रायगडला वादळी पावसाचा तडाखा Hi

0
693
 रायगड जिल्हयात आज सलग तिसर्‍या दिवशीही सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्हयात येत्या 24 तासात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिल्यानं समुद्र किनारा,खाडी किनाऱा आणि नदी किनार्‍यांवर राहणार्‍यांना सावधानतेचा इशारा दिला गेला आहे.काल रायगडला जोरदार वादळी पावसाने झोडपून काढले.  रात्री अलिबाग किनार्‍यावरील निवारा शेडवरील कापडे उडून गेले.वादळामुळे समुद्रातील बोटी फरकटल्या तर अलिबाग किनार्‍यावर असलेल्या एका बोटीचे नुकसान झाले.काल जिल्हयात 1 हजार 612 मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे.उरण तालुक्यात चिरनेरला नाल्याचे पाणी अनेक घरात घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे तर महाड तालुक्यात जोरदार पावसाने भातपिकाचे मोठे नुकासान झाल्याचे वृत्त आहे. पंधरा दिवसापासून उघडलेला पाऊस जिल्हयात पुन्हा सक्रीय झाल्याने शेतकरी वर्ग मात्र आनंदात आहे.जिल्हयात नागोठण्यात आंबा,महाडला सावित्री आणि गांधारी,रोह्यात कुंडलिका,पनवेलला गाढी,पाताळगंगा,कर्जतला उल्हास नद्या दुथडी भरून वहात असून रविवारी सकाळीही सर्वत्र जोरदार पाऊस होत असल्याने पूरस्थिती निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आ
उरण तालुक्यातील चिरनेर येथील नाल्याचे पाणी घरात घुसल्यानंतर त्यात विजेचा प्रवाह उतरल्याने त्याचा शॉक लागून रामकृष्ण नारंगीकर आणि बेबी रामकृष्ण नारंगीकर या दाम्पत्याचा अंत झाला.काल दुपारी चिरनेरच्या नाल्याला पूर आल्यानंतर त्याचे पाणी अनेक घरात घुसले.त्यात मोठे नुकसान झाले.सायंकाळी पूर ओसरल्यानंतरही नारंगीकरांचे घर उघडले जात नाही हे दिसल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांचा दरवाजा तोडला असता नारंगीकर पती पत्नी मृत्यूमुखी पडल्याचे आढळून आले.या घटनेमुळे चिरनेर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे– विजेचा शॉक लागून दाम्पत्याच मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here