रायगडमध्ये आज 17 हजार 366 बाप्पांना दिला जाणार निरोप 

0
735
 
दहा दिवसांच्या मुक्कामानंतर आज रायगड जिल्हयात मोठ्या भक्तीःभावाने आपल्या लाडक्या गणरायांना निरोप देण्यात येत आहे.आज जिल्हयात 17 हजार 366 घरगुती आणि 148 सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे,पाच सप्टेंबर रोजी जिल्हयात 99 हजार 762 घरगुती आणि 276 सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना केली गेली होती.त्यातील दीड दिवसानंतर 24 हजार 272, गौरी विसर्जनाच्या दिवशी 56 हजार 741 ,उर्वरित दिवसांत 1 हजार 285 गणपतींचे विसर्जन करण्यात आले होते.आज अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं प्रशासनानं गणेश विसर्जनाच्या निमित्तानं चोख व्यवस्था केली असून बहुतेक ठिकाणी समुद्रावर जीवरक्षाकाच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.अलिबागेत गणपतीच्या विसर्जन मिरवणुका निघण्यास सुरूवात झाली आहे.समुद्र किनार्‍यावर अलिबाग नगरपालिकेने गणेश विसर्जनासाठी स्वतंत्र हौद तयार केला आहे तसेच निर्मालय जमा करण्याचीही व्यवस्था केली आहे.जिल्हयात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here