रायगड पुण्याला जाडोणार

0
765

पुणे-कोलाड रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण

कोकणातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळावा यासाठी कोकण रेल्वे मार्गाने पश्‍चिम महाराष्ट्राशी जोडण्याचा प्रयत्न होत असून त्याचाच एक भाग म्हणून पुणे -कोलाड या नव्या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिले आहेत.या रेल्वे मार्गामुळे रायगड जिल्हा पुण्याशी जोडला जाणार असून पुणे-रायगड अंतर कमी होणार आहे.वैभववाडी -कोल्हापूर आणि चिपळूण कराड या मार्गाला या पुर्वीच रेल्वेने हिरवा कंदिल दाखविला असून रेल्वे अर्थसंकल्पात वैभववाडी -कोल्हापूर मार्गासाठी आर्थिक तरतूद देखील करण्यात आलेली आहे.
पुण्याहून कोकणात जाण्यासाठी आकुर्डी,हिंजवडी,पौड , मुळशी मार्गे हा नवा रेल्वे मार्ग प्रस्तावित असल्याचे रायगडचे खासदार श्रीरंग बारणे यांनीही स्पष्ट केले आहे.या प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतुकीचा ताण काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार असल्याने या नव्या मार्गाबद्दल कोकणवासियांच्या अपेक्षा पल्लवित झालेल्या आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here