दोघांना अटक

0
640

महाड येथील वायू गळती प्रकऱणी महाड आमआयडीसी पोलिसांनी आज दोघांना अटक केली असून त्यांची चौकशी कऱण्यात येत आहे.महाड अौद्योगिक वसाहतीत शकील खान यांचे भंगाराचे दुकान आहे.काल रात्री रसायनांनी भरलेले पिंप ट्रकमधून उतरवत असताना एक पिंप खाली पडल्यानं त्याचा स्फोट झाला.त्यातून बाहेर पडलेल्या रसायनाने चौघाचा मृत्यू झाला होता.आज या प्रकऱणी भंगाराच्या मालकासह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून भंगाराच्या दुकानात विषारी रसायन कश्यासाठी आणले गेले होते याची चौकशी पोलिस करीत असल्याची माहिती महाड एमआयडीसी पोलिसांनी आकाशवाणीला दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here