पर्यटन व्यवसायाला फटका

0
692

मिनिट्रेन बंद असल्याने माथेरानला येणार्‍या पर्यटकांमध्ये लक्षणिय घट झाल्याचे समोर आल्याने माथेरान मिनिट्रेन तात्काळ सुरू करावी अशी मागणी पुन्हा होऊ लागली आहे.1 मे आणि 8 मे रोजी माथेरानच्या ट्रेनला अपघात झाल्यानंतर ही ट्रेन बंद केली गेली .त्यानंतर विविध शिष्टमंडळांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतल्यानंतर अमन लॉज ते माथेरान या शटलसेवा मार्गावर दोन चाचण्या घेतल्या गेल्या.त्या यशस्वी झाल्याने मिनिट्रेनची शिळ पुन्हा ऐकायला येणार अशी आशा निर्माण झाली मात्र एक महिना झाला तरी शतक महोत्सव साजरा केलेली मिनिट्रेन सुरू झालेली नाही.मे मध्ये माथेरानमध्ये पर्यटनाचा हंगाम असतो.मात्र ट्रेन बंद झाल्याचा मोठा फटका माथेरानच्या पर्यटन व्यवसायाला बसला असल्याचे माजी नगराध्यक्ष अजय सावंत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here