ल्याळम पत्रिका गृहलक्ष्मीच्या ताज्या अंकावरील मुखपृष्ठावरून सध्या वादंग उठलं आहे.या अंकावर स्तनपान करणार्‍या एका मॉडेलचा फोटो प्रसिध्द केला गेलाय.गिलू जोसेफ असं या मॉडेलंच नावय.मुलाला स्तनपान करणार्‍या या मॉडेलच्या चित्रावर डोन्ट स्टेयर,वुई वॉन्ट टु ब्रेस्टफीड ( घुरो मत,हम स्तनपान कराना चाहते है ) अशी टॅगलाईन छापली गेलीय.महिलांनी सार्वजिक ठिकाणी स्तनपान करताना लाजू नये असं एक कॅम्पने चालविलं जात आहे..हे छायाचित्र त्याचाच भाग असल्याचं सांगितलं जातंय.मात्र काहींना हा बचाव मान्य नाही.मॅथ्यू विल्सनचे हे छायाचित्र अश्‍लील असून ते अश्‍लील चित्रण कायदा 1986 च्या कलम 3 आणि 4 चे उल्लंघन करणारे आणि महिलांचा अवमान करण्याच्या उद्ेशानं छापलं गेलंय असं सांगत या विरोधात पोलिसात तक्रार केली गेली आहे.
सोशल मिडियावर कव्हरवर जोरदार चर्चा सुरूय.आपल्या मुलाला स्तनपान करतानाची एखादे नैसर्गिक छायाचित्र असते तर हरकत नव्हती.पण एक मॉडेल मुलाला स्तनपान करताना दाखविली गेल्याने लोकांना बचाव मान्य नाही.डक्कन कॅानिकलने दिलेल्या माहितीनुसार ज्या वकिलाने तक्रार दिली आहे त्याचं म्हणणं असंय की, लोक टक लावून पाहतील अशी जर पत्रिकेला चिंता होती तर एखादया आईची आपल्या मुलाला स्तनपान करतानाचे चित्र छापले गेले असते इथं एका मॉडेलचा वापर केलाय.मार्केटिंगचा हा फंडा आहे.पोलिस काय कारवाई करतात ते आता दिसेलच.तक्रारीमुळे गृहलक्ष्मी अडचणीत आलीय.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here