गेली दीड वर्षे विश्रांती घेत पडलेली माथेरानची मिनिट्रेन परत टॅ्रकवर आलेली असल्याचा आनंद माथेरानकर घेत असतानाच माथेरानकरांना आता आणखी एक सुखद धक्का मिळाला आहे.गेली वीस वर्षे ज्या रोप-वे प्रकल्पाची माथेरानकरांना प्रतिक्षा होती तो रोप-वे प्रकल्प आणि दृष्टीपथात असून लवकरच या प्रकल्पाचे काम सुरू होईल अशी शक्यता आहे.भिवपुरी-डिकसळ ते माधवजी पाँईट या दरम्यान हा रोप-पे होणार असून टाटा समुहाकडून हे काम होणार आहे.मुंबई महानगर विकास प्राधिकरण हे टाटाला तांत्रिक सहकार्य करणार आहे.200 कोटी रूपयांचा हा प्रकल्प 3300 मिटर लांब आणि 850 मीटर उंचीचा असणार आहे.पर्यावरणवाद्याच्या कचाटयात सापडलेल्या या प्रकल्पाला शासनाने हिरवा कंदील दाखविला असून काल माधवजी पाँईट येथील मातीची चाचणी घेण्यात आली.ही माती बांधकामास योग्य आहे की,नाही ते पाहिले जात आहे.हा प्रकल्प पूर्ण झाल्यास माथेरानच्या पर्यटन व्यवसाय अधिक भरभराटीला येणार आहे.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here