महाडनजिक सावित्री नदीवर 30 कोटी रूपये खर्च करून होतोय नवीन पूल

0
742

महाड दुर्घटनेला एक महिना पूर्ण होत असतानाच केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने दुर्घटनाग्रस्त पुलाच्या जागेवर नव्या तीन पदरी पुलाच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे.त्यासाठी 30 कोटी रूपये मंजूर करण्यात आले असून नव्या पुलाचे बांधकाम कोणत्याही परिस्थितीत 17 मे पुर्वी व्हावे असे सांगण्यात आले आहे.निविदा काढताना देखील तशी अट घातली जाणार आहे. केद्र सरकारला याबाबतचा प्रस्ताव 23 ऑगस्टला मिळाला.विक्रमी वेळेत म्हणजे अवघ्या आठ दिवसात प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून या पुलासाठी 29 कोटी 41 लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत.नवीन पूल 239 मीटरचा असेल.रूंदी 16 मीटर म्हणजे तीन पदरी आणि 101 .05 मीटर एवढी असणार आहे.नव्या पुलासाठी प्रशासकीय आणि वित्तीय मंजुरी मिळाली असून याबाबतची निविदा प्रक्रिया लगेच पूर्ण करून किमान ऑक्टोबरमध्ये पुलाचे काम सुरू करावे असे प्रयत्न आहेत.2 ऑगस्ट रोजी सावित्री नदीवरूल 66 वर्षांचा जुना पूल पुरात वाहून गेला होता.त्यात 42 जणांचे प्राण गेले होते.दुर्घटनेनंतर नितीन गडकरी यांनी घटनास्थळाला भेट देऊन नवा पूल बांधण्याचे आश्‍वासन दिले होते.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here