रायगडच्या किनार्‍यांवर जेलिफीशची दहशत 

0
666

रायगडच्या किनार्‍यांवर जेलिफीशची दहशत 

रायगड जिल्हयातील अनेक समुद्र किनारे तव्दतच खाड्यांमध्ये जेली फिशचा कधी नव्हे एवढया प्रमाणात वावर सुरू झाल्यानं स्थानिक मच्छिमार आणि पर्यटकही दहशतीखाली आहेत.चार दिवसांपुर्वीच अलिबागच्या किनार्‍यांवर जेली फिशचा  स्पर्श झाल्याने  पाच पर्यटकांवर रूग्णालयात भरती होण्याची वेळ आली होती.जेली फिशच्या दहशतीमुळं आता मच्छिमारी कऱणं देखील अवघड होत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक मच्छिमार व्यक्त करीत आहेत.

समुद्रात हेलकावे घेणार्‍या छत्रीच्या आकाराचे हे जेलीफीश आकर्षक दिसत असले तरी त्यातील काही प्रजाती विषारी असल्यानं त्या आपल्याला जखमी करू शकतात.पावसाळ्याआधी ब्ल्यु-बटन,पावसाळ्यात ब्ल्यु बॉटल,आणि पाऊस ओसरल्यावर बॉक्स जेलीफीस किनार्‍यांवर पोहोचतात.मोठ्या जेलीफिशचे शरीर 10 इंच आकाराचे असते तर पाय दोरीसारखे 2 फूट लांबीचे असतात.जेलिफीशचा स्पर्श झाल्यास त्याठिकाणी लाला रंगाचे व्रण उठतात,तसेच त्या व्यक्तीला असह्य वेदना होतात.मासेमारीसाठी टाकलेल्या जाळ्यात  अडकेले जेलीफिश काढून टाकताना त्याचा स्पर्श मच्छिमार आणि कामगारांना होत असल्याने अंगाला खाज सुटते आणि शरिराला इजा होते, त्यामुळं जेलीफिश जेथे दिसतात तेथे मच्छिमारी कऱण्याचे टाळले जात आहे.याचा मच्छिमारी व्यवसायावर मोठा परिणाम होत असल्याचे मच्छिमारांचे म्हणणं आहे.किनार्‍यावर येणार्‍या जेलीफिशचा फटका पर्यटकांनाही बसत असल्याने पर्यटकांनी पाण्यात उतरू नये असे आवाहन केले जात आहे.

शोभना देशमुख अलिबाग -रायगड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here