रायगडची मतमोजणी नेहुलीला

0
810

रायगड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी जिल्हा क्रिडा संकुल नेहुली येथे येत्या 16 मे रोजी होत असून या मतमोजणी प्रक्रीयेकरिता प्रत्येक उमेदवारांस 87 मतमोजणी प्रतिनिधी नेमता येणारअसून नमुना 18 मध्ये अर्ज तात्काळ करावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुमंत भांगे यांनी येथे बोलतांना केली.

32- रायगड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी येत्या 16 मे रोजी होत असून या मतमोजणी प्रक्रियेसंदर्भात सर्व उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहातनिवडणूक निर्णय अधिकारी सुमंत भांगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रविण शिंदे, उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे, निवासी उपजिल्हाधिकारीसतिश बागल, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, उपजिल्हानिवडणूक अधिकारी विश्वनाथ वेटकोळी यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी आणि उमेदवार तसेच त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

रायगड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी विधानसभा मतदारसंघनिहाय म्हणजे 191 पेण, 192-अलिबाग, 193-श्रीवर्धन, 194-महाड, 263 दापोली, 264 गुहागर निहाय करण्यात येणार असून प्रत्येकविधानसभा मतदारसंघात 14 टेबल ठेवण्यात येणार आहेत. उमेदवारांना मतमोजणीसाठी प्रती टेबल 1 याप्रमाणे 6 विधानसभा मतदारसंघाकरीता 84 मतमोजणी प्रतिनिधी व निवडणूक निर्णय अधिकारी यांचे टेबलजवळ टपाली मतमोजणीकरीता 3 असे एकूण 87 मतमोजणी प्रतिनिधीं नेमणूक करण्याकरीता नुमना 18 मध्ये अर्ज करणे आवश्यक  आहे. नमुना 18 मधील अर्ज व नेमावयाच्या मतमोजणी प्रतिनिधिचे दोन फोटो प्राप्तझाल्यानंतर त्यांना ओळखपत्र देऊन नेमणूक करण्यात येईल. नेमणूक करताना मतदारसंघ निहाय व टेबल क्रमांकासह नेमणूक करण्यांत यावी. नमुना 18 मधील अर्ज दोन प्रतीत भरुन देण्यांत यावा, असेही निवडणूकनिर्णय अधिकारी सुमंत भांगे यांनी यावेळी बोलतांना स्पष्ट केले.

जिल्हा क्रिडा संकुल, नेहुली येथील सुरक्षा कक्षात ठेवण्यात आलेल्या सिलबंद EVM दिनांक 16 मे 2014 रोजी सकाळी 7.30 वाजता मतमोजणीसाठी सुरक्षा कक्ष उघडून काढण्यात येणार आहेत. सुरक्षा कक्षउघडण्यापूर्वी सिलबंद असल्याबाबत निवडणूक उमेदवप्रतिनिधीच्या उपस्थित खात्री करुन सुरक्षा कक्ष उघडण्यात येईल. मतमोजणीच्या सुरुवातीला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्राप्त झालेल्या टपालीमतपत्रिकांची मतमोजणी प्रथम करण्यात येणार आहे. ही मतमोजणीसाठी 3 टेबल लावण्यांत येणार असून यासाठी 3 मतमोजणी प्रतिनिधी टपाली मतमोजणीसाठी नेमणूक करावयाचे आहेत. प्राप्त झालेल्या टपालीमतपत्रिका जिल्हा कोषागार कार्यालयाच्या सुरक्षा कक्षातून दिनांक 16 मे रोजी सकाळी 6.30 वाजता जिल्हा क्रिडा संकुल नेहुली येथे मतमोजणी कक्षामध्ये मतमोजणी करीता वाहतूक करुन आणण्यात येणार आहेत.यावेळीही निवडणूक उमेदवार/ प्रतिनिधींनी उपस्थित रहावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. भांगे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here