सत्य बातमी दिली म्हणून एका तरूण पत्रकारावर गुन्हा

0
723

सत्य बातमी दिली म्हणून एका तरूण पत्रकारावर गुन्हा
सत्य बातम्या देणं हे पत्रकारांचे कर्तव्य आणि तो त्यांचा धर्मही आहे.मात्र अनेकदा हे सत्य राजकारण्यांना खुपते तसेच ते पोलिसांनाही खुपते.त्यातून मग सत्य बातमी दिली म्हणून संबंधित पत्रकारांवर गुन्हे दाखल केले जातात.मागे एका पत्रकाराने 26/11 नंतर आलली हत्यारं पावसात भिजून घराब झाल्याची बातमी दिल्यानंतर त्याच्यावर देषद्रोहाचा खटला पोलिसांनी भरला होता.आता एक तरूण पत्रकार साहिद अन्सारी याने काही मुस्लिम नेते सार्वजनिक मालमत्ता आपल्या खासगी ट्रस्टसाठी कश्यापध्दतीनं हडप करण्याचा प्रयत्न करीत आहेत यावर प्रकाश टाकणारी बातमी बॉम्बे लिक्स या पोर्टलवर प्रसिध्द केली आहे.बातमी असत्य असेल तर संबंधित पत्रकारावर संबंधित नेत्याने बदनामीचा खटला भरला असता तर आम्ही समजू शकतो मात्र तसे न करता पोलिसांनी समाजात व्देषभावना पसरविण्याचा कट ( 120 बी ) आरोपाखाली साहिदवर गुन्हा दाखल केला आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती अशा पध्दतीनं पत्रकाराचा आवाज बंद कऱण्याच्या प्रयत्नाचा तीव्र शब्दात निषेध करीत आहे.मुख्यमंत्र्यांनी या विषयी लक्ष घालावे असी मागणी करीत आहे. या प्रकरणात पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती संपूर्णपणे साहिद अन्सारी यांच्या पाठिशी आहे.साहिदचा फोन नंबर 8080779323 आणि 8380017869 असा आहे.

साहिद अन्सारी यांनी दिलेली बातमी खालील लिंकवर क्लीक करून वाचता येईल.

http://goo.gl/LzONS0

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here