बातम्यांवर बहिष्कार मान्य नाही

0
777

पत्रकारांचा असभ्य शब्दात अवमान करणाऱ्या राज ठाकरे याच्या बातम्यावर बहिष्कार टाकावा असा प्रश्न आम्ही बातमीदार पोलच्या माध्यमातून विचारला होता.आजपर्यत 69 वाचकांनी प्रतिक्रिया दिल्या आङेत.त्यातील 39 वाचकांनी असा बहिष्कार टाकणं चुकीचं असल्याचं म्हटलंय तर 30 वाचकांनी बहिष्कार टाकून राज ठाकरे यांना आव्हान द्यावे असे सुचविले आहे.हा कौल प्रातिनिधीक असला तरी बहुसंख्य वाचकांना बहिष्कार टाकणं मान्य नाही हेच यातून दिसून आलंय.

मित्रांनो,राज्यात पत्रकारांवरील हल्ले,पत्रकारांशी असभ्यपणे वागणे अशा घटनांमध्ये चिंतावाटावी एवढी वाढ झाली आहे.या सर्वाला प्रतिबंध करण्यासाठी पत्रकाराच्या हाती कोणतंच हत्यार नाही.पत्रकारांवर हल्ले कऱणाऱ्यांवर किंवा पत्रकाराशी असभ्य वर्तन करणाऱ्यांवर बहिष्कर टाकणे हाच एकमेव मार्ग उरतो.तो ही पन्नास टक्के जनतेला मान्य नाही.अशा स्थितीत पत्रकारांनी काय करायचं फक्त मार घातच बसायचं,की अपमानित व्हायचं.जगाची दुःख,जगाचे प्रश्न आपले समजून ते वेशिवर टांगणाऱ्या पत्रकारांना जेव्हा समाजाची गरज असते तेव्हा तो देखील त्याच्याबरोबर ऩसतो हे पत्रकारितेचं आजचं वास्तव आहे.काही पत्रकार चुकीच्या पध्दतीनं वागतही असतील ,त्याचं समर्थन कोणी कऱणार नाही पण मुठभर लोकांच्या चुकांचं खापर संपूर्ण पत्रकारांवर फोडणं आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकारांनाही नैराश्य येईल अशी भूमिका घेणं दुःख दायक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here