रायगडमध्ये 22 टक्के मतदान

0
934

रायगड लोकसभा मतदार संघात उन्हाचा पारा 36 अंश डिर्ग्री सेत्सियसवर पोहोचलेला असला तरी मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह चांगलाच दिसतो.अनेक ठिकाणी मतदारांनी मतदानासाठी रांगा लावलेल्या दिसतात. पहिल्या दोन तासात 9 टक्के मतदान झाले होते .नंतरच्या दोन तासात 11 वाजता ते दुप्पटीपेक्षा जास्त म्हणजे 22 टक्के मतदाान झाले आहे.सकाळी गुहागरमध्ये मतदानाचा वेग कमी होता मात्र नंतरच्या काळात तो वाढल्याचं दिसतंय.गुहागर विधानसभा मतदार संघात 18.90 टक्के मतदान झालंय.महाड विधानसभा मतदार संघात सर्वाधिक 28.04 टक्के मतदान झालंय.
मतदानाचा हाच वेग कायम राहिला तर यावेळेस गत वेळपेक्षा जास्त मतदान होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. महाडमध्ये काही मतदारांनी आपली नावं मतदार यादीत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत.सर्वत्र मतदान शाततेत सुरू आहे.अतिसंवेदनशील अशा 19 मतदान केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here