माझ्या गावचं दैनिक – झुंजार नेता

0
1485

[three_fourth_last]

बीड जिल्हयातून आज अनेक वृत्तपत्रे प्रसिध्द होत असली तरी बीड जिल्हयात वृत्तपत्रसृष्ठीचा खऱ्या अर्थानं पाया घातला तो झुंंजार नेता आणि चंपावतीपत्र या दोन दैनिकांनी.साधनं नव्हती,वार्ताहरांचं जाळं नव्हतं,आजच्या सारखे इंटरनेट,व्हॉटसऍप नव्हते,इ-मेल नव्हते.पोस्ट आणि फारच महत्वाची बातमी असेल तर ट्रंककॉलनं बातम्या यायच्या. रेडिओवरील संध्याकाळच्या सातच्या बातम्या ऐकून उपसंपादक हेहलाईन करायचे.माणसंही मर्यादित असायची.दिवसभर शहर वार्ताहर म्हणून काम करणारा सातनंतर उपसंपादक व्हायचा आणि अंकाचं नियोजन करायचा.खिळ्यांनी पानं लावली जात असल्यानं ले-आऊटलाही फारच मर्यादा असायच्या.अशा वातावरणात झुंजारनेता असेल किंवा चंपावतीपत्रचा कारभार चालायचा.बीड जिल्हयात अगोदरच लिहिता-वाचता येणाऱांची संख्या त्याकाळात फारच कमी,त्यातच गावपातळीवर पेपर पाठविण्याची कोणतीच व्यवस्था नसल्यानं पेपर फक्त शहरात मिळायचे.परिणामतः अंक विर्कीला देखील मर्यादा असायच्या.जाहिरातीच्या बाबतीतही आनंदी आनंद असायचा.अशा साऱ्या अडचणीवर मात करीत मोतीराम वरपे यांनी निष्ठेनं झुंजार नेता चालविला.आज झुजार नेताचा पसारा मोठ्या प्रमाणात वाढला असला तरी त्यासाठी मोतीरामजींनी घेतलेले कष्ठ विसरता येणार नाहीत.तो काळ असा होता की,वसा किंवा व्रत समजूनच पत्रकारिता केली जायची. पेपर सुरू करू त्यातून पैसा मिळवू,किंवा आपल्या अन्य उद्यागोांना संरक्षण देण्यासाठी त्याचा हत्यारासारखा वापर करू किंवा दैनिकाच्या माध्यमातून राजकीय लाभ पदरात पाडून घेऊ असा विचार तेव्हा कोणी करायचं नाही.जनतेची सुख-दुःख वेशिवर टांगणं,व्यवस्थेवर अंकुश ठेवणं ,आणि अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेऊनच वृत्तपत्रं सुरू केलंी जायचंी.मला वाटतं मोतीराम वरपे यांनीही झुंजार नेता याच जाणिवेतून सुरू केला होता.वरपेंकडं पत्रकारितेचा कोणताही वारसा नव्हता,वृत्रपत्र काढण्याएवढं भांडवलही नव्हतं.आर्थिक परिस्थिती बेताचीच असतानाही त्यांनी झुंजार नेता सुरू कऱण्याचं धाडस केलं ते त्यांच्या पत्रकारितेवरील निष्ठेपोटीच . आरंभीच्या काळात असे अनेक प्रसंग आले की,झुंजार ने बंद पडतो की,काय अशी शक्यता निर्माण झाली होती. – त थापि येणाऱ्या अनेक अडचमणीवर मात करीत वरपे यांनी झुंजार नेताला पोटच्या पोरासारखं जपलं,त्याचं पालनपोषण केलं आणि वाढविलं.हे करतानाच त्यांनी बीडमध्ये पत्रकारांचीे नवी पिढी घडविण्याचे मोठं काम केलं .बीडमध्ये नंतरच्या काळात ज्या पत्रकारांनी आपल्या लेखणीनं अनेकांना कापरं भरवलं असे जिल्हयातील अनेक मान्यवर पत्रकारही झुंजार नेताच्या मुशित तयार झाले आहेत.जिल्हयातील साहित्यिकांना बळ देण्याचं,त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं कामही झुजार नेतानं केलं आहे. जिल्हयातील सास्कृतिक चळवळीनाही झुजंार नेताची मदत व्हायची.एवढंच नव्हे तर त्याकाळात जिल्हयात जनहिताच्या ज्या चळवळी चालायच्या किंवा जी लोकआंदोलनं व्हायची त्यांचा आधारही झुंजार नेताच असायचा.रोखठोख,स्पष्ट आणि निःपक्ष भूमिका हे झुंजार नेताचं वैशिष्टय होतं. – बाणा लढाऊ आणि कोणाचीही भिडमुर्वत न ठेवणारा असल्यानं सामांन्य माणसालाही झुंजार नेता आपला आधार वाटायचा.त्यातूनच दहशत नव्हे तर झुंजार नेताचा एक आदरयुक्त दरारा सर्वत्र दिसायचा.पेपरम्हणजेच झुंजार नेता अशी लोकप्रियता झुंजार नेतानं मिळविली होती.ती टिकवून ठेवण्याचं काम आज रत्नाकर वरपे आणि त्यांच्या अन्य कुटुंबियांनी केलं आहे हे विशेष.त्यासाठी त्यांनी कालानुरूप झुंजारनेतात बदल केले गेले.रंगीत मशिन आली आणि छपाई चार रंगात सुरू झाली.पानंही वाढली,पुरवण्या प्रसिध्द होऊ लागल्या. कार्यालय सुसज्ज इमारतीत गेलं,मॅनेजमेंटही आधुनिक पध्दतीनं सुरू झालं.त्यामुळं बाहेरून येणाऱ्या वृत्तपत्रांचा मारा होत असतानाही झुंजार नेता आपलं स्थान केवळ टिकवूनच आहे असं नव्हे तर झुंजारनेतानं आपला नावलौकिक जिल्हा आणि शेजारच्या जिल्हयातही वाढविला आहे.हे यश लोक प्रियतेच्या पातळीवर जसं आहे तव्दतच ते व्यावसायिकतेच्या आघाडीवरचंही आहे.भांडवलदारी वृत्तपत्रे आल्यानंतर जिल्हा स्तरावरील दैनिकाचं काय होणार असा प्रश्न विचारला जायचा.ज्या दैनिकानंी स्वतःमध्ये कालानुरूप बदल घडवून आणले ती दैनिकं स्पर्धेतही आपलं अस्तित्व कायम ठेऊन राहिली.झुंजार नेता हे त्याचं मुर्तीमंत उदाहरण आहे.ज्यांना बदल घडवून आणता आला नाही ती भांडवलदारी व्यवस्थेचा बळी ठरली. अशा बंद पडलेल्या दैनिकांची संख्याही लक्षणीय आहे. अनेक अडथळ्यांवर मात करीत झुजार नेता उद्या दिवाळीच्या पाडव्याला 47 व्या वर्षात प्रवेश करीत आहे.त्यानिमित्त झुंजार नेता परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा.
झुंजार नेताशी माझं व्यक्तिगत जिव्हाळ्याचं नातं आहे.मी नंतरच्या काळात पत्रकारितेत जे थोडं फार काम करू शकलो त्याची मुहूर्तमेढ झुंजार नेतातच रोवली गेली होती. माजलगावला कॉलेजला शिकत असतानापासून मी झुंजार नेताला बातम्या पाठवायचो. झुंजार नेतात त्या प्रसिध्दव व्हायच्या .माझे लेखही प्रसिध्द व्हायचे.यातून पत्रकारितेबदद्लची आवड आणि गोडी वाढत गेली. नंतर मी औरंगाबादला जाऊन बीजे वगैरे केले,वेगवेगळ्या भागात,दैनिकात कामं केली ं पण माझ्या पत्रकारितेचा पाया झुंजार नेतातूनच घातला गेला हे माझ्या कायम स्मरणात आहे.त्यामुळं असेल कदाचित पण माझ्या मातीतलं हे दैनिक आज पन्नाशीकडं जातानां बघून नक्तीच आनंद होत आहे.झुंजार नेताची अशीच भरभराट व्हावी एवढीच या निमित्तानं मनोकामना  ( SM

या लेखाची कॉपी आपणास www.smdeshmukh>blogspot.in  येथून करता येईल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here