वृत्तपत्र मालकांना नाकारलं

0
1047

ाध्यमांतील लोकांना मतदार स्वीकारत नाहीत हे वारंवार सिध्द झालं आहे.महाराष्ट्र आणि हरियाणात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माध्यमांच्या मालकांना मतदारांनी स्वीकारलं नाही.हरियाणा जनचेतना पार्टीचे अध्यक्ष तथा एका मिडिया हाऊसचे मालक विनोद शर्मा आणि त्यांच्या पत्नीला मतदारांनी पराभूत केलं आहे.लोकहित पार्टीचे अध्यक्ष तथा हरियाणा न्यूजचे मालक गोपाल कांडा यांनाही मतदारांनी नाकारलेलं आहे.फोकसचे मालक नवीन जिंदाल यांच्या मातोश्री सावित्री देवी यांनाही पराभव स्वीकाराावा लागला.मात्र भाजपच्या तिकिटावर उभे असलेले हरिभुमीचे मालक कॅप्टन अभिमन्यू निवडणूक जिंकले आहेत.महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठे वृत्तपत्र असलेल्या लोकमतचे मालक राजेंद्र दर्डा यांचा पराभव देखील साऱ्यांनाच धक्का देणारा ठरला आहे.कारण औरंगाबादकरांनी सलग तीन वेळा विधानसभेत पाठविलं होतं.त्या अगोदरही महाराष्ट्रातील ज्या ज्या नेत्यांनी वृत्तपत्र सुरू केले त्यांना त्याच्या राजकीय कारकीर्दीसाठी या वृत्तपत्राचा फारसा उपयोग झाल्याचे दिसत नाही.उलटपक्षी हे नेते पराभूतच झाले.एखादया पक्षाचे मुखपत्र म्हणून काम करणाऱ्या वृत्तपत्रातील बातम्यांवर वाचक किमान निवडणूक काळात तरी विश्वास ठेवत नाहीत हे अनेकदा सिध्द झालेलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here