पनवेल महापालिकेवरून राजकारण पुन्हा रंगले

0
642

1 ऑक्टोबरपासून अस्तित्वात येत असलेल्या पनवेल महानगरपालिकेला शेतकरी कामगार पक्षाने विरोध दर्शविला असल्याने नियोजित महापालिकेला जिल्हा परिषदेचे ना हरकत प्रमाणपत्र मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.जिल्हा परिषदेची काल झालेली सर्वसाधारण सभा याच मुद्यावरून गाजली.जिल्हा परिषदेत शेकाप आणि राष्ट्रवादीची सत्ता असून शेकापच्या भूमिकेला मित्रपक्ष राष्ट्रवादीनेही पाठिंबा दर्शविल्याने पेच निर्माण झाला आहे.भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नानं पनवेल महापालिका होत असली तरी कालच्या बैठकीत शिवसेनेने तटस्थतेची भूमिका स्वीकारल्याने भाजप या मुद्यावर एकाकी पडल्याचे चित्र दिसले.महापालिका अस्तित्वात येण्यासाठी सरकारने जिल्हा परिषदेच्या ठरावासही महत्व द्यावे आणि यासाठी प्रशासनाने सरकारकडे पाठपुरावा करावा असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी दिले आहेत.पनवेल परिसरातीत जी गावे महापालिकेत समाविष्ठ होत आहेत त्या गावांत शेकापचा प्रभाव आहे.मात्र ही गावे जिल्हा परिषदेतून वगळली जात असल्याने शेकापला जिल्हा परिषदेच्या काही जागांवर पाणी सोडावे लागणार असल्याने शेकापचा महापालिकेला विरोध असल्याचा आरोप भाजपच्या गोटातून केला जात आहे.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here