सांगलीत पत्रकार एकवटले

0
1222

पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती स्थापन

पत्रकारांच्यात एकी असणं ही आज काळाजी गरज : अध्यक्ष विरहित आणि सर्वसमावेशक संघटन असणारी सांगलीची पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती :

पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांवर होणारे हल्ले,पत्रकारांवर दाखल केले जाऊ लागलेले खोटे गुन्हे आणि पत्रकारांच्या प्रश्‍नांकडं सरकार करीत असलेले जाणीवपूर्वक दुर्लक्ष यामुळे राज्यातील पत्रकार आता आपसातील मतभेद,संघटनात्मक वाद,वर्तमानपत्रांचे हेवेदावे हे सारं बाजूला ठेऊन पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या बॅनरखाली एकत्र येत आहेत.सांगलीतील पत्रकारांनी एक होत आपल्यावरील अन्यायाच्या विरोधात आवाज उठविण्याचा निर्णय घेतला असून तेथे पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती स्थापन कऱण्यात आली आहे.

पत्रकारावरील हल्ले वाढतच चाललेत. या आगोदर राजकीय-नेते कार्यकर्ते किंवा गुंड प्रवृत्तीच्या लोका कडून पत्रकारावर हल्ले होत होते. आत्ता तर अधिकार्यांच्या कडून ही पत्रकारावर वेगळ्या प्रकारचे हल्ले सुरु झाले आहेत. मग धमकावणे असो किंव्हा वाईट वागणूक देणे असो, हा सुद्धा शारीरिक हल्ल्या इतकाच गंभीर प्रकार आहे. त्यामुळे सर्व पत्रकारांनी आपसात जरी काही मुद्दे असले तरी ते बाजूला ठेवून, एकत्र येणे गरजेचे आहे. हल्लेखोराना विरोध करण्या साठी पत्रकारांची ऐकी हेच मोठ शस्त्र ठरणार आहे.

जर एकमेका विरोधात लढणारे पक्ष सत्तेसाठी एकत्र येत असतील, जर आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या राजकीय-सामाजिक संघटना वैचारिक विरोध बाजूला ठेवून एकत्र येत असतील, तर मग पत्रकार हे एकत्र का येवु शकत नाहीत ? पत्रकार सुद्धा एकत्र येऊ शकतात हे नवे सांगलीच्या *पत्रकारांच्या ऐकीचे मॉडेल* आपण राज्याला दाखवून देऊ.
जेष्ठांच्या मार्गदर्शना खाली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही कृती समिती अध्यक्ष विना कार्यरथ राहणार. या ठिकाणी सर्वजण नेतृत्व करतील. सर्वांच्या विचारातून काम व्हॉईल. आणि पत्रकारांची सुरक्षा, अडचणी सोडवणे, विविध विषया बाबत मार्गदर्शन पर कार्यक्रम आयोजित करणे आणि पत्रकारांच्या संबंधित असणाऱ्या शासकीय योजनांचा पाठपुरावा करणे या पूर्तीच मर्यादित ही कृती समिती कार्यरथ असावी…..आणि या शिवाय अन्य उपक्रम राबवायचे असतील तर आपल्या अनेक संघटना आहेतच. त्याच्या माध्यमातून आपल्या सर्वांना काम करता येणार आहेच.

संघटनात्मक काम ज्या त्या संघटनेत राहून प्रत्येकाला करता येईल, पण पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, सांगली ही सर्वाना एकत्रित घेऊन काम करत राहावी असा मुख्य उद्देश आहे. आणि पत्रकारांची एकी ही गरजेची आहे. कारण आज एकावर हल्ला झाला, म्हण्टल्यावर उद्या दुसर्यावर हल्ला करायला पण हल्लेखोर मागे पुढे बघणार नाहीत. जर आपण एकत्र असलो की या गोष्टीना आपण एकत्रित विरोध करू शकतो.
आज एक चांगली गोष्ट म्हणजे पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, सांगली यामुळे सर्व एकत्रित येत आहेत. संघटन चांगल्या प्रकारे व्होवू लागलं आहे.
त्यामुळे वादाचे मुद्दे किंव्हा अनावश्यक विषयांची चर्चा करत बसण्या ऐवजी पत्रकार हल्ला कृती समितीचे काम सुरु करू ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here