नियोजन,प्रमुख वक्त्यांची झालेली अप्रतिम भाषणं,एस.एम.देशमुख याचं प्रभावी आणि पत्रकारंना नवी उर्जा देणारं भार्गदर्शन , पत्रकारांची गर्दी आणि त्यांच्यातील उत्साह अशा वातावरणात नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित उत्तर महाराष्ट्रातील पत्रकारांचे खुले अधिवेशन रविवारी संपन्न झाले.ठरल्या प्रमाणे ठीक दहा वाजता कार्यक्रम सुरू झाला.एस.एम.देशमुख कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर,अ‍ॅड.राजेंद्र रघुवंशी , खा.हिना गावित आणि आम.चौधरी ,आ.चंद्रकांत रघुवंशी तसेच परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक,सरचिटणीस यशवंत पवार,विभागीय सचिव मिनाताई मुनोत,शरद पाबळे आणि हेमंत डोर्लिकर व्यासपीठावर उपस्थित होते.मेधाताई पाटकर यांनी आपल्या भाषणात ‘देशात कार्यकर्ते आणि पत्रकारांचा आवाज दाबण्याचा कसा प्रयत्न सुरू आहे याची विस्ताराने माहिती तर दिलीच शिवाय पत्रकारांच्या कायद्यासाठीच्या लढ्यात आम्ही प्रसंगी रस्त्यावर उतरू’ असे आश्‍वासनही दिले.खा.गावित यांनी आपल्या भाषणात ‘पत्रकार संरक्षण कायदा,पत्रकार पेन्शनच्या पत्रकारांच्या मागणीस पाठिंबा देत हे सारे मुद्दे आपण लोकसभेत उपस्थित करू असे आश्‍वासन दिले.मात्र पत्रकारांनी टीआरपीच्या मागे न लागता सत्य तेच छापावे ,दाखवावे’ असा सल्लाही दिला.अ्रॅड.रघुवशी यांनी पत्रकारांसाठी असलेल्या कायद्याची माहिती पत्रकारांना करून दिली.’एखादया सत्य बातमीने कुणाची बदनामी होत असेल तर ती ही देखील बदनामीच्या खटल्यास पुरक ठरू शकते’ अशी माहिती त्यांनी दिली.आ.रघुवंशी आ.चौधरी,किरण नाईक यांचीही यावेळी भाषणे झाली.अधिवेशनाचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या कार्याचा आढावा घेत भविष्यातील योजनांची माहिती उपस्थितांना दिली.परिषद सकारात्मक ,रचनात्मक पध्दतीनं पत्रकारांच्या कल्याणासाठी करीत असलेले काम ऐकून अधिवेशनास उपस्थित सहाशेवर पत्रकार मंत्रमुग्ध झाले.राज्यातील तालुका अध्यक्ष ,तालुक्यातील पदाधिकारी तसेच जिल्हा अध्यक्षांचा एक मेळावा नांदेडला 3 जुलै रोजी होत असून या मेळाव्यास मुख्यमंत्र्यांनी यावे यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती देशमुख यानी दिली.परिषदेच्या इतिहासात तालुका अध्यक्षांचा मेळावा प्रथमच होत असल्याचे त्यांनी सांगितले.भविष्यात प्रत्येक तालुका थेट परिषदेला जोडण्याचा प्रयत्न होणार असल्याने मराठी पत्रकार परिषदेने सुरू केलेली पत्रकार कल्याणाची चळवळ अधिक वर्धिष्णू होणार असल्याची माहितीही देशमुख यांनी दिली.पत्रकारांच्या प्रश्‍नांकडे सरकार करीत असलेले दुर्लक्ष आणि राज्यातील पत्रकारांची सुरू असलेली ससेहोलपट याबद्दल देशमुख यांन नाराजी व्यक्त केली.
नंदुरबार सारख्या आदिवासी भागात असे अधिवेशन प्रथमच होत असल्याने पत्रकारांच्यामध्ये अधिवेशनाबद्दल प्रचंड उत्सुकता होती.अधिवेशनासाठी नंदुरबार,धुळे,नाशिक,जळगाव ,नगर येथून पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते.नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेंद्र दोरकर चांगले संघटक असल्याचा प्रत्यय या अधिवेशनाच्या निमित्तानं आला.अधिवेशन यशस्वी व्हावे यासाठी त्यांनी पंधरा दिवसांपासून नियोजन केले होते.सर्वांना बरोबर घेऊन एक देखणे,नंदुरबारच्या पत्रकारितेच्या इतिहासात नोंद घेतली जाईल असे अधिवेशन त्यांनी घेतले.मधल्या काळात नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघाला आलेली मरगळ दूर करीसत राज्याती एक उल्लेखनिय कार्य करणारा पत्रकार संघ म्हणून नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघ समोर येत आहे.योगेंद्र दोरकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी अधिवेशन यशस्वी कऱण्यासाठी घेतेलेल्या परिश्रमाबद्दल धन्यवाद.या अधिवेशऩाच्या निमित्तानं मराठी पत्रकार परिषदेचा आवाज नंदुरबारमध्ये घुमत राहिला.त्यामुळं ‘तापी’च्या ‘काठा’वर बसून टेहळणी करणारे पत्रकार संघाच्या चळवळीतून कायमचे तडीपार झाल्याचे चित्रही येथे दिसले.

यशवंत पवार
सरचिटणीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here