भिरा यंदाही तापलंय …

‘सर्वाधिक पाऊस पडणारा प्रदेश ‘ अशी ओळख असलेल्या रायगडची आता महाराष्ट्रात ‘सर्वाधिक तापणारा परिसर’ ही नवीन ओळख निर्माण होत आहे..गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात भिरा-पाटणूस परिसरात  किमान तीन वेळा राज्यात आणि देशात उच्चांकी म्हणजे ४४.५  डिग्री सेल्शियस  तापमाणाची नोंद झाली होती.यावर्षी तर फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशीच म्हणजे २८ तारखेला  भिराचे तापमान राज्यात सर्वाधिक म्हणजे 42.0 डिग्री सेल्सियश एवढे होते.गेली आठ-दहा दिवस हे तापमान दररोज सरासरी 38 ते 41 डिग्री सेल्शियसच्या आसपास असते.आता कुठे मार्च सुरू आहे.प्रखर उन्हाळ्याचे आणखी तीन महिने जाणार आहेत.मात्र आतापासूनच उन्हाळा तापायला लागल्याने एवढया तीव्र उन्ङाळ्याची सवय नसलेल्या रायगडमधील जनतेची यंदाचा उन्हाळा ‘लाही लाही’ करायला लावणार अशीच शक्यता आहे.

रायगड जिल्हयाच्या मध्यात,सहयाद्रीच्या कुशीत वसलेल्या भिरा येथे ‘विळे-भागाड औद्योगिक वसाहत’ आहे.तेथे  दिवस-रात्र कारखाने आग ओकत असतात.शिवाय परिसरात टाटा पॉवर हाऊसचे विद्युत निर्मिती केंद्र देखील आहे. उन्हाळ्यात जंगलांना लागणारे मोठे वणवे,मोठी जंगलतोड झाल्याने बोडखे होत चाललेले डोंगर या सर्वाचा परिणाम तापमान वाढीत होत असल्याचे जाणकार सांगतात. माणगांव तालुक्यातील भिराच नव्हे तर एकुणच रायगड जिल्हयाचे तापमान सातत्यानं वाढताना दिसते  आहे.यावर वेळीच उपाय शोधले नाहीत,जंगलांना लावले जाणारे वणवे रोखले नाहीत आणि नव्यानं वृक्षारोपण केले गेले नाही तर हा निसर्गसंपन्न प्रांत ‘रखरखता मराठवाडा’ व्हायला वेळ लागणार नाही.

वाढत जाणार्‍या उन्हामुळं उष्माघात होऊ नये याची काळजी नागरिकांनी घ्यावी असे आवाहन  करण्याची वेळ जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्यावर आली आहे

LEAVE A REPLY