रायगडात जोरदार पाऊस

0
895

रायगड जिल्हयात कालपासून सुरू झालेला जोरदार पाऊस आज सलग दुसऱ्या दिवशीही कोसळत होता.सकाळी सुरू झालेला पाऊस दुपारी थोडा कमी झाला पण नंतर सायंकाळी पावसाने पुन्हा जोर धरला.पावसानं आंबा नदी दुथडी भरून वाहू लागली अाहे.कुंडलिकेलाही पाणी आले आहे.पोलादपूर नजिक एस.टी आणि बस यांच्यात टक्कर झाल्याने या महामागार्वरीच वाहतूक काही तास बंद होती.अलिबाग एसपी आॅफीसजवळ वडाचे झाड कोसळल्याने रस्ता बंद पडला होता.नागावलाही झाड पडल्याने या मागार्वरची वाहतूकही ठप्प झाली होती.आज दुपारी समुद्राला मोठी भरती आली होती.त्यामुळं महाकाय लाटा उसळत होत्या.समुद्र खवळलेला असल्याने समुद्रात न जाण्याच्या सूचना मच्छिमारांना देण्यात आल्या आहेत.बंदरावर लाल बावटा लावण्यात आला आहे.येत्या २४ तासात रायगड जिल्हयात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वतर्विल्यानं जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतकर् झाल्या आहेत.पावसानं नारळी आणि सुपारी बागायतदारांचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.आज सायंकाळपयर्त अलिबागमधील वीज आणि टेलिफोन यंत्रणा ठप्प पडली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here