पुन्हा एकदा शेखाडी आणि बेफिकीरी

0
978
शेखाडी हे नाव उच्चारलं तरी आजही उरात धडकी भरते.रायगड जिल्हयातील या निर्जन किनार्‍यावर 1993 मध्ये टायगर मेमन आणि त्याच्या साथीदारांनी स्फोटकं उतरविली आणि त्यातून 1993 मध्ये मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणले.हे शेखाडी आज पुन्हा एकदा चर्चेत आलंय ते तेथे सापडलेल्या ज्वालाग्राही तेलानं भरलेल्या पिंपामुळं.शेखाडी आणि बोर्ली तसेच काशिदच्या समुद्रात ज्वालाग्राही तेलानं भरलेली तब्बल 21 पिप सापडल्यानं यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत.प्रत्येक पिंपामध्ये 200 लिटर ज्वालाग्राही तेल आढळले असल्यानं विषयाचं गांभीर्य वेगळं सागावं लागत नाही. .हे पिंप कोठून आली?त्यामागं काही घातपाताचा हेतू होता काय? हे स्पष्ट झालं नसलं तरी एक थेरी अशी मांडली जात आहे की,काही दिवसांपुर्वी अरबी समुद्रात एक जहाज बुडाले होते त्यातील हे पिंप असावेत.अर्थात चौकशीतून वास्तव समोर येईलच.या तेलाचे नमुने कलिना येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आल्यानं त्याची दाहकता किती आहे हे समोर  येईल.
मुद्दा पिंपापुरता मर्यादित नाहीत.मुद्दा आहे तो किनार्‍याच्या सुरक्षेबाबतचा.1993 ला बॉम्बस्फोट झाल्यानंतर किनार्‍याची सुरक्षा व्यवस्था वाढविण्याच्या वल्गना केल्या.प्रत्यक्षात तसं काहीही झालेलं नाही.26/11 नंतर काही उपाययोजना जरूर  केल्या गेल्या पण त्या किती जुजबी आणि ढिसाळ आहेत हे वारंवार घडत असलेल्या घटनांमुळं समोर येत आहे. 26/11नंतर 2010 मध्ये करोडो रूपये खर्च करू न वशिष्ठी,गोदावरी,1,2,कुलाबा,खांदेरी,उंदेरी,आणि रायगड,1,2,3,4 अशा 11 गस्ती नौका खरेदी करण्यात आल्या.उरण ते सावित्री नदीच्या टापूत गस्त  घालण्याची जबाबदारी या नौकांवर आहे.मात्र यातील बहुतेक गस्ती नौका बाराही महिने बंदच असतात.यातील काही आधुनिक गस्ती नौका दुरूस्तीसाठी गाव्याला घेऊन जाव्या लागतात.या नौकासाठी लागणारा दुरूस्ती,इंधनाचा खर्च कोठून करायचा?  हा रायगड पोलिसांसमोरचा प्रश्‍न आहे.मान्सुन काळात तर या नौका किनार्‍याला नांगरून ठेवल्या जात  असल्यानं त्या आणीबाणीच्या प्रसंगी निरूपयोगीच ठरतात. समुद्रात काही तरी वस्तू तरंगताना दिसत आहेत हे वास्तव जेव्हा नाविक दलाच्या नजरेस आलं तेव्हा त्यांनी रायगड पोलिसांना अ‍ॅलर्ट केलं.पण पोलिसांच्या ताफ्यातील नौका कामाच्या नसल्यानं या पिंपार्यत जायचं कसं आणि ते पिंप बाहेर आणायचे कसे हा पोलिसांसमोरचा प्रश्‍न होता.स्थानिक मच्छिमारांच्या मदतीनं नंतर हे ऑपरेशनं पूणी केलं गेलं.मात्र प्रश्‍नाबद्दलची बेफिकीरी पुन्हा समोर आली .जिल्हयात चार सागरी पोलिस ठाण्याची निर्मिती केली गेली आहे.कल्पना अशी होती की,ही ठाणी डोळ्यात तेल घालून समुद्रातील हालचालींवर नजर ठेवतील. त्यांनी समुद्रात दररोज गस्त घालावी अशीही अपेक्षा होती.त्यासाठी प्रत्येक नौकेवर ताडेल,खलाशी,आणि दोन शस्त्रधारी पोलिसांची नेमणूक करण्यात आली होती पण ही सारी यंत्रणा आज उपयोगाची आहे असं ठामपणे म्हणता येत नाही.एखादी घटना घडली की,हायअ‍ॅलर्ट द्यायचा,तात्पुरती धावपळ करायची,विषय शिळा झाला की,ये रे माझ्या मागल्या हा शिरस्ता झाला आहे.पिंप सापडल्याच्या घटनेनंतर जिल्हयात हायअ्रलर्ट दिला गेला आहे.खरं तर  एखादी घटना घडल्यानंतरच नव्हे तर बारमाही हायअ‍ॅलर्टची गरज असते,एवढा हा किनारा संवेदनशील आहे. 1993चीच घटना नव्हे तर देशविरोधी शक्तींनी देशविघातक कारवायांसाठी कोकण किनारपट्टीचा वापर सातत्यानं केल्याचं समोर आलेलं आहे.(किनार्‍यावरचे मॅग्रोज उद्दवस्त करणारे तेलाचे तवंग हा किनार्‍यावरचा कायमचा चिंतेचा विषय राहिलेला आहे.गेल्या दहा वर्षात तेलाचे तवंग किनार्‍याला लागून किनार्‍यावरील मॅग्रोजची हानी झाल्याचा पर्यावऱणाचा खेळखंडोबा झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत.हे तेलाचे तवंग येतात कोठून,? याचा शोध घेणारी सक्षम यंत्रमाही नसल्यानं दोन दिवस बातम्या येतात आणि मग सारेच थंड पडतात.समुद्रात विषारी तवंग सोडून किनार्‍यावरील मॅग्रोज उध्दवस्त करणारे षडंयंत्र रचले जात आहे काय? याचा शोध घेण्याचीही गरज आहे पण त्यासाठीही कोणतीच व्यवस्था नाही.मागच्या आठवड्यातच अलिबागच्या किनार्‍यावर तेलाचे तवंग आले होते.ही बाब अलिबागच्या पत्रकारांनी जिल्हाधिकारी शीलत उगले यांच्याही नजरेस आणून दिली होती.मात्र त्याचं पुढं काहीच झालं नाही अथवा तेल कोढून आले हे ही समोर आलं नाही.आता आठ दिवसांपुर्वीचे तवंग आणि दोन दिवसांपुर्वी सापडलेले पिंप यांचा काही संबंध आहे काय या अंगानं तपास सुरू आहे.म्हणजे नरड्याला आल्याशिवाय गंभीरपणे बघायचं नाही हे नेहमीच चित्र आहे.)तरीही जी काळजी घेणं अपेक्षित असतं ती घेतली जात नाही.शत्रूंनाही किनारा सुरक्षेतले कच्चा दुवे नक्की माहिती असल्यानं ते ही याचा उपयोग करीत असतात.त्यामुळं कायम स्वरूपी यंत्रणा उभी कऱणं,पुरेसा निधी उपलब्ध करून देणं,यंत्रणा सुसज्ज असणं आणि पोलिस,तटरक्षक दल,नाविक दल,सागरी किनारा दल या विविध यंत्रणात समन्वय असणं हे आवश्यक झालेलं आहे.रायगड किनार्‍याकडून बाहेर येणार्‍या रस्त्यावर जिल्हयात 11 ठिकाणी तपासणी नाके उभे करण्यात आले आहेत.हे नाके रेती वाहतुकीसाठी वसुली नाके बनलेले आहेत.शिवाय या नाक्यांवरही एक सुस्तपणा आणि निष्काळजीपणा दिसतो आहे ही नाकी देखील सक्षम करावी लागतील आणि गुप्तचर यंत्रणाही अधिक परिणाकारक बनवाव्या लागतील.हे सारं घडलं नाही तर किनार्‍यावर कधीही काहीही घडू शकते हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.
.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here